वेध माझा ऑनलाईन - कसबा पेठ पोटनिवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर कसब्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. काल पोलिसांसोबत कसबा मतदारसंघाच्या काही भागात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. तसेच याचा निषेध करण्यासाठी कसबा गणपती समोर उपोषण करण्याचा निर्णय धंगेकर यांनी घेतला आहे.
भाजपने लोकशाहीचा गळा घोटला
रविंद्र धंगेकर म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. परंतु भाजपच्या कर्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पैशांचे वाटप केले आहे. स्वत: गिरीश महाजन हे गुन्हेगारांना सोबत घेऊन मतदारसंघात फिरत होते. असे असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षीत होते. माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन देखील कारवाई झाली नाही. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असून संविधान टिकवण्यासाठी आपण उपोषण करत असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
रविंद्र धंगेकर म्हणाले, काल प्रचार संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सात वाजले तरी मतदारसंघात होते. हा कोणता न्याय आहे? मी कोणाला घाबरत नाही. भाजप आता घाबरले आहे.जर पोलीस संरक्षणात पैशांचे वाटप होत असेल आणि निवडणूक आयोग याकडे डोळेझाक करत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा.न्याय जनता देईल, मी जनतेच्या दरबारात बसलो असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment