वेध माझा ऑनलाईन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरामध्ये बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष राजेंद्र माने यानी दिली
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते साजरा करत आहेत कराडात देखील आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्याशाळा येथील विद्यार्थिनींना जिलेबी वाटप करण्यात आले तसेच सोमवार पेठेतील नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले त्याचबरोबर मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत केक कापण्यात आला अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष राजेंद्र माने यांनी दिली
यावेळी कराड उपशहर प्रमुख गणेश भोसले माजी नगरसेवक प्रमोद वेरणेकर उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते उपजिल्हा युवा सेना प्रमुख शंभूराज रैनाक, कराड शहर विभाग प्रमुख विक्रांत पालकर , उपशहर प्रमुख संदीप थोरवडे उपजिल्हा प्रमुख सुलोचना ताई पवार ,कराड शहर शाखाप्रमुख आदित्य इनामदार, रणजीत नाना पाटील, मोनील शहा, वरद कुंभार, रामभाऊ शिनगारे ,कैवल्य वळवडे, वरद सोनवणे, श्रीराज भस्मे, सुरेश पाटील, प्रथमेश लादे,वर्धन शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते
No comments:
Post a Comment