वेध माझा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्वे,ता.कराड येथे आयोजित केलेल्या भव्य बैलगाड्या शर्यतीत रेठरे बुद्रुक येथील सदाभाऊ कदम मास्तर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवत अबालवृध्दांची वाहवा मिळवली.
मोठ्या संख्येने बैलगाड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विंग येथील महंमद मुजावर यांच्या बैलगाडीने मिळवला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक खशाबा दाजी शिंदे रेठरे सैदापूर,चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक धानाई बिरोबा प्रसन्न कार्वे तर पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक सदाशिव कदम मास्तर रेटरे बुद्रुक यांच्या बैलगाडीने मिळवला.
बैलगाड्या शर्यती ही ग्रामीण जीवनाची उत्कृष्ठ परंपरा असुन ही परंपरा हौशी शेतकरी निष्ठेने संभाळत असल्याचे नमुद करुन
या बैलगाड्या शर्यतीत पश्चिम महाराष्ट्रातील असंख्य बैलगाड्या शौकिनांनी सहभाग घेतल्याबद्दल शिंदे गटाचे कराडचे नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सर्व सहभागींचे मन:पुर्वक आभार मानुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमुल्य सहकार्य करणार्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.पारितोषिक वितरण समारंभ सातारा जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हणमंतराव पवार सौ.स्मिता हुलवान,शहर अध्यक्ष राजेंद्र माने,महीला आघाडी उपाध्यक्ष सुलोचना पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी रणजित (नाना) पाटील किरण पाटील, बाळासाहेब यादव, निशांत ढेकळे, ओमकार मुळे, विनोद भोसले, राहुल खराडे, गुलाबराव पाटील, बाळासाहेब बनसोडे, मिलिंद माने, गणेश भोसले, राजेश खराडे, संतोष जाधव संदीप थोरवडे, संकल्प मुळे, शंकर वीर,विद्या शिंदे,विमल सुपनेकर,पवन निकम,सागर बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैलगाडी शर्यतीचे उत्कृष्ट नियोजन पावर ग्रुपचे विनोद पवार, प्रकाश पवार, तानाजी देशमुख, विनायक बाबर, संतोष खराडे,सचिन गायकवाड, सुरेश शिंगण, पप्पू शिंगण,दादा भोसले, आबा शिंगण, अरुण शिंगण, संतोष शिंगण,हार्दिक पवार, सचिन पवार, सुनील काशीद, सुदाम सिंगण, अनिल जाधव, विठ्ठल पवार यांनी केले होते.
No comments:
Post a Comment