वेध माझा ऑनलाइन - मंत्री शंभूराज देसाई यांची ठाकरे कुटुंबियांवर बोलव एवढी उंची आणि योग्यता नाहीये उगीच माईक पुढे आला की काहीतरी बडबडायचं अस चालत नाही कुणाची तरी मर्जी राखायची म्हणून असली बडबड करायची याचा काही उपयोग होणार नाही असा टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी मंत्री शंभूराज देसाई याना लगावला मंत्री देसाई यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाटण मतदार संघातून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले होते त्याला प्रत्युत्तर देताना हर्षद कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला
ते पुढे म्हणाले आदित्य ठाकरेंवर शंभूराज देसाई यांनी बोलावं हे हास्यास्पद आहे...शंभूराजेंनी अगोदर आमच्या सारख्या शिवसैनिकांशी लढून दाखवावे मग ठाकरेंचे नाव घ्यावे...त्यांची योग्यता नाहीये ठाकरेंचे नाव घेण्याची...उगाच माईक पुढे आला की काहीतरी बडबड करायची ही त्यांची सवय आहे...याच शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही तीनवेळा आमदार झालात...2019 ला मल्हारपेठ येथे आदित्य ठाकरेंची सभा घेण्याची त्यावेळच्या निवडणुकीत तुम्हालाच गरज लागली होती आणि आता तुम्हीच त्यांना आव्हान करता ? तुमची तेवढी उंची आहे का ? असा सवालही कदम यांनी यावेळी केला...शंभूराज यांची निष्ठा काय आहे हे सर्वांना माहीत आहे...मतदार संघातील लोक आता वाटच बघतायत की कधी निवडणूक लागते... आणि त्यात शंभूराज कधी उभे राहतायत ते ...वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना मतदार संघात घेऊन फिरायच किंवा पक्ष विरोधी भूमिका घ्यायची ही त्यांची निष्ठा सर्वांनी पाहिली आहे
त्यामुळे सध्या जिथं तुम्ही रहायचा राजकीय विचार केलाय तिथे व्यवस्थित निष्ठेने रहा... ठाकरे कुटुंबावर बोलण्याची आपली योग्यता नाहीये हे लक्षात ठेवा असेही कदम म्हणाले
No comments:
Post a Comment