बंध माझा ऑनलाईन - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाजपवर जोरदार हल्ला करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवेळी भाजपमध्ये काय घडामोडी घडत होत्या, याबाबत अजित पवारांनी विधानसभेत खळबळजनक दावा केला आहे. जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा सगळ्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वाटत होतं पण काय झालं? भाजप आमदारांना बंड करायचं होतं, पण देवेंद्र फडणवीस बोलले वरून आदेश आहेत, असं काही करू नका. वरच्या दोन माणसांना कळलं तर काही खरं नाही. तेव्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही आपण भेटलो तेव्हा त्यांनीही हे काय झालं? असा प्रश्न मला विचारला. फडणवीस म्हणाले मी मंत्रिमंडळात जाणार नाही, यानंतर कुणाच्या डोळ्यात पाणी आलं हे आपल्याला माहिती आहे... गिरीश महाजन,...असं अजित पवार म्हणाले.
80-85 लोकांनी आपण बंड करायचं का? असं काही म्हणाले. शेवटी देवेंद्रजी म्हणाले असं काही करू नका. त्या दोघांना कळालं तर आपला सुपडा साफ होईल. वरचे आदेश सगळ्यांनी गपगुमाने ऐकले, असंही अजित पवार म्हणाले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. बालेकिल्ल्यातही तुमचा पराभव झाला. 6-8 महिन्यात दिवा लावला असता तर पदवीधर आणि शिक्षकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं. केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, तरी दुसऱ्यांवरच डोळा. तुमचे करा ना तयार, समोर बघितलं तर 40-50 जण आपल्यातलेच गेले आहेत, असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.
पुण्याच्या निकालानंतर आणखी एक गौप्यस्फोट
' पुण्याचा निकाल काय लागेल मला सांगता येत नाही. पुण्यामध्ये गिरीश महाजन यांच्यासह सगळ्यांना 3-4 दिवस बसावं लागलं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना किती दिवस बसावं लागलं. तिकडे काय काय घडलं? आज मी बोलणार नाही. एकदा निकाल लागू द्या, मग सांगतो पुण्यामध्ये चिंचवडमध्ये कुठे काय घडलं. कोण सापडलं, कोण काय करत होतं. मतदानाला जाऊ नका कोण सांगत होतं. मतदानाला जा सांगत असताना कोण काय सांगत होतं, हे त्यावेळेस सांगेन, ' असं म्हणत अजित पवारांनी मोठ्या गौप्यस्फोटाचे संकेत दिले आहेत
No comments:
Post a Comment