वेध माझा ऑनलाईन - अजित पवारांसोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांसोबत झालेला शपथविधी शरद पवारांशी चर्चा करूनच झाला होता, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारची स्टेटमेंट्स करतील, असं मला कधी वाटलं नाही', असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,' असं फडणवीस म्हणाले.
'अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
No comments:
Post a Comment