वेध माझा ऑनलाईन - शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाने संपुर्ण राज्यभर या निर्णयाचे स्वागत करत मोठा जल्लोष साजरा केला आहे कराडात देखील शिंदे गटाने भगव्या गुलालाची उधळण करत तसेच फटाके फोडुन व पेढे वाटून मोठा जल्लोष केला आहे
यावेळी शिंदे गटाच्या कराडच्या पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय झाला आहे अशा भावना व्यक्त केल्या
याप्रसंगी शिंदे गटाचे शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment