Saturday, February 18, 2023

आता एकनाथ शिंदेंचे पुढचे टार्गेट... आदित्य ठाकरे ...शिंदेंची पुढची स्टॅटजी काय ?

वेध माझा ऑनलाईन - शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना पुढचा धक्का दिला आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या रडारवर आदित्य ठाकरेंची युवासेना आहे.

एकनाथ शिंदे यांनी युवासेना-युवती कार्यकारिणीची नियुक्ती केली आहे. या कार्यकारिणीमध्ये 10 युवतींचा समावेश आहे. शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मुख्यनेते म्हणून करण्यात आला आहे.

युवासेना-युवती कार्यकारिणी
डॉ.प्रियंका पाटील, पूजा टांकसाळकर, प्रज्ञा बनसोडे, स्नेहल कांबळे, शर्मिला येवले, शर्वरी गावंडे, क्षितीजा कांबळे, पूजा लोंढे, श्वेता म्हात्रे, शिवानी खानविलकर या 10 जणींचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंची पुढची स्ट्रॅटेजी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची पुढची स्ट्रॅटेजीही ठरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाची बैठक बोलवतील. या बैठकीमध्ये सगळ्यात आधी पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांना नेमकं कोणतं पद दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना मुख्यनेते हे पद आहे.
23 जानेवारी 2023 ला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखाचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका या प्रलंबित आहेत, याच निवडणुका घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना सगळ्यात आधी बैठक बोलवावी लागेल

No comments:

Post a Comment