वेध माझा ऑनलाईन - आमदार, खासदारानंतर शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता ठाकरेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ट्रस्टच्या मालमत्तेचा राजकीय वापर केल्याचा आरोप यशस फर्मकडून करण्यात आला आहे. यशस फर्मच्या योगेश देशपांडे यांनी शिवाई ट्रस्टविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
शिवाई ट्रस्टविरोधात तक्रार दाखल झाल्यामुळे ठाकरेंच्या हातातून सेनाभवनही जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, कारण सेनाभवनचा मालकी हक्क शिवाई ट्रस्टकडे आहे.
तक्रारकर्त्याचे सवाल
शिवाई ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट आहे, पण तुमच्या अधिकृत वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला शिवाई ट्रस्टबाबत फार माहिती मिळू शकली नाही.
शिवाई ही पब्लिक ट्रस्ट आहे, मग मागची इतकी वर्ष याचा राजकीय कारणांसाठी वापर कसा केला जाऊ शकतो?
अशाप्रकारचा वापर ट्रस्टच्या धोरणाविरोधात असेल तर ट्रस्टींचं निलंबन करून प्रशासकाची नेमणूक का केली जाऊ नये?
आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई ट्रस्टींकडून का घेतली जाऊ नये?
आम्ही पाठवलेलं हे पत्र जनहितासाठी असून हीच आमची तक्रार समजावी आणि पुढची कार्यवाही करावी, अशी तक्रार यशस फर्मकडून धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सेनाभवन नेमकं कुणाच्या मालकीचं?
दरम्यान शिवसेना भवन नेमकं कुणाच्या मालकीचं आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. याला कारण ठरलं आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला आरोप. शिवसेना भवन शिवाई ट्रस्टचं आहे का आणखी कुणाचं? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. यासोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, ज्यातल्या कागदपत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव दिसत आहे.
'शिवसेनाभवन शिवाई ट्रस्टच्या मालकीच आहे. त्या ट्रस्टवर कधीही बाळासाहेबांनी आपलं नाव टाकलं नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंना या ट्रस्टवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी नाव टाकलं का? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थितीत केला आहे.
आधीच स्मारकात घरच्यांची नाव टाकली आहेत, त्यात हे देखील समोर येत आहे, तर उद्धव ठाकरे फक्त प्रॉपर्टी जमा करत होते. त्यांच लक्ष फक्त प्रॉपर्टी जमा करण्यात आहे. बाळासाहेब यांनी सांगितलं सर्व करता येतं पण गेलेलं नाव करता येत नाही, असा टोलाही देशपांडेंनी ठाकरेंना लगावला.
No comments:
Post a Comment