Thursday, February 23, 2023

देवेंद्र फडणवीस म्हणतात ...ठाकरे माझे शत्रू नाहीत ...ठाकरेंना राज्यभर सहानुभूती मिळत असल्याने, ठाकरेंनाच मित्र म्हणत फडणवीसांची नवी खेळी?; राज्यभर चर्चा सुरू ;

वेध माझा ऑनलाईन - उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे-फडणवीसांमध्ये संघर्ष सुरु झाला. कालांतराने हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि याच संघर्षातून शिवसेनेत फूट पडून ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होत आहेत, पण हे सगळं घडत असलं, तरी आपण शत्रू नसल्याचं सांगत फडणवीस वारंवार ठाकरेंविरोधात संघर्ष केवळ राजकीय असल्याचं सांगत आहेत. एकूणच राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत लोकांच्या मनात प्रचंड सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे मत बनले आहे या सर्व भानगडीमागे भाजप असल्याची राज्यभर चर्चा आहे आणि त्याचेच परिणाम भाजप ला यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सोसावे लागतील म्हणून ठाकरेंनाच मित्र म्हणून काही लोकांच्या मनातील आपल्या बद्दलची निर्माण झालेली तिडीक व विरोधाची भावना सॉफ्ट करण्याची यातून फडणवीस खेळी खेळत असल्याचे जाणकार सांगत आहेत

दरम्यान, फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंसोबत केवळ वैचारिक विरोध असल्याचं सांगितलं. राजकारणात वैचारीक विरोध असतो, उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालोय, कारण त्यांनी दुसरा विचार पकडलाय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाने आता टोक गाठलं आहे. रोजच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चढत असतानाच राज्याच्या राजकारणात नवे ट्विस्ट येत आहेत. 
एकूणच राज्यातील सध्याच्या राजकिय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत लोकांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे मत बनले आहे त्याचे परिणाम भाजप ला देखील होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सोसावे लागतील की काय? अशी भाजप च्या नेतृत्वाला शंका आहे म्हणून यापुढे ठाकरेंनाच मित्र म्हणून लोकांच्या मनातील आपल्या बद्दलची झालेली भावना सॉफ्ट करण्याची यातून फडणवीस खेळी खेळत असल्याचे जाणकार सांगत आहेत

No comments:

Post a Comment