वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मातोश्री सौ.सुनिता दिलीप डाके (वय- 61) यांचे आज सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पलूस येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.
सौ सुनीता डाके यांचे स्वतःचे शिक्षण कमी असले तरीही आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी त्या नेहमीच आग्रही राहिल्या चिरंजीव रमाकांत डाके कराडचे मुख्याधिकारी आहेत तर मुलीने डी.एड शिक्षण पूर्ण केले आहे.
दरम्यान आज सौ. सुनिता दिलीप डाके यांच्यावर पलूस (ता. पलूस) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यांच्या पश्चात एक मुलगा व 2 मुली, नात, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पलूस येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment