Friday, February 17, 2023

उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिगेटिंग सुरू असताना अचानकपणे जनरेटरचा भडका ; जनरेटर जळून खाक ;

वेध माझा ऑनलाईन - कराड येथे उड्डाणपूल पाडण्यासाठी बॅरिगेटिंगचे काम सुरू असताना अचानक कंत्राटदाराचा जनरेटर पेटला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जनरेटर पूर्ण जळून खाक झाला.

 याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड येथे महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी दुतर्फा बॅरिगेटिंगचे करण्याचे काम सुरू आहे. मलकापूर फाट्याजवळ हे काम सुरू होते. त्यावेळी एका डंपरमधून जनरेटर घेऊन जात असताना अचानक जनरेटरने पेट घेतला. थोड्याच वेळात आग वाढल्याचे निदर्शनास येताच उपमार्गावरील वाहतुक थांबवून पेटता जनरेटर डंपरमधून खाली रस्त्यावर फेकन्यात आला. या वेळी जनरेटरचा भडका उडाला.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांच्यासह परिसरातील नागरिकांनी व वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथिल नागरिकांसह वाहने बाजूला करून परिसर मोकळा करण्यात आला. 

No comments:

Post a Comment