Friday, February 24, 2023

भाजपमध्ये घ्या म्हणत रामराजेंचे फडणवीसांच्या दारात हेलपाटे ; फडणवीस तयार नाहीत म्हणून आता मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट ; . रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला गौप्यस्फोट

वेध माझ ऑनलाईन -  रामराजे हे भाजपमध्ये घ्या, म्हणून फडणवीस यांच्या दारात हेलपाटे मारतायत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला.फलटण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

  ते पुढे म्हणाले, मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत श्रेयवादात पडायचे नाही दरम्यान धोम-बलकवडीच्या माध्यमातून तालुक्यात चारमाही वाहणारा कालवा लवकरच आठमाही होणार आहे. महाबळेश्वर येथील सोळशी प्रकल्पाच्या माध्यमातून तेथे दोन टीएमसीचे धरण प्रस्तावित असून, त्यास केंद्र व राज्य सरकार अनुकूल आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर धोम- बलकवडीचा तालुक्यातील कालवा बारमाही वाहील. अन्य भागासही पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले, “महाबळेश्वरच्या पायथ्याशी देवसरे गावाजवळ सोळशी नदीवर धरण प्रस्तावित आहे. या धरणातील पाणी बोगद्याद्वारे वाई तालुक्यातील धोम जलाशयामध्ये सोडण्यात येणार आहे. नीरा-देवघर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे आगामी काळासाठी आणखीन काय हवेय का? अशी विचारणा केली होती. त्यावर आपण त्यांच्याकडे सोळशी प्रकल्पाची मागणी केली. या प्रकल्पाचा अभ्यास जलतज्ज्ञांनी केला आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे फलटण तालुक्यातील धोम बलकवडीचे कालवे बारमाही वाहतील. या प्रकल्पातील पाणी धोम- बलकवडीच्या माध्यमातून कोरेगाव व माण-खटाव तालुक्यांसही मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment