वेध माझा ऑनलाईन - कबड्डी खेळाचा अधिक प्रसार व प्रचार व्हावा. यासाठी लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या खुल्या गटातील पुरुष व महिला कबड्डी सामने संपन्न झाले आहेत. दरम्यान 8 व 9 फेब्रुवारी रोजी वजनी गटातील स्पर्धा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व "मुख्यमंत्री चषक 2023" स्पर्धेचे आयोजन रणजीत पाटील (नाना) यांनी आयोजित केलेल्या आहेत.
35 किलो 55 किलो गटाच्या स्पर्धा "लिबर्टी"च्या क्रीडांगणावर 8 व 9 फेब्रुवारीला होणार असून नुकताच खुल्या गटाचा कबड्डीचा थरार कराडकरांनी अनुभवला आहे. दरम्यान 35 किलो गट बक्षीस : प्रथम क्रमांक - 15,555 व चषक,
द्वितीय क्रमांक - 11,111 व चषक, तृतीय क्रमांक - 7,777 अष्टपैलू खेळाडू - 1,111 व चषक, उत्कृष्ट चढाई - 777 व चषक, उत्कृष्ट पक्कड - 777 व चषक असे स्वरूप आहे. 35 किलो आणि 55 किलो गटातील खेळाडूंनाही रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे. नोंदलेल्या निमंत्रित संघानी विजय गरुड (9421680836), भास्कर पाटील (7218675399), जितेंद्र जाधव (9823342444), धनराज शेटे (7778840642), फिरोज पठाण (9867090015) यांच्याशी संपर्क साधावा असा संयोजकांनी आवाहन केले आहे.
राज्य कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर सदरच्या स्पर्धा होणार असून या स्पर्धेला कराडकर क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रणजीत पाटील यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment