वेध माझा ऑनलाईन - देशातील उद्योजक असलेले अदानी आज मोदींसोबतच्या मैत्रीमुळे कमी वेळात देशातील एक नंबर चे श्रीमंत उद्योजक झाले मात्र आज अदानी व मोदी यांच्या मैत्रीमुळे देश विकला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अदानीला स्टेट बँक व एल आय सी च्या माध्यमातून दिलेल्या कर्जामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे या संस्थांनी कोणाला विचारून ही कर्जे दिली? याबाबत आम्ही जाब विचारणार आहोत त्यासाठी लवकरच पूर्ण राज्यभर स्टेट बँक व एल आय सी समोर आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे दिला
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपनंतर आता काँग्रेस कडून हात से हात जोडो हे अभियान सुरु केले आहे. या अभियानाचा सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण, कराड उत्तर व कराड शहर काँग्रेस कमिटी चा एकत्रित शुभारंभ आज कराड येथील स्व. स्वा. सै. शामराव पाटील फळ व भाजीपाला मार्केट येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
या कार्यक्रमांस राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या शुभारंभ कार्यक्रमांस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अल्पना यादव उपाध्यक्ष गीतांजली थोरात, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, उत्तमराव पाटील, मलकापूर नगराध्यक्षा निलम येडगे, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, फारूक पटवेकर, मलकापूर नगरसेवक राजेंद्र यादव, युवक काँग्रेसचे अमित जाधव, राहुल पवार, अभिजीत पाटील, अमोल नलवडे आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे उपस्थित होते
आ. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या पुढाकाराने यशस्वी झाली काँग्रेस पक्षाचा देशप्रेमाचा विचार देशभर पसरवीता आला. आता पक्षाने सुरु केलेले हात से हात जोडो अभियान आपण तंतोतंत उभारून सोशल मीडिया, पारंपरिक मीडिया यांचा मेळ घालून अभियान यशस्वी केले पाहिजे. देशात द्वेषाचे वातावरण हटविण्यासाठी भारत जोडो यात्रेतून प्रेम भावना, बंधुता पसरविली गेली आता मोदी सरकार च्या गेल्या 8 वर्षातील चुकीच्या निर्णयांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी हात से हात जोडो अभियान प्रभावी ठरणार आहे. नुकताच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी वाढत्या बेरोजगारीवर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, ज्या मनरेगा मुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांना हाताला काम व दाम मिळत होते त्या योजनेच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. तसेच आज अदानी व मोदी यांच्या मैत्रीमुळे देश विकला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी एक सामान्य उद्योजक असलेले अदानी आज मोदींसोबतच्या मैत्रीमुळे कमी वेळात देशातील एक नंबर चे श्रीमंत उद्योजक झाले आहेत यामुळेच या बाबतचा संशय येऊन अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने रिसर्च करून अदानी च्या मायाजालाचे पुरावे गोळा करून मोठा रिपोर्ट जगजाहीर केला आहे. यामुळेच काँग्रेस सह सर्व विरोधकांची मागणी आहे की या घटनेची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी केली जावी आणि म्हणूनच उद्या काँग्रेस कडून देशभर आंदोलन केले जाणार आहे.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील म्हणाले की, आजचे युग हे डिजिटल युग आहे यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा मोठा उपयोग प्रचारात केला पाहिजे. आज मोठ्या सभा कमी होतील पण ज्यांचा सोशल मीडियावर प्रभाव आहे असा प्रचारच प्रभावी ठरणार आहे. हात से हात जोडो अभियानातून आपल्या मतदारसंघात, तालुक्यात घरोघरी जाऊन अभियाना बद्दल माहिती देऊन मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे.
यावेळी उदयसिंह पाटील, शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, निवासराव थोरात, अजितराव पाटील आदींची भाषणे झाली. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
दरम्यान, अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमाआधी कराड व मलकापूर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली मुख्य रस्त्यावरून मार्केट मधील सभा ठिकाणपर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment