वेध माझा ऑनलाईन - बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला, याविषयी मला माहिती नाही.पदवीधर मतदार संघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. सदरची गोष्ट गंभीर आहे
अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे
आ.पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, बाळासाहेब थोरात आणि राजीनामा दिला, याविषयी मला माहिती नाही. मात्र,
नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसची हक्काची जागा होती. ती आता असणार नाही. त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ एकने कमी होणार आहे. सदरची गोष्ट गंभीर आहे आणि त्याची चौकशी वरिष्ठांकडून होत आहे. तसेच पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत 15 तारखेच्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. बाळासाहेब थोरात यांनी अन्याय झाला आहे, असे म्हटले असेल तर हाय कमांड या प्रकरणाची चौकशी करेल बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा देण्यामागे भाजपाचा हात आहे का? ते भाजपाच्या वाटेवर असतील असं वाटतं का? या माध्यमांच्या प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपचा हात प्रत्येक गोष्टीमध्ये असतो. भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडत असतात. भाजपमध्ये आमदारांच्या संख्याबळ बघितलं तर निम्मी माणसे ही काँग्रेसचीच आहेत.
No comments:
Post a Comment