वेध माझा ऑनलाईन - राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाड्या शर्यतींचे जंगी आयोजन केल्याची माहीती यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष व कराडचे शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिह यादव यांनी दिली.
ते पुढे म्हणाले राजेंद्रसिह यादव मित्र परिवार व विनोद पवार पावर ग्रुपने आयोजित केलेल्या या शर्यती रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता कार्वे फाटी,ता.कराड, जि.सातारा येथे संपन्न होणार आहेत.
स्पर्धेत यशस्वी बैलगाड्यांना रोख रकम व शिल्ड देण्यात येणार असुन रोख बक्षीसे पुढीलप्रमाणे देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांक रु.५१०००/-,व्दितीय क्रमांक रु ३१०००/-,तृतीय क्रमांक रु २१०००/- चतुर्थ क्रमांक रु११०००/- पाचवा क्रमांक रु ७०००/- सहावा क्रमांक रु ३०००/-
स्पर्धेतील सहभागासाठी ९८२२१२१२२२,९७६४२१२२२२
९७९६६९५५५५,९८५०८४७२७० या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जास्तीत - जास्त बैलगाडी धारकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन राजेंद्रसिह यादव यांनी केले.
No comments:
Post a Comment