वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेच्या व्हिपवरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी काल (26 फेब्रुवारी) आमदारांना व्हिप जारी केला होता आणि व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करु, असा इशाराही दिला होता. मात्र शिवसेनेचा व्हिप मिळाला नाही आणि मिळाला तरी पाळणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाईचा विचार करु, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. सर्व आमदारांना अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याचा व्हिप बजावला आहे. सध्यातरी कारवाई होणार नसली तरी ठाकरे गटाच्या आमदारांची चिंता वाढली आहे.
व्हिप बजावला तरी पाळणार नाही : सुनील प्रभू
ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू म्हणाले, आम्हाला व्हिप बजावला तरी पाळणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा पालन केले नाही तर तो न्यायालयाचा अपमान होईल. गरज पडल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
No comments:
Post a Comment