वेध माझा ऑनलाईन ; कराड शहराच्या २४ × ७ पाणी योजनेच्या तिमाही बील आकारणीवरून कराड शहरातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे . याबाबत शहर काँग्रेसचे पदाधीकारी व कार्यकर्ते एप्रिल २०२२ पासून कराडचे मुख्याधिकारी डाके यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत . पाणी योजनेची बिले भरमसाठ आल्याने व हवेमुळे मीटर फिरत असल्याने कराडकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीबीलांमध्ये ३० टक्के सवलत देण्यात यावी अशी आग्रही मागणी कराड शहर काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी कराड नगरपरिषद, कराड यांचेकडे यापूर्वी वारंवार करण्यात आली आहे पाण्याचा दर प्रती १००० लिटरला ८ रूपये असून त्यामध्येसुद्धा ३० % कपात करावी . २४x ७ पाणी योजना पूर्ण ताकतीनिशी सुरू होई पर्यंत मीटरनुसार बील आकारणी करू नये अशी शहर काँग्रेसच्यावतीने मागणी करण्यात आली होती मुख्याधीकारी यांच्याशी चर्चा करून नागरीकांना दिलासा देण्याबातच्या सुचना पृथ्वीराज बाबांनी त्यावेळी दिल्या होत्या तसेच जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याबरोबरदेखील बाबांनी याबाबत चर्चा केली होती त्यानुसार कराडच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यानेच जिल्हाधिकारी यांनी या बील आकारणीस स्थगिती दिली आहे अशी माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे
सदर प्रश्न सोडविण्यासाठी कराडच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन आम्ही दिले त्यानंतर कराड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना गेल्या आठवड्यात निवेदन दिले आहे या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण ( बाबा ) यांनीही मुख्याधीकारी यांच्याशी चर्चा करून नागरीकांना दिलासा देण्याबातच्या सुचना दिल्या होत्या . त्याचबरोबर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याबरोबरही चर्चाही केली कराडच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये असणाऱ्या त्रुटी लक्षात आल्यानेच जिल्हाधिकाऱ्यांनी या बील आकारणीस तुर्तास स्थगिती दिली आहे असेही ऋतुराज मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
No comments:
Post a Comment