वेध माझा ऑनलाईन - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतचं एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी एक सूचक विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अनिल परब आणि राष्ट्रवादि काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नंतर आता पुढचा नंबर कुणाचा? हे मी सांगू शकत नाही. अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडून अब नंबर किस का? असे लिहिण्यात आल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तर पुढचा नंबर कोणाचा असणार? अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, ‘आता नंबर कुणाचा? एकीकडे हसन मुश्रीफ यांनी १५६ कोटी रूपये कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून मागील तारखांमध्ये नोंदी केल्या. स्वतःच्याच कंपनीचे कर्ज बुडीत खात्यात जमा केले. मुश्रीफ यांची तीन्ही मुले याप्रकरणात जामिनासाठी धावत आहेत.
तर, सुजित पाटकर यांच्या कंपनीच्या खात्यात मुंबई महापालिका आयुक्तांच्या परवानगीने सव्वा बत्तीस कोटी रूपये येतात. त्यातून २० कोटी रूपये गायब होतात. आणि ज्यांच्या खात्यात ते जातात ते उद्धव ठाकरे यांचा उजवा हात. असं देखील यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले.
तर, अनिल परब यांच्या विरोधात प्राप्तिकर खात्याने कारवाई करत त्यांचा साई रिसॉर्ट जप्त केला आहे. जमिन प्राप्तिकर विभागाकडून बेनामी मालमत्ता म्हणून या रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून हा आदेश महाराष्ट्र शासनाला देखील कळविण्यात आला आहे. अनिल परब यांच्याकडून अगोदर चार जामिन घेण्यात आले आहेत. परब यांच्या विरोधात रत्नागिरी पोलिसांकडून तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर एक तक्रार भारत सरकारकडून करण्यात आली आहे. म्हणजेच, अनिल परब हे चार प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. आणि त्यांच्याविरोधात चार गुन्हे आणखी दाखल झाले आहेत. असे देखील यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment