या स्पर्धेचे आयोजन मुख्यमंत्री शिंदे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे कराडचे सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी केले आहे
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन तर आमदार शहाजी बापू पाटील आमदार अनिल बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
राज्यातील नामांकित कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सांगली, पुणे येथील 16 पुरुष व 12 महिला संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा होत असून राज्य असोसिएशन स्पर्धा निरीक्षक पंच, प्रमुख पंच यांची नियुक्ती करून स्पर्धेचे नियोजन चांगले व्हावे. यासाठी सहकार्य केले आहे. दरम्यान दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी वजनी गट 35 किलो, 55 किलो मुले या गटातील कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्हा पातळीवरील सुमारे 50 संघ सहभागी होणार आहेत. याचे उद्घाटन दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार असून पारितोषिक वितरण दिनांक 9 रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी शहरातील क्रीडा रसिक बंधू भगिनींनी आवश्यक उपस्थित राहून क्रीडापटूंना प्रोत्साहन देऊन खेळाचा आनंद घ्यावा. असे आवाहन लिबर्टी मंजूर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरुष खुला गट बक्षीस : प्रथम क्रमांक - 1,11,111 व चषक, द्वितीय क्रमांक - 55,555 व चषक, तृतीय क्रमांक - 22,222 व चषक, चतुर्थ क्रमांक - 22,222 व चषक, अष्टपैलू खेळाडू - 3,333 व चषक, उत्कृष्ट चढाई - 2,222 व चषक, उत्कृष्ट पक्कड - 2,222 व चषक. महिला खुला गट बक्षीस : प्रथम क्रमांक - 55,555 व चषक, द्वितीय क्रमांक - 33,333 व चषक, तृतीय क्रमांक - 11,111 व चषक, चतुर्थ क्रमांक - 11,111 व चषक, अष्टपैलू खेळाडू - 2,222 व चषक, उत्कृष्ट चढाई - 1,111 व चषक, उत्कृष्ट पक्कड - 1,111 व चषक. तसेच 35 किलो आणि 55 किलो गटातील खेळाडूंनाही रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे.
नोंदलेल्या निमंत्रित संघानी विजय गरुड (9421680836), भास्कर पाटील (7218675399), जितेंद्र जाधव (9823342444), धनराज शेटे (7778840642), फिरोज पठाण (9867090015) यांच्याशी संपर्क साधावा असा संयोजकांनी आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री चषक कराडात होतोय प्रथमच!
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कराड येथे लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर प्रथमच "मुख्यमंत्री चषक 2013" राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रणजीत नाना पाटील मित्र परिवाराच्यावतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment