Thursday, October 31, 2024

नवाब मलिक यांचे फडणवीस व अजित पवारांबद्दल मोठे वक्तव्य ; काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
राजधानी मुंबईतील काही महत्वाच्या मतदारसंघावर राज्याचे लक्ष लागले असून माजी मंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार नवाब मलिक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अजित पवारांच्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार नाही, भाजपा नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशा शब्दात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता, नवाब मलिक  यांनी आपल्या उमेदवारीवर भाष्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मानखुर्द शिवाजीनगरचा मी उमेदवार आहे, आणि निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहे. माझ्या उमेदवारीला पक्षाकडून विरोध होण्याचं काही कारण नाही, कारण पक्षाकडूनच मला एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे म्हणत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी आपल्यासोबत असल्याचे आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

मला नशा मुक्त मानखुर्द-शिवाजीनगर करायचा आहे आणि त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. समाजवादी पक्षापासून लांब राहा असं मी स्पष्टपणे सांगत आहे. कारण समाजवादी पक्षाच्या कार्यालयात नशा पान सुरू असल्याचे पाहायला मिळते, असे म्हणत मलिक यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला.  दरम्यान, मदरशांमध्ये जिहाद सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला, तो चुकीचा आहे. मदरशा म्हणजे शाळा, शाळेमध्ये अशा गोष्टी कशा काय होऊ शकतात?, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी एका वाहिनिशी बोलताना दिली आहे.  
अजित पवार यांची तुमच्यामुळे अडचण होऊ शकते, या प्रश्नावरही मलिक यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय. अजित पवार हे महाराष्ट्राचे चंद्रबाबू नायडू आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी आतापर्यंत जितकं कोणी काही केलेलं नाही, तितकं अजित पवार यांनी केलं आहे. मौलाना आझाद महामंडळाबाबतचा निर्णय मी माझ्या कार्यकाळात घेतला होता, यासोबतच शाळातल्या शिक्षकांचे पगार वाढ करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या होत्या. अजित पवार कायम अल्पसंख्यांक समुदायाच्या पाठीशी राहिले आहेत, विशाळगड घटना, सातारा दंगल आणि मीरा रोड येथील दंगल या ठिकाणी अजित पवारांनी स्वतः लक्ष घातलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. भविष्यात अजित पवारांशिवाय सरकार बसू शकणार नाही असेही मलिक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

Wednesday, October 30, 2024

शेतकरी, युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील:इंद्रजीत गुजर , : कराड दक्षिणसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी

वेध माझा ऑनलाइन।
शेतकरी नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने उभारली असून त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. अशा संघटनेत राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रवेश केला असून शेतकऱ्यांसाठी काहीतरी योगदान देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी युवकांच्या विविध प्रश्नांसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इंद्रजीत गुजर यांनी  अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना तिसऱ्या आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्यासह तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नोकरी, उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्नशील
आज शेतकऱ्यांचे  अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सांगत गुजर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. सर्वसामान्य लोकांच्याही अनेक समस्या आहेत. तसेच आपल्या भागातील युवकांना नोकरी, व्यवसायासाठी इतरत्र जावे लागते. मात्र, त्यांना याच ठिकाणी नोकरी मिळावी. उद्योग, व्यवसाय करता यावा. यासाठी आपण प्रयत्नशील असून कराड तालुक्यात उद्योग, व्यवसायाच्या, तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

अजितअप्पा चिखलीकर यांच्या महिलांबाबत केलेल्या" त्या' वक्तव्याचा आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निषेध ; वेध- माझा च्या प्रश्नाचे उत्तर देताना व्यक्त केला निषेध ;

वेध माझा ऑनलाइन।
बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल विखे पाटील स्टेजवर असताना खालच्या पातळीवर टीका होते महिलांबद्दलच्या अशा वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे आ पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले.... पत्रकारांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी आ चव्हाण यांनी आज संगम हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते... त्यानिमित्त ते बोलत होते...याच त्यांच्या बोलण्याचा धागा पकडत...कराडात काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार चव्हाण समर्थक अजित अप्पा चिखलीकर यांनी देखील महिलांबद्दल जे वक्तव्य केले होते त्याचा भाजप महिला आघाडी कडून निषेध व्यक्त करून अजित अप्पा चिखलीकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी झाली होती... तुम्ही जसे बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबाबत झालेल्या विधानाचा निषेध करत आहात...तसा अजित अप्पा चिखलीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करता का...असा प्रश्न वेध माझा ने आ चव्हाण यांना विचारला तेव्हा आ चव्हाण यांनी चिखलीकर यांच्या वकव्याचा जाहीर निषेध करतो असे सांगितले..

आ चव्हाण समर्थक अजित अप्पा चिखलीकर यांनी कोग्रेसच्या मेळाव्यात महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्यानंतर महिलांबद्दलच्या या वक्तव्याबाबत चर्चेचे मोठे वादळ उठले होते... अनेक संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या...त्याबद्दल भाजप महिला आघाडी ने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील केली होती... त्यावर काँग्रेसकडून मात्र कोणताही निषेध व्यक्त करण्यात आला नव्हता... मात्र आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेध- माझा च्या प्रश्नावर उत्तर देताना आ पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितअपा चिखलीकर यांच्या वकव्याचा जाहीर निषेध नोंदवला...

Monday, October 28, 2024

विराट जनसमुदायाच्या साक्षीने सत्यजीत पाटणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वेध माझा ऑनलाइन।
सर्वसामान्य जनता ज्यावेळी निवडणूक आपल्या हातात घेते, संघर्ष करते आणि सत्ताधाऱ्यांचे गद्दारी, मलिदा, टक्केवारी, कमिशन हुकूमशाहीचे राजकारण उध्वस्त करण्यासाठी समोर येते, त्यावेळी विजय हा नैतिकतेचा आणि चांगल्या उमेदवाराचाच होतो. १९८३ साली माझ्या बाबतीत जे घडलं तेच आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाबतही घडणार असून २३ नोव्हेंबरला सत्यजितसिंह पाटणकर हेच पाटण विधानसभेचे आमदार होतील आणि तुम्हा आम्हा सर्वांचेच स्वप्न साकार होऊन हुकूमशाहीतून पाटणची कायमची सुटका होईल, असा विश्वास माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला. पाटणमध्ये आज सत्यजित पाटणकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले की, हल्ली राजकारण घाणेरडं बनलं किंवा बिघडलं आहे. अशी सगळ्यांचीच तक्रार असते, मात्र जर आपणच चांगले उमेदवार निवडून दिले नाही तर हीच वेळ येते. त्यामुळे आता पक्ष कोणता याही पेक्षा व्यक्ती कोणती बघा संस्कार, चारित्र्य, कर्तृत्व आणि समाजासाठीचे योगदान हे बघा. दहा वर्षात पाटण मतदारसंघ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. ज्यांनी विकास थांबवला त्यांना आता जाब विचारा, आणि नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा उर्वरित वीस दिवसात तुमचा हक्काचा आमदार करा आणि आपल्या सर्वांचं आदर्श भवितव्य घडवा. प्रत्येक मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचा, मतदारांना दडपण, आमिष येतील मात्र त्यांना एक सांगा गुप्त मतदान असल्याने कोणालाही घाबरायचं कारण नाही. आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्या, विजय आपलाच आहे अपक्ष म्हणून चिन्ह काय ते येणाऱ्या काळात कळेल पण प्रत्येक जण मीच उमेदवार या भावनेने कार्यरत राहिला तर निश्चित विजयाचा गुलाल आपल्याच अंगावर पडल्याशिवाय राहणार नाही.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले  खोके, भ्रष्टाचार, मलिदा,टक्केवारी, कमिशन, बार दारूची दुकाने, गद्दारी, बेरोजगारी, सत्तेची मस्ती, पैसा अशा अपपप्रवृत्तीं विरोधात आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे. समोरचा उमेदवार आपल्यासाठी बंदूक ठासून उभा आहे आणि शिकार करणार असं जरी सांगत असेल तरी देखील शिकार करणे हा आपला धर्म आहे. आता तर माझ्या हजारो बंधू-भगिनींनी गद्दारांची शिकार करण्याचा निर्धार केला असून हा जोश बघितल्यानंतर समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. स्वाभिमानाचा बार कधीही फुसका जात नाही त्यामुळे आता शिकार्‍याचीच शिकार केल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही.
आपल्याला मिळणारी सहानुभूती, वैचारिक पाठिंबा लक्षात घेता या मंडळींनी पैसे वाटायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केल्याच्या चर्चा आहेत. आपल्याच खिशात हात घालून मिळवलेला पैसा, मलिदा गॅंगच्या माध्यमातून टक्केवारी, कमिशन, बुरशीचे लाडू, साखर, पैसे, टी-शर्ट, पेढे आदी अमिषं वाटली जात असतील वेळप्रसंगी पैसा घ्या कारण तो त्यांच्या हरामीचा पैसा आहे. त्यांनी आता वाट्टेल की आमिष देत दबाव, दडपण आणले तरीही स्वाभिमानाचा गुलाल आपलाच झाला पाहिजे याची खूणगाठ बाळगा. इथून जाताना एकच लक्षात घ्या तुम्हीच सत्यजित, तुम्हीच उमेदवार आणि तुम्हीच उद्याचे आमदार या भावनेने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा.फाजील आत्मविश्वास नको, रात्रीचा दिवस करा २२ दिवसात नव्याने मतदार संघ पिंजून काढा. मी पाच वर्षे तुमच्या पाठीशी रात्रंदिवस राहीन याची खात्री देतो. निवडणूक आता सर्वसामान्य जनतेने हातात घेतल्याने आपापसातील राजकारण, भांडण, मतभेद, नाराजी विसरा. पुढचा काळ आपलाच आहे त्यामुळे प्रत्येकाशी संवाद साधा, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिल्याचा प्रचार होईल मात्र आपल्याच खिशातून त्यांनी हजारो रुपये काढलेत याचाही विचार पोहोचवा. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या चुरशीने मतदान होते तीच चुरस या निवडणुकीतही दाखवा. हीच वेळ आहे या गद्दारांना उलथून लावण्याची त्यामुळे १९८३ प्रमाणेच स्वाभिमानी जनता येथे क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पाठीशी टायगर अभी जिंदा है हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापल्या भूमिका चोख पार पाडा.


कराडात भाजपा, राष्ट्रवादीच्या समर्थकांमधे दत्त चौकात झाला राडा ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा
भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी सकाळी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांचे समर्थक दत्त चौकात आले. त्याचवेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार बाळासाहेब पाटील हे शक्तीप्रदर्शन करत दत्त चौकात दाखल झाले होते. दोन्ही बाजुचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर झेंडे फडकावत दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. त्यातून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावन गेल्याने त्यांच्यात राडा झाला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
दत्त चौकात बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवलं. पोलिसांनी बळाचा वापर करताच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची पांगापांग झाली.

आ पृथ्वीराज चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; बाबा म्हणाले...राज्याला लागलेला गद्दारीचा डाग पुसून काढला जाईल ;

वेध माझा ऑनलाइन।
आज मि साधेपणाने माझा निवडणुकीचा अर्ज भरला आहे जरी या मतदार संघात 7 ते 8 अर्ज दाखल झाले असले ही निवडणुक विचाराच्या लढाईची आहे जातीयवाद रोखण्यासाठी माझी उमेदवारी आहे लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे राज्याच्या सत्तेला लागलेला गद्दारीचा डाग आता नक्कीच पुसला जाईल असा विश्वास आ पृथ्वीराज चव्हाण यानी यावेळी व्यक्त केला...


Sunday, October 27, 2024

संभाजीराजे कोल्हापुरातून लढणार नाहीत! मग कोठुंन लढणार ?

वेध माझा ऑनलाइन।
परिवर्तन महाशक्तीमधून तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत न जाता परिवर्तन महाशक्तीमध्ये माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू आदी नेत्यांनी एकत्रित महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांची  विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली असतानाच आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र संभाजीराजे यांनी कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. 

संभाजीराजे यांनी नाशिक आणि इतर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे अंतिम निर्णय मंगळवारी घेणार असल्याचं त्यांनी सांगत अजून एक द्विधा मनस्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार गटाची दूसरी आणि तिसरी उमेदवार यादी ;

वेध माझा ऑनलाइन।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी 
1. एरंडोल -सतीश अण्णा पाटील 
2.  गंगापूर -सतीश चव्हाण 
3.  शहापूर -पांडुरंग बरोरा
4. परांडा- राहुल मोटे 
5.  बीड -संदीप क्षीरसागर 
6.  आर्वी -मयुरा काळे 
7. बागलान -दीपिका चव्हाण 
8.  येवला -माणिकराव शिंदे 
9. सिन्नर- उदय सांगळे
10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर 
11. नाशिक पूर्व- गणेश गीते
12. उल्हासनगर- ओमी कलानी 
13.  जुन्नर- सत्यशील शेरकर 
14.  पिंपरी सुलक्षणा- शीलवंत 
15. खडकवासला -सचिन दोडके
16. पर्वती -अश्विनीताई कदम 
17. अकोले- अमित भांगरे 
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर 
19. माळशिरस- उत्तमराव जानकर 
20. फलटण -दीपक चव्हाण 
21. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर 
22. इचलकरंजी- मदन कारंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी
१. करंजा - ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट - अतुल वांदिले
3. हिंगणा - रमेश बंग
4. अणुशक्तीनगर - फहाद अहमद
5. चिंचवड - राहुल कलाटे
6. भोसरी - अजित गव्हाणे
7. माझलगाव - मोहन बाजीराव जगताप 
8. परळी - राजेसाहेब देशमुख 
9. मोहोळ - सिद्धी रमेश कदम

मोदी सरकारने जम्मू कश्मीर बद्दल मोठा निर्णय घेतला ;

वेध माझा ऑनलाइन।
काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी केंद्रात करार झाला आहे. त्याचबरोबर लडाख हा केंद्रशासित प्रदेश राहील. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचा प्रस्ताव आणला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी 23 ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शहा आणि 24 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान ओमर यांनी पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची विनंती केली होती. त्यांना या वर्षी राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन मिळाले होते. 2019 मध्ये, जेव्हा कलम 370 आणि 35A हटवण्यात आले, तेव्हा जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्यावर पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन सरकारने त्यावेळी दिले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने याचीच पुनरावृत्ती केली होती. निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून लेफ्टनंट गव्हर्नर यांच्याकडे पाठवण्यात आला. 19 ऑक्टोबरला प्रस्ताव मंजूर केल्यानंतर एलजी मनोज सिन्हा यांनी तो गृह मंत्रालयाकडे पाठवला.

अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रणांगणात ; युगेन्द्र पवार यांच्या वडिलांनी फोड़ला प्रचाराचा नारळ ;

वेध माझा ऑनलाइन।
देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकांमध्येही चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकींवेळी ननंद विरुद्ध भावजय असा सामना बारामती मतदारसंघात अत्यंत लक्षवेधी झाला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीला काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार  निवडणुकीच्या रणांगणात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता प्रचारालाही वेग आला आहे. युगेंद्र पवार यांचे वडिल आणि अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी मुलासाठी प्रचाराचा नारळ फोडला. लेकासाठी बाप मैदानात उतरला असून भावाविरुद्ध दंड थोडपले आहेत. त्यामुळे, बारामतीत निवडणुकीमुळे भावाची भावकी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पृथ्वीराज चव्हाण उद्या अर्ज दाखल करणार ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड  दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे  महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कराड येथील निवडणुक अधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दिपावली सणाच्या अनुषंगाने व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करून शक्तीप्रदर्शन न करता मागच्या वेळी सारखेच यावेळी सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने आ. पृथ्वीराज चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तरी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील  महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.

उदयनराजे भाजपा चे स्टार प्रचारक ; आणखी कोंण कोंण आहे?

वेध माझा ऑनलाइन ।
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि आघाडीत जागा वाटपांचा घोळ सुरूच असल्याने सातारा जिल्ह्यातील तिढ्यांच्या जागांचा फैसला झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू आहे. दोन दिवसात हा घोळ संपवावा लागणाार आहे. तरच सोमवारी-मंगळवारी अर्ज भरता येणार आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांची निवड या दरम्यान, भाजपने देखील पक्षातील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले  यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे.

या यादीत देवेंद्र फडणवीस, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, नारायण राणे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे- पाटील, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहळ, अशोक नेते, डॉ. संजय कुटे, नवनीत राणा यांचा समावेश आहे.

पाटणला शंभुराजे देसाई, सत्यजीत पाटणकर,आणि हर्षल कदम उद्या भरणार अर्ज ;

वेध माझा ऑनलाइन।
पाटण विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान अर्ज भरण्याच्या सुरुवातीपासून दिग्गज मंडळींपैकी एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्यास दोन दिवस उरले असताना उद्या सोमवार दि. सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर, महाविकांस आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे अमित कदम ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जावळी विधानसभा मतदार संघात महायुतीने यापूर्वीच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी तर्फे अर्ज भरण्यास काही दिवस उरले असताना देखील उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित कदम यांना सातारा जावळीची उमेवारी देण्यात आली. तत्पूर्वी कदम यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन सन्मानपूर्वक शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने उमेदवारी लढवण्यासंदर्भात एबी फॉर्मदेखील देण्यात आला. त्यामुळे आता सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध अमित कदम असा दुरंगी सामना रंगणार आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, महाविकास आघाडीने मात्र उमेदवार ठरवण्यात विलंब केला. त्याबाबत शनिवार, रविवार मुंबई येथे महाविकास आघाडीमध्ये अनेक राजकीय खलबते झाली. प्रामुख्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाईल असे राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सोडला गेल्याने दोन दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी मुंबईमध्ये घडल्या.

कराड उत्तर मधुन मनोज घोरपड़े याना भाजपा चे टिकिट ; उद्या भरणार अर्ज ;

वेध माझा ऑनलाइन।
जिल्ह्यातील बहुचर्चित कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे निवडणुक प्रमुख मनोज घोरपडे या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर आज यश आले असून शनिवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी कदम आणि घोरपडे यांनी पक्ष बांधणीसाठी आपापल्या परीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सोबतच गत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी दोघांनीही केलेल्या नियोजनबद्ध कामाची चर्चा केली.
यावेळी फडणवीस यांनी अनेक वर्षे आपण संघर्ष करत आहात. आता या संघर्षातून महायुतीला एक आमदार मिळणार आहे. त्यासाठी मनोज घोरपडे हेच उमेदवार असतील. त्यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणुन अर्ज भरावा. त्यांना ए बी. फॉर्म देण्याची व्यवस्था केली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच येत्या काळात धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्या पक्ष कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल असे फड़नवीस म्हणाले

फलटण मध्ये खरी लढत शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गटाची ;

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचं गुऱ्हाळ चालू आहे. या दोन्ही आघाड्यांत जागावाटपाचा नेमका फॉर्म्यूला अद्याप समोर आलेला नाही. ज्या-ज्या जागांवर तोडगा निघालेला आहे, त्या-त्या जागांवर वेगवेगळे पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाने नुकतेच आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाईनंतर फलटण विधानसभा मतदार संघ हा अजितदादा गटाकडे आला असून या मतदार संघातून सचिन पाटील यांना उमेद्वारी देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे दीपक चव्हाण विरुद्ध अजित पवार गटाचे सचिन पाटील कांबळे अशी लढत होणार आहे
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली आहे. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू केले. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. मात्र, ऐनवेळी आता जागा वाटपात फलटण विधानसभा मतदार संघ हा अजितदादा पवार गटाकडे गेला आहे. त्यामुळे या मतदार संघातून अजित पवार गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवार यादीत सचिन पाटील कांबळे यांचे नाव आहे.

अमित ठाकरेना महायुती पाठीम्बा देणार ; सदा सरवनकर माघार घेणार ?

वेध माझा ऑनलाइन।
माहिमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आला आहे. आपल्याच घरातील मुलगा निवडणूक लढवत असेल तर महायुतीने त्याला पाठिंबा देऊन का निवडून आणू नये, असं आशिष शेलार म्हणाले. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाच ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी मनसेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. माहीममध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा अमित ठाकरेंचा प्रस्ताव आहे. पण एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेणार का? हा प्रश्न आहे. तर शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांना भाजप पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिवडीची जागा भाजपकडे असून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देत प्रचारही केला होता. त्याचीच परतफेड म्हणून माहिमसह शिवडीमध्ये मदत करण्याची रणनिती भाजपची दिसतेय. मात्र माहिममध्ये सदा सरवणकर यांची उमेदवारी रद्द करण्याच्या मूडमध्ये शिंदेंची शिवसेना दिसत नाहीये.

नवाब मलीक अपक्ष लढणार ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
जवळपास दोन वर्षांनंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे माध्यमांशी बोलले. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाची विनंती अमान्य करत नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजी नगर विधानसभेतून अपक्ष अर्ज भरणार असून ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अजित पवारांच्या नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेऊन निवडणूक न लढण्याची विनंती केली होती. मात्र नवाब मलिक अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे आता त्यांचा विधानसभेचा मुकाबला मविआचे घटक पक्ष असलेल्या सपाच्या अबू अझमींशी होणार आहे. नवाब मलिक यांना भाजपमध्ये घेण्यात भाजपचा विरोध आहे. कारण भाजपने नवाब मलिक यांच्यावर विविध आरोप केले होते. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी मलिक हे अनेकदा अजित पवारांना भेटले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्या मुलीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अणुशक्तीनगर येथून निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. म्हणजेच मलिकांची मुलगी आता एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीची उमेदवार असणार आहे. मात्र नवाब मलिक आता अपक्ष लढणार आहेत. तर त्यांचा मुकाबला महायुतीशी नाहीतर महाविकास आघाडीशी होणार आहे.

Saturday, October 26, 2024

अविनाश मोहितें आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी ;

वेध माझा ऑनलाइन।
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला.

अविनाश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खा. शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी हा घटक पक्ष बरोबरीने काम करत आहे. या पक्षात अविनाश मोहिते यांच्याकडे प्रदेश स्तरावरील जबाबदारी आहे. गेल्या महिन्यात खा. शरद पवार हे रेठरे बुद्रुक येथे अविनाश मोहिते यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीमध्ये श्री. मोहिते यांनी कृष्णा कारखान्याचे संस्थापक आबासाहेब मोहिते यांचे आणि शरद पवार यांचे ऋणानुबंध असणारे जुने छायाचित्र खा. पवार यांना भेट दिले. 
अशाच पद्धतीने काल श्री. मोहिते यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस आ. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी अॅ ड.  उदयसिंह पाटील - उंडाळकर, अविनाश मोहिते, जगन्नाथ मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, जयेश मोहिते, शिवराज मोहिते, अजितराव पाटील - चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, शिवाजीराव मोहिते, अॅ ड. नरेंद्र नांगरे - पाटील, डॉ. अजित देसाई, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर्व माजी संचालक तसेच संस्थापक पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. विदर्भ व मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. कराड दक्षिणमध्ये खऱ्या अर्थाने विचारांची लढाई आहे. यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण व आबासाहेब मोहिते हे विशिष्ट विचाराने लढले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासाचा मूलभूत विचार कधी सोडला नाही. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामुळे या विभागात सहकार चळवळ उभी राहिली. परंतु विभागातील सहकारी संस्थांचे जाळे वेगळीच लोक घेवून त्यांनी राजकीय सत्तेकरिता ही केंद्रे आर्थिक सत्ता बनविण्याचे समीकरण महत्वाचे मानली आहे. ही प्रवृत्ती आपल्याला इथेच थांबवली पाहिजे. 

ते म्हणाले, गेली दहा वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सर्वांना खूप त्रास झाला. व विकासकामे करण्यातही त्यांनी अडवणूक केली. राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. व कराड दक्षिणमधील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना झुकते माप दिले जाणार आहे. 


घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

वेध माझा ऑनलाइन।
मलकापूर-आगाशिवनगर येथे गेल्या काही महिन्यांपासून घारफोड्याचे सत्र सुरु होते. दरम्यान, मागील महिन्याभरापूर्वी आगाशिवनगर येथील आयोध्या नगरीतील लोक वस्तीमध्ये व शास्त्रीनगर मलकापूर येथे घरफोडीचा प्रकार झाला होता. याठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

परशुराम बुटाप्पा ओलेकर (रा. शिंदगी ता. जि. विजापूर, राज्य कर्नाटक) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, मागील महिन्याभरापूर्वी आगाशिवनगर येथील आयोध्या नगरीतील लोक वस्तीमध्ये व शास्त्रीनगर मलकापूर येथे घरफोडीचा प्रकार झाला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या टीमला सदर घटनेचा तपास करुन संशयित आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने अशोक भापकर व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यातील संशयितास सांगली जिल्ह्यातील मिरज येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केला असता परशुराम ओलेकर याने मलकापूर व आगाशिवनगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले अकरा लाख 16 हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर,
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आबले, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, निखिल मगदूम, पोलीस हवालदार शशि काळे, अमित पवार, अशोक वाडकर, अनिल स्वामी, कुलदीप कोळी, संदीप कुंभार, अमोल देशमुख, मोहसीन मोमीन, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, हर्षल सुखदेव, आनंदा जाधव, मुकेश मोरे, प्रशांत वाघमारे, सपना साळुंखे, सोनाली पिसाळ यांनी केली.

सरकारकडून सवंग लोकप्रियतेसाठी विविध योजनांच्या घोषणा ; आ बाळासाहेब पाटील यांची टिका;

वेध माझा ऑनलाइन।

राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजा याकडे सरकारचे लक्ष नसून, निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी विविध योजनांची घोषणा सरकारकडून होत आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले, ते खटाव तालुक्यातील लाडेगांव व रेवली येथील कार्यकर्त्याच्या बैठकीप्रसंगी बोलत होते

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्रदादा पवार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, सुरेश पाटील (बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, राज्यात सत्ता परिवर्तनाचे वारे असून, महाविकास आघाडीचे लोकाभिमुख सरकार लोकांना अपेक्षित आहे. त्याकरीता आपण सर्वानी आपआपसातील मतभेद विसरून विकासाच्या पाठीशी खंबीरपेणे उभे रहा. असे सांगून, लाडेगाव आणि परिसराशी कारखान्याच्या माध्यमातून असलेला जिव्हाळा, मतदार संघाच्या पुनर्रचनेत अधिक मजबूत झाला, मला मिळालेल्या अधिकारातून उपलब्ध होणारा विकास निधी मी मतदार संघातील जनतेसाठी 100 टक्के विनियोग करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मंत्रिपदाचा कार्यकाळ अजून राहिला आसता तर लक्षणीय विकासकामे करता आली असती, असे सांगून येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ ‌द्या आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले 

प्रास्ताविक कृष्णत पाटील यांनी केले व आभार संतोष कदम यांनी मानले. 

कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार (दादा), सुरेश पाटील (बापू), कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण (खोडशी), विलास शिंदे, मोहम्मद आवटे, दत्तात्रय रुदृके, सुरेश कदम, उपसरपंच सागर दीक्षित सावळा बाबू यादव, रामचंद्र वाईकर, विष्णू वाईकर, बाळासाहेब यादव, बबन सुतार, माजी सरपंच संतोष कदम, उत्तम यादव (तात्या), कृष्ण पाटील, साईनाथ यादव, दीपक राऊत (फौजी), कुंडलिक घाडगे बाबासो यादव, शिवाजी दबडे, नाथा यादव, अनिल उमापे, बाळासो उमापे, सचिन यादव, हणमंत घाडगे, भीमराव तिडके योगेश यादव जयवंत यादव गणेश यादव यांचेसह लाडेगाव व रेवली येथील ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडच्या राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टिच्या मेळाव्यात ठरल ; अजितदादांचा आदेश येईपर्यन्त कोणाच्याही स्टेजवर जायच नाही ;


वेध माझा ऑनलाइन।।
राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामधील अजितदादा गटाचे देखील महत्व आहे तरी देखील कराड दक्षिणमधे या गटाला विश्वासात घेतले जात नाहीये अशी सध्याची परिस्तिथि आहे लोकसभा निवडणुकीत खा उदयनराजे भोसले यांचा विजय हा जिल्ह्यातील अजितदादा गटाच्या निर्णायक मतांमुळे झाला आहे... तसेच विधानसभा निवडणुकीत देखील कराड दक्षिणचा आमदार आमचा गटच ठरवनार आहे त्यामुळे अजितदादा यांचा आदेश येईपर्यन्त आपल्या गटाचा कार्यकर्ता कोणत्याही उमेदवाराच्या स्टेजवर जाणार नाही असे आदेश या गटाचे नेते राजाभाऊ उडाळकर व विजयसिंह यादव यांनी कार्यकर्त्यांना दिले 

सध्या विधानसभा निवडणुकीचे पड़घम वाजले आहेत कराड दक्षिण मध्ये कोंग्रेस विरुद्ध भाजपा अशी प्रमुख लढत होत आहे या दोन्ही पक्षांचा जोरदार प्रचार देखिल मतदार संघात सुरु आहे राजकीय मिळावे देखील याच धर्तीवर ठीकठिकाणी पार पड़त आहेत

आज पंकज होटेल या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला त्यावेळी राजाभाऊ उडाळकर व विजुभाऊ यादव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी शहर व ग्रामीण परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

जिथे सन्मान नाही त्याठिकाणी जायच नाही  अजितदादा हे स्वाभिमानी कार्यकर्त्यांचे नेते आहेत आपल्या निर्णायक मतांवर या मतदार संघाचा आमदार कोंण होणार हे ठरणार आहे इथली परिस्थिति दादांच्या कानावर घातली आहे... त्यांचा येईल तो आदेश पाळायचा आहे... असा एकूणच सुर या मेळाव्यातुन आला... यावेळी शहर व ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

आमदार बाळासाहेब पाटील सोमवार दिनांक २८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

वेध माझा ऑनलाइन।
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने, सोमवार दिनांक २८-१०-२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, कराड येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तसेच अर्ज दाखल करून दुपारी २.३० वाजता कराड येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या शेजारील पटांगणात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तसेच कराड, कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यातील मतदार संघातील विविध गावचे ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी दिली. 

यावेळी आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांचे निवासस्थान, मंगळवार पेठ कराड येथून मुख्य रस्त्याने सकाळी ११.३० वाजता रॅलीस सुरुवात होणार असून, या रॅलीमध्ये सहभागी होऊन आमदार बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि तद्नंतर होणार्या भव्य सभेसाठी सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ११.३० वाजता आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांचे निवासस्थान, मंगळवार पेठ, कराड येथे हजर रहावे असे आवाहन कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांनी केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...; मला लोकांनी दोन दोन वेळा विधानसभेत पाठवले आतापण... माझ्या पाठीशी जनता उभी राहील ;

वेध माझा ऑनलाइन।
 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 1800 कोटीची विकासकामे केली. विकासकामे सुचविण्याचा अधिकार राज्यघटनेने लोकप्रतिनिधीना दिला आहे. विकास कामाच्या जीवावरच मला लोकांनी दोन वेळा लोकसभेत आणि दोन वेळा विधानसभेत पाठवले. पुन्हा काँग्रेसच्या पाठीशीच कराड दक्षिणची जनता उभी राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील बेलवडे (ता. कराड) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी शिवाजीराव थोरात, पै. नानासो पाटील, नितीन थोरात, जखिणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, भगवान मोहिते, शहाजी मोहिते, माणिकराव मोहिते, भास्करराव मोहिते,  धनाजी थोरात, युवक काॅंग्रेसचे देवदास माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवाजीराव मोहिते म्हणाले, आमच्या गावात 2018 साली मोठ्या शब्दात विरोधकांनी विकासकामांचा बोर्ड लावले. मात्र, आजही ते काम झाले नाही. अॅड. उदयसिंह दादा आणि आ. पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून आम्ही बेलवडे गावातून काॅंग्रेसला मोठे मताधिक्य देवू. 

भगवानराव मोहिते म्हणाले, काले जिल्हा परिषद गटात कोणत्याही रस्त्याला खड्डा दिसत नाही. आ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून वाडी- वस्तीवर 100 टक्के रस्ते पूर्ण झाले आहेत. निवडणुकीचा हंगाम आल्याने काहीजण इकडे- तिकडे करत असतील. नेते कुठेही जावू द्या, पण कार्यकर्ते पृथ्वीराज बाबांसोबतच आहेत. आमच्या नेत्यांनी लावलेले बोर्ड हे विकासकामे पूर्ण तसेच वर्कआॅर्डर घेतलेले आहेत. विरोधकांचे बोर्ड हे निवडणुकीत आश्वासन देण्यापुरतेच आहेत. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मला कराड दक्षिणच्या जनतेने भरभरून आशिर्वाद दिला. मी मुख्यमंत्री असताना विकासकामे मोठ्या प्रमाणावर आणली. त्यानंतर भाजपाचे 10 वर्ष सरकार असून त्यांनी विकासकामे देताना आडकाठी आणली. परंतु, तरीही मी विकासकामे आणली आणि पूर्ण केली. केवळ निवडणुकीत दाखविण्यासाठी बॅंनरबाजी किंवा नारळ फोडले नाहीत. 

बेलवडेत पक्षप्रवेश आणि पाठिंबा

भारतीय किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गेली अनेक वर्ष डाॅ. अतुल भोसले यांच्या सोबत असलेले बेलवडे येथील प्रदीप मोहिते यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तर दिलीप सकटे यांनी पाठिंबा दिला.  


Thursday, October 24, 2024

अतुलबाबांना पाठीम्बा ; राजेन्द्र यादव यांची पत्रकार परिषदेत माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) व अन्य घटक पक्षांच्या माध्यमातून लढवण्यात येत आहेत. त्यानुसार आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा आदेश दिला असून त्यानुसार  महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी केली.

कराड दक्षिणमधील महायुतीच्या उमेदवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, राहुल खराडे, सुधीर एकांडे त्यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. यादव म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे समन्वयक म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष, गटतट, पदाधिकारी यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. विधानसभेत महायुतीचे सरकार आल्यावर शहराचा  कायापालट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, कराड शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माझ्यासह यशवंत विकास आघाडीतील सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 209 कोटींचा निधी मिळाला आहे. यावरच न थांबता येणाऱ्या काळात 300 ते 350 कोटींच्या निधीची कामे प्रस्तावित आहेत. त्यापेक्षा आणखी जास्त निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

डॉ अतुल भोसलेना निवडून देवून कराड दक्षिणमध्ये परिवर्तन करा ; खासदार उदयनराजे भोसलेंनी केले आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन।
डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन करण्याची ही संधी असून या ठिकाणी डॉ भोसले यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले व कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसलेयांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी वारकरी, माजी सैनिक, शेतकरी आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, आप्पा माने अतुल शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने सत्ताकाळात लाडकी बहीण योजना का राबवली नाही? एखादा प्रोजेक्ट लांबणीवर पडल्याचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले गेले. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांना दोषी मानता येणार नाही. राष्ट्रवादीने सत्ताकाळात प्रकल्प रखडवले, नवीन योजना आणल्या नाहीत, विकास खोळंबला. त्यामुळेच आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर फुटाफुटीचे प्रकार घडत आहेत. परंतु, लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. अशांना खरंतर नोबेल पारितोषिक द्यायला हवे, असे टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महायुती सरकारकडे आपण मागितलेल्या विकासकामांसाठी आतापर्यंत एकूण 745 कोटी 87 लाख रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. त्यातील बहुतांश कमी आज पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. कराडमधील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटींच्या निधीची तरतूद आहे. परंतु, विरोधकांनी केवळ दहा लाखांची तरतूद असल्याचे जाहीर व्यासपीठावर सांगितले. स्वतःला मोठा नेता समजणाऱ्यांनी शासन निर्णय न पाहता असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावत आतापर्यंत माहिती सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणा व व निधीच्या तरतुदीबाबत सर्वांसमोर पुराव्यांनिशी आकडेवारी सांगितली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्याचा समाचारही त्यांनी यावेळी घेतला.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराडच्या एमआयडीसीची सुधारणा करून प्रशस्त रस्ते, सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. नवीन उद्योग व गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण कराडची ओळख असून त्यांच्या आदर्शनुसार विकासनिधी आणण्यावर प्रयत्न करणार आहे. कराड दक्षिणचा काय पलट करणार असून कराडला रिंग रोड करण्याचा प्रयत्न राहील. नॅशनल हायवेपासून खोडशी ते कराड असा नवीन पुल उभारण्याचा अजेंडा आहे. त्याचबरोबर कृषीवर आधारित उद्योगधंदे निर्माण करणे, कृष्णा कारखान्यामार्फत इंडियन ऑईलच्या माध्यमातून बायो सीएनजी प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करणे, ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि अध्यात्मिक पर्यटन करण्यावर भर देण्यात येणार आहे.
तसेच कराड दक्षिणमधील भाजपमध्ये एकमत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, नव्हते आणि राहणार नाहीत, असे डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले. 



सोशल मिडियावर फिरणार ती पोस्ट खोटी ; विक्रम पावसकर
डॉ. अतुल भोसले यांनी विक्रम 
पावसकर यांचा विधान परिषदेचा पत्ता कट केला. अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे. यावर बोलताना विक्रम पावसकर यांनी ती पोस्ट खोटी असल्याचे सांगत डॉ. अतुल भोसले हे विधानसभेत जाणार असून तेच माझ्यासाठी शब्द टाकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Wednesday, October 23, 2024

डॉ अतुल बाबांचा अर्ज भरण्यासाठी उदयनराजे खास साताऱ्यातून कराडात दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
डॉ अतुल भोसले हे आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत त्यांनी साधेपणाने अर्ज भरण्याचे ठरवले असले तरी ते आज अर्ज भरत असल्याचे ज्यांना ज्यांना कळले ती सगळी लोक त्यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिले आहेत 

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित राहिले आहेंत 
उदयनराजे यांच्या लोकसभेतील विजयासाठी डॉ अतुल भोसलेचे योगदान खूप मोठे आहे आज उदयनराजे डॉ भोसलेंच्या वेळेला आवर्जून उपस्थित राहिले आहेत

आज डॉ अतुल भोसले आणि इंद्रजीत गुजर साधेपणाने आप- आपला उमेदवारी अर्ज भरणार

वेध माझा ऑनलाइन।
आज गुरुवारी भाजपा चे नेते डॉ अतुल भोसले आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत तसेच नगरसेवक इंद्रजीत गुजर देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत  हे दोघेही कोणताही गाजावाज़ा न करता किवा शक्ति प्रदर्शन न करता आप आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने भरणार असल्याचे समजते

आज गुरूवारी सकाळी 11,30 वाजता डॉ अतुल भोसले आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत कोणत्याही प्रकारचे शक्ति प्रदर्शन न करता ते अर्ज भरणार आहेत त्यानी या निवडणुकीसाठी आपली तयारी जोरदार सुरु ठेवली आहे त्यानी आपल्या प्रचारात अद्याप तरी आघाडी घेतल्याचे दिसते त्यांचे सोशल मिडियावर खुप मोठ्या प्रमाणात फैन फॉलोइंग असल्याचे दिसते युवकांचा महिलांचा तसेच सर्वच वर्गाचा मोठा पाठीम्बा त्याना मिलताना दिसतो आहे त्यामुळे मागच्या विधानसभेला राहिलेली केवळ काही मतांची मागील कसर यावेळी भरून काढून विजयी गुलाल खेचुन आननार असल्याची शपथ त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे 

नगरसेवक इंद्रजीत गुजर है देखील आज दुपारी 1 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यानी देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी करत मतदार संघ पिंजुन काढला आहे त्याना भागा भागात युवकांचा महिलांचा तसेच सर्वच वर्गाचा खुप मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे 
नुकतीच त्यांची शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी खास भेट घेवून निवडणुकी संदर्भात कमरा बन्द चर्चा केली होती गुजर है उद्धव ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते आहेत 

शिंदे गट ; पहिली यादी तयार ; 45 नावे जाहीर ; शंभुराजे आणि महेश शिंदे यांना उमेदवारी जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पक्षाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं त्या पक्षाने आता आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिंदेंनी 45 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. सातारा जिल्ह्यात पाटण मतदार संघातून शंभूराज देसाई तर कोरेगाव मतदार संघातून महेश शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून चाचपणी सुरु ; रात्रीच्या बैठका ; दिवसभरात गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु!

वेध माझा ऑनलाइन।

महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेनं नुकतीच आपली पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची देखील पहिली यादी जाहीर झाली. सातारा जिल्ह्यातील फक्त वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा यादीत समावेश आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधून उमेदवारी घोषित केलेल्या दीपक चव्हाण यांनी साथ सोडल्यानंतर येथील जागेला उमेदवारच उरला नसल्याने ती जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून चाचपणी सुरु असली तरी ‘उत्तर’ मात्र सापडेनासे झाले आहे.

कराड उत्तर या मतदारसंघात कायम जोरदार लढतीची चर्चा असते. पण ऐनवेळी ती विरून जाते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदार संघ तसा पहिला तर महायुतीत अजितदादा पवार गटाकडे जायला हवा. मात्र, या मतदार संघावर भाजप आणि आता शिंदे गट शिवसेनेने डोळा लावून बसल्याने या मतदार संघातील जागा वाटपाचे सूत्र अजूनही सुटलेले नाही. मात्र, सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. रात्रीच्या बैठका आणि दिवसभरात गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा घडामोडी या ठिकाणी घडत आहेत.

महाविकास आघाडीची प्रत्येकी 85 जागांवर सहमती - 18 जागा मित्रपक्षांना देणार -

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीमधील कॉंग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या तीनही पक्षांनी प्रत्येकी 85 जागांवर लढण्यास सहमती दर्शवली आहे. आघाडीतील इतर सर्व पक्ष समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट या पक्षांसाठी इतर जागा सोडण्यात येतील अशी माहिती, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्याची माहिती राऊत यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.


प्रत्येक़ी 85 जागा : 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत 85 जागा प्रत्येक पक्षाला असा निर्णय घेण्यात आलाय. 270 जागांवर सहमती झाल्यावर इतर 18 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येतील.

जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी ७ अर्ज दाखल ; वाचा सविस्तर ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ७अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी १, कोरेगावसाठी २ उमेदवारांचे ३, माणमधून १, कराड उत्तरमधून २ अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास काल दि. 22 ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 30 नामनिर्देशन पत्र वाटप झालेले असून, आज दुसऱ्या दिवशी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 15 जणांनी एकूण 22 नामनिर्देशनपत्राची खरेदी केली. दरम्यान, आज अखेर एकूण 52 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले आहे.


विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. आज दि. 23 ऑक्टोबर अखेर खुल्या प्रवर्गातील 30, अनुसूचित जातीतील 17, अनुसूचित जमाती ०, अपक्ष उमेदवार 23, पक्षीय उमेदवार 17 आदीकडून अर्ज खरेदी करण्यात आले.

यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज., महाराष्ट्र नवनिर्माण सेने पार्टीकडून 1 अर्ज,, वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षा कडून 1, भारतीय जनता पार्टी कडून 2 अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटणा यांचेकडून 1 अर्ज, अपक्ष-23 अर्ज असे अर्ज खरेदी केले आहेत.

अजितदादाना सातारा जिल्हयाला मिळाला नवा जिल्हाध्यक्ष : कोंण आहे ?

वेध माझा ऑनलाइन।
मागील वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीबरोबर गेले. त्यावेळी राष्ट्रवादीकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. दोन महिन्यांनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची नियुक्ती झाली. पण, वर्षभरातच जिल्हाध्यक्षांनी काडीमोड घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गेली दहा दिवसांपासून नवीन जिल्हाध्यक्ष नव्हता. मात्र, अजितदादांनी आता नवीन दुसरा जिल्हाध्यक्ष शोधला असून बाळासाहेब सोळसकर यांच्या नावावर त्यांनी आज शिक्कामोर्तब केले आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू व्यक्तिने पहाटे मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट: चर्चांना उधाण

वेध माझा ऑनलाइन
आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता अनेक नेते हे सावधगिरीचा पर्याय अवलंबताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये विविध पक्षातील आमदार, नेते हे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. या भेटीगाठी सहसा रात्री उशिरा किंवा पहाटे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. . त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.


लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी खबरदारी म्हणून अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मंगेश चिवटे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल रात्री शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर आज पहाटेच मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.

संजय राउत हा कुत्र्यासारखा...शहाजी बापूं पाटील यांची जीभ घसरली

वेध माझा ऑनलाइन।
संजय राऊत हा भुकणारा महाराष्ट्रातला कुत्र्यासारखा माणूस आहे. त्याचा फार विचार करण्याची गरज नाही’, असं वक्तव्य करत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. तर महाराष्ट्राला बौद्धिक दृष्ट्या भडकवणे, फेक नेरेटिव्ह तयार करणे, लोकांच्यात एक भीतीग्रस्त वातावरण तयार करणे आणि काम करत असलेल्या नेत्यांबद्दल कलुषित वातावरण निर्माण करून सत्तेची राजकीय पोळी भाजण्याचे काम संजय राऊत करत असल्याचा आरोपही शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊत हा आमदारांच्या मतावर खासदार होत आहे. त्याने नगरपालिकेत साधे नगरसेवकपदाला उभे राहून बघावे, असे म्हणत शहाजी बापूंनी संजय राऊतांना थेट आवाहन केले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या सांगोल्यात सभा होणार आहेत, याची मला कल्पना आहे. ते माझ्या विरोधात काय बोलतायत मी जर बोलायला लागलो तर ते येथून पळून जातील. परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंब आहे. त्यामुळे काही मर्यादा आम्ही पाळतो परंतु संजय राऊतवर बोलताना मी कसलीही मर्यादा पाळणार नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.

अजितदादा गटाकडून नवाब मलिक वेटिंगवर!

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत मुंबईतून कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. या यादीत सर्व मातब्बर नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पण नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे अजितदादा यांनी नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलिक यांना तिकीट मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.

अजितदादा बारामतीतूनच उभे राहणार : अजितदादा गटाची संपूर्ण यादी पहा..

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. महत्वाचा पक्ष असलेल्या महायुती सरकार मधील भाजप पक्षाने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीच्या जागेवर स्वत: अजित पवार लढणार असल्याचे या यादीमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय इतरही महत्वाच्या जागेंवर देखील राष्ट्रवादी कडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून जिंकत आलेल्या राष्ट्रवादी बळकट जागांवर अजित पवार यांनी उमेदवार दिले आहेत. जसे बारामती मतदार संघातून स्वत: अजित पवार लढणार आहेत. कागल मधून हसन मुश्रीफ , हडपसर मधून चेतन तुपे, येवला मतदार संघातून छगन भुजबळ यांना उमेदवार घोषित करण्यात आले आहे. आता राज्यातील राजकीय समीकरणे बबदलल्यामुळे यंदाच्या वेळची लढत रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी
बारामती- अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- हसनमु शरीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवाळ
कळमनेर- अनिल पाटील
तुमसर- राजू कारेमोरे
अहेरी- धर्मराव बाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन- आदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
आळंदी खेड- दिलीप मोहिते
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
मावळ-सुनील शेळके
चिपळूण- शेखर निकम
पिंपरी- अण्णा बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
हडपसर- चेतन तुपे
अकोले- किरण लहामटे
करमाळा- संजय शिंदे
मोर्शी -देवेंद्र भुयार
कोपरगाव- आशुतोष काळे
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
माजलगाव- प्रकाश सोळंके
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
अनुषक्ती नगर- सना मलिक
शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक
अमरावती शहर- सुलभा खोडके
इगतपुरी-हिरामण खोसकर

ठाकरेंकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; कोण कोण आहे उमेदवार?

वेध माझा ऑनलाईन।
 महायुतीकडून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर महावकास आघाडीतील राजकीय पक्षांकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू केलं आहे. शिवसेना युबीटी पक्षाने माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे. आज तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यासह, वसंत गितेंनाही ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून कोण उमेदवार...
सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)

२)वसंत गिते(नाशिक मध्य) 

३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य) 

४)एकनाथ पवार (लोहा कंधार)

५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा

६ )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा

७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा

८ )अमर पाटील, सोलापूर दक्षिण

 ९) गणेश धात्रक, नांदगाव

 १०)दीपक आबा साळुंखे पाटील,  सांगोला

११) प्रविणा मोरजकर, कुर्ला 

१२) एम के मढवी, ऐरोली 

१३) भास्कर जाधव, गुहागर 

 १४)वैभव नाईक, कुडाळ

 १५) राजन साळवी, राजापूर लांजा 

 १६) आदित्य ठाकरे, वरळी 

 १७) संजय पोतनीस, कलिना 

१८) सुनील प्रभू, दिंडोशी 

१९) राजन विचारे, ठाणे शहर 

२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली 

२१) कैलास पाटील, धाराशिव 

२२) मनोहर भोईर, उरण 

२३) महेश सावंत, माहीम 

२४)श्रद्धा जाधव, वडाळा 

२५) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी  

२६) नितीन देशमुख  - बाळापूर 

२७)  किशनचंद तनवाणी - छत्रपती संभाजी नगर मध्ये 

 २८)छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे

 २९)वैजापूर मतदारसंघ  - दिनेश परदेशी*

 ३०) कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत*

 ३१) सिल्लोड  मतदारसंघ - सुरेश बनकर

३२) राहुल पाटील - परभणी 

३३) शंकरराव गडाख -नेवासा 

३४) सुभाष भोईर  - कल्याण ग्रामीण 

३५) सुनील राऊत - विक्रोळी

३६) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम 

३७) उन्मेश पाटील - चाळीसगाव 

३८) स्नेहल जगताप - महाड 

३९) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व  

४०) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी

पाटणमधुन शंभूराज देसाई यांच्या विरोधात हर्षद कदम ; उद्धव ठाकरेनी जाहिर केली उमेदवारी

वेध माझा ऑनलाइन।
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम याना माजी मंत्री शंभुराज देसाई यांच्या विरोधात पाटण विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या वतीने ही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे 

ठाकरे गटाचे जिल्ह्याचे नेते हर्षद कदम हे सातत्याने माजी मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात आपली भूमिका मांडत आले आहेत
मतदार संघातिल अनेक प्रश्न मांडत त्यानी विविध आंदोलने सातत्याने केली आहेत 

प्रामुख्याने शंभूराज देसाई यानी छत्रपति उदयनराजे भोसले याना पाटण मधे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देण्याचे विधान केले होते... मात्र जिल्ह्यात उदयनराजे याना सर्वात कमी मताधिक्य त्याठिकानी मिळाले... त्याची जबाबदारी घेवून, मी राजीनामा देतो... असा स्टंट माजी मंत्री देसाई यांनी केला होता... 

त्यावेळी देसाई यांचा हा राजीनामा देण्याचा फक्त स्टंटआहे ते पदाला चिटकुन राहणार आहेत...राजीनामा देणार नाहीत...असे हर्षद कदम यांनी सांगून त्यांच्या स्टंट मधली हवाच घालवली होती...त्याची Jजिल्ह्यात जोरदार चर्चा झाली होती...सध्या होणाऱ्या या निवडणुकीत याच दोघांची लढत पहायला मिळणार आहे...

कॉंग्रेसच्या अजित आप्पा चिखलीकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा ; भाजप शिवसेना महिला आक्रमक ; निवेदनाद्वारे केली मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
हॉटेल पंकज येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्यानिमिताने आयोजित मेळाव्यात अजित अप्पा पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणातुन तमाम महिलांबद्‌दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन महिलांना लज्जा- उत्पन्न होईल असे अपमान कारक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा -सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे 


निवेदनात म्हटले आहे की भारतीय संस्कृतीमध्ये महिलाना देवता समान स्थान  आहे. तरी अजित अप्पा चिखलीकर या काँग्रेसी वृत्तीच्या घाणेरड्या नराधमाने महिला उघडया बसल्या होत्या का? अशी किळसवाणी आणि खालच्या पातळीवर जाउन भाषा वापरली तरी या महामूर्ख नराधमावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे अजित आप्पा चिखलीकर यांना अटक करुन तडीपार  करावे अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . 

महिलांविषयी वापरलेल्या या अपशब्दाच्या निषेधार्थ येथील दत्त चौकात आज आंदोलन करण्यात येणार होते पण आचारसंहितेचा आदर करून आंदोलन निवेदन देवून संपवण्यात आले. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी नेत्या कविता कचरे, कराड माजी नगराध्यक्ष रोहिणीताई  शिंदे, पदाधीकारी स्वाती पिसाळ, नम्रता कुत्लकर्णी  सुरेखा ताई माने, कविता माने,
शाखाप्रमुख कल्पना पवार, कराड शहराध्यक्ष गायत्री पाठक, शिवसेना तालुकाप्रमुख संध्या दाभाडे,  दिपाली जाधव , विजया भोसले, सामाजिक कार्यकर्त्या व पोलीस मित्र संघटना सातारा जिल्हाध्यक्ष राधिका पन्हाळे, शिवसेना शाखाप्रमुख चांदणी मुळे, कराड तालुका शिवसेना नीता लोंढे, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण नेत्या दैवशीला मोहिते, मंजिरी कुलकर्णी, उपस्थित होत्या 


राजेन्द्रसिंह यादव म्हणाले...येत्या 2 दिवसात भूमिका स्पष्ट करणार ; वेध - माझा शी बोलताना दिली प्रतिक्रिया ;


वेध माझा ऑनलाइन।
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे आघाडीची भूमिका येत्या दोन दिवसात स्पष्ट करणार असल्याचे त्यानी वेध माझा शी बोलताना संगितले आहे

 दोन वर्षांपूर्वी श्री यादव यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी कराड शहराच्या विकासाच्या आवश्यक कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंन्तर 209 कोटी रुपयांचा निधी शहरासाठी मंजूर झाला यात भुयारी गटार योजना व पाणी योजनेचे अद्यावतीकरण याचा समावेश आहे. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. इतका निधी राजेंद्रसिंह यादव यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच शहरासाठी आला आहे 

दरम्यान सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना गेले काही दिवस त्यांच्या या निवडणुकीतील भूमिकेबाबत ते आपल्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून आपली भूमिका येत्या 2 दिवसात घेणार आहेत असे त्यानी वेध माझा शी बोलताना सांगितले आहे 

Tuesday, October 22, 2024

तिकीटांच्या समीकरणामुळं नारायण राणे,धनंजय महाडिक आणि गणेश नाईक यांच्या घरांतही 2-2 पक्ष ?

वेध माझा ऑनलाइन।
महायुती आणि महाविकास आघाडीतल्या तिकीटांच्या समीकरणामुळं आता घरांतही 2-2 पक्ष झाल्याचं दिसतंय. नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपचे आमदार आहेत. वडील आणि भाऊ भाजपात असले तरी तिकीटासाठी निलेश राणे बंड करुन शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. महायुतीत कुडाळ-मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळं निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांशी निलेश राणेंची लढत होईल.

इकडे नवी मुंबईतही भाजपला गणेश नाईकांच्या घरातूनच धक्का बसलाय. नाईकांचे पुत्र, संदीप नाईकांनी 28 माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गणेश नाईकांना ऐरोलीतून विधानसभेचं तिकीट दिलंय. मात्र बेलापूरमधून भाजपनं तिकीट न दिल्यानं, संदीप नाईकांनी तुतारीवर लढण्याचा निर्णय घेतला.
निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक, भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक आहेत. मात्र महायुतीत जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे  निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे
तिथून मात्र राजेश क्षीरसागर शर्यतीत आहेत.


कराड दक्षिणच्या निष्क्रिय आमदारामुळे मतदार संघाचा विकास रखड़ला ; भाजपा चे सरकार असताना कामाचे श्रेय कोंग्रेसचे आमदार कसे काय घेवू शकतात? अशोक थोरात यांचा सवाल ;

वेध माझा ऑनलाइन।
निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे कराड दक्षिणचा गेली १० वर्षे विकास रखडला, अशी घणाघाती टीका शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर (ता. कराड) येथे कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. 

मलकापूर येथे विविध ठिकाणी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, सरकारच्या माध्यमातून जी कामे होतात, अशा कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कराड दक्षिणच्या विद्यमान लोकप्रतिनिधीकडून सुरु आहे. या कामाव्यतिरिक्त लोकांच्या उपयोगी पडेल असे एकही काम त्यांनी आत्तापर्यंत केलेले नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत लोकं त्यांना याचा धडा नक्की शिकवतील. भाजपाचे उमेदवार डॉ. अतुलबाबांकडे सामाजिक कार्याचा वारसा आहे. आप्पासाहेब, डॉ. सुरेशबाबा आणि डॉ. अतुलबाबांनी विकासाच्या बाबतीत कधीही हयगय केलेली नाही. हजारो माणसांना रोजगार उपलब्ध करुन दिला. 

मलकापुरात सत्तेवर असणाऱ्यांनी गेल्या २० वर्षांत हुकुमशाही निर्माण केली, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर नाव न घेता करत, श्री. थोरात म्हणाले, मलकापूरातील जनता यावेळी डॉ. अतुलबाबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. त्यांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.  

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मलकापूरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. पण त्या प्रमाणात येथे नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही काही दिवसांपूर्वी २० कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करुन आणला. कराड दक्षिणेत सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून, बरीचशी विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. येत्या काळात मलकापूरसह कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध आहे. 

यावेळी मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी नगरसेवक अजित थोरात, दिनेश रैनाक, राजू मुल्ला, शहाजी पाटील, सुहास कदम, सुहास जाधव, भीमराव माहूर, अमित थोरात, पी. पी. पाटील, कराडचे माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार, हेमंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

Monday, October 21, 2024

ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांमध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मानस ; परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांचे प्रतिपादन ;

वेध माझा ऑनलाइन।
ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना ताकद देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची राज्य शासनाने स्थापना केली आहे. ब्राह्मण समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात लाभ देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा आपला मानस असल्याचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांनी सांगितले.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आशिष दामले आज (सोमवारी) प्रथमच कराड दौऱ्यावर आले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

आशिष दामले म्हणाले, इतर समाज घटकांप्रमाणे ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी ही अनेक वर्षाची ब्राह्मण समाजाची मागणी होती. युती सरकारने आमच्या मागणीला न्याय देत महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळावर माझी अध्यक्षपदी नियुक्ती करत मला कमी वयात काम करण्याची संधी दिली आहे. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण, नोकरी व व्यवसायात ताकद देऊन त्यांच्यामध्ये आर्थिक परिवर्तन घडवण्याचा माझा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने पुणे-मुंबई या ठिकाणी येत असतात. त्यांच्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वस्तीगृह उभारण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ.सोनल भोसेकर, मुकुंद उर्फ शार्दुल चरेगांवकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सुरेन्द्र काळे, संजय भोसेकर, प्रशांत कुलकर्णी, ॲड मिलिंद कुलकर्णी, शशांक शेंडे, अमित बुधकर, मनोज आचार्य ,नितीन शाळीग्राम, प्रशांत कुलकर्णी रमेश कुलकर्णी, जगु पुरोहित , संदीप शेंडे,सदानंद घाटे, पी डी कुलकर्णी बाई, गौरीताई निलाखे, विनिता पेंढारकर, शरयु माटे सुषमा काळे , अनघा कुलकर्णी, विशाखा कित्तूर तसेच अनेक समाज बान्धव उपस्थित होते.


Sunday, October 20, 2024

पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयासाठी ; कार्यकर्त्यांचा निर्धार ; 50 हजारचे मताधिक्य देणार ;

वेध माझा ऑनलाइन।
- काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजाराच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच पुढील 30 दिवस पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयासाठी असा निर्धार केला. 

कराड येथे विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, फारूख पटवेकर, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील- चिखलीकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, मलकापूर नगरपरिषेदेच्या माजी नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा गितांजली थोरात,  कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव, बंडा नाना जगताप, नानासो पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, डॉ सुधीर जगताप, निवासराव थोरात, पै. तानाजी चौरे, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील, नामदेवराव पाटील, शंकरराव खबाले, वैभव थोरात, संजय तडाखे, श्रीकांत मुळे, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, गणेश गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

माजी नगरसेवक फारूख पटवेकर म्हणाले... कराड शहरातून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य पृथ्वीराज बाबांना देऊ. कराडमध्ये कृष्णा कोयनेचा- संगम आहे, तसा पृथ्वीराज बाबा- उदय दादा यांचा संगम आहे. पृथ्वीराज बाबांनी जसे पहिल्यांदा मराठा समाजाला 16% आरक्षण दिले त्याचवेळी त्यांनी मुस्लिम समाजातील मागासवर्गीय घटकाला सुद्धा आरक्षण दिल होत. मात्र भाजप सरकारने ते दोन्ही आरक्षण घालवले. 

  कार्यकर्ते जमिनीवरच बसले
कराड दक्षिण कार्यकर्ता मेळाव्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी जागा कमी पडू लागल्याने कार्यकर्त्यांनी मांडी घालून जमिनीवर बसत भाषणे ऐकली. 


भाजपची पहिली यादी जाहीर; साताऱ्यातून शिवेंद्रराजे,तर कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसलेंना उमेदवारी

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून या कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर साताराजिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले, माणमधून जयकुमार गोरे आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी भाजपची मोठी ताकद वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देत विजयी करण्यात महत्त्वाचा हातभार लावला होता. तसेच लोकसभा प्रभारी म्हणूनही डॉ. अतुल भोसले यांनी चांगले काम केले. याही वेळेस २०२४ च्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले हे सर्व ताकदीनिशी उतरले आहेत. त्यांना पहिल्याच यादीत भाजपाने संधी दिली दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भाजपाच्या पहिल्या यादीत 99 पैकी 13 महिला उमेदवार आहेत. अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून 99 पैकी 6 एसटी आणि 4 एससी उमेदवार आहेत. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार, नितेश राणे यांचा समावेश आहे. बेलापूरमधून पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांनाच भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक यांना तिकीट मिळणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांच्या जागेवर प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची पहिली ९९ उमेदवार यादी

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन माते
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – क्षीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड


हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण
ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरन – महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

Saturday, October 19, 2024

नवाब मलिकांना उमेदवारी ? अजित पवार गट आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण होणार?

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवारांचे आमदार नबाव मलिक यांनी पक्ष फुटीनंतर दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मलिकांना अजित पवार पुन्हा तिकीट देणार आहेत. मात्र मलिकांना भाजपनं उमेदवारी जाहीर होण्याआधीच विरोध केला आहे.

नवाब मलिकांवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपचे पुन्हा मतभेद निर्माण होण्याचे चिन्हं आहेत. कारण भाजपकडून शेलारांनी नवाब मलिकांच्या उमेदवारीला उघड विरोध केलाय. दाऊदशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणं भाजपला मान्य नाही, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत. सध्या ते मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून आमदार आहेत, इथून त्यांच्या कन्या सना मलिकांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांना तिकीट देऊ शकते. मात्र भाजपनं मलिकांना विरोध केलाय.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंधित जमीन प्रकरणात, फडणवीसांनी मलिकांवर आरोप केले होते. त्यानंतर ईडीची कारवाई झाली आणि 15 महिने मलिक जेलमध्ये होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला. मात्र तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार जावून महायुती सत्तेत आली आणि अजित पवारही सत्तेत सहभागी झाले होते. तसंच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मलिकांनी अजित पवारांना साथ दिली.
महिन्याभराआधीच अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेतही मलिक सहभागी झाले. मलिक अजित पवारांसोबत दिल्यानंतर फडणवीसांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंच म्हटलं होतं. आता मलिकांवरुन फडणवीसांनी नेमकी कोणती भूमिका काय होती, तेही पाहुयात.

अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात 

फडणवीसांनी म्हटलंय की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. मलिकांवरील आरोप सिद्ध न झाल्यास त्यांचे आपण जरुर स्वागत करावे. मात्र आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही, हे आमचे स्पष्ट मत आहे. मलिकांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. तरीही त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही.

भाजपच्या विशेषत: फडणवीसांच्या विरोधानंतर नवाब मलिकांना अजित पवारांनी त्यांच्या यात्रेदरम्यान सोबत घेतलं. ते स्टँडिंग आमदार असल्यानं अजित पवार त्यांना तिकीट देणारच आहे. मात्र भाजपनं तिकीट जाहीर होण्याआधीच विरोध केलाय आणि चित्र 2-3 दिवसांत स्पष्ट होईल. तोपर्यंत सगळेच वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

खासदार संजय पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील निवडणूक लढविणार ? रोहीत पाटील यांच्याशी लढत होण्याची शक्यता .

वेध माझा ऑनलाइन।
कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पेच अद्याप सुटलेला नाही. हा मतदार संघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाईल असे म्हटले जात असून प्रभाकर पाटील हे हाती घड्याळ बांधतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रभाकर पाटील यांचा सामना रोहीत पाटील यांच्याशी होणार असे म्हटले जात आहे.प्रभाकर पाटील माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र आहेत

कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीत कवठेमहांकाळ जागेचा पेच अद्याप सुटलेला नाही या मतदार संघातून राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होते काय याकडे लक्ष लागले आहे. कारण भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रभाकर पाटील राष्ट्रावादीच्या अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. महायुतीत हा मतदार संघ कुणाच्या वाट्याला जाणार हे निश्चित झालेले नाही. मात्र भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पूत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे. महायुतीत हा मतदार संघ राष्ट्रवादी अजितदादा यांच्या वाट्याला जाईल असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीत अजितदादांकडे सक्षम उमेदवार नसल्याने प्रभाकर पाटील राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतील असे म्हटले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित आरआर पाटील रिंगणात उतरणार असल्याचे नक्की असल्याने या मतदार संघात राष्ट्रवादी दोन गटात सामना रंगणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


Friday, October 18, 2024

शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी ; कोणाची कोठून उमेदवारी असणार ?

वेध माझा ऑनलाइन ।
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी मिळाली आहे. 
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार? याची संभाव्य यादी समोर आली आहे. यात बारामतीतून कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण इतर जागांवरील उमेदवारांची नावं समोर आली आहेत
शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
इस्लामपूर- जयंत पाटील
तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील
शिराळा- मानसिंग नाईक
उत्तर कराड- बाळासाहेब पाटील
कोरेगाव- शशिकांत शिंदे
फलटण – दीपक चव्हाण
माण खटाव- प्रभाकर देशमुख
शिरुर- अशोक पवार
जुन्नर- सत्यशील शेरकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
आंबेगाव- देवदत्त निकम
वडगाव शेरी- बापू पठारे
दौंड- रमेश आप्पा थोरात
माळशिरस- उत्तमराव जानकर
कर्जत जामखेड- रोहित पवार
काटोल- अनिल देशमुख
विक्रमगड- सुनील भुसारा
घनसावंगी – राजेश टोपे
बीड- संदीप क्षीरसागर
मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
जिंतूर- विजय भांबळे
अहेरी- भाग्यश्री अत्राम
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
परळी- राजाभाऊ पड
लक्ष्मण पवार- गेवराई
आष्टी- भीमराव धोंडे
केज- पृथ्वीराज साठे
माजलगाव- रमेश आडसकर
राहुरी- प्राजक्त तनपुरे
देवळाली- योगेश घोलप
दिंडोरी – गोकुळ झिरवाळ
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
जामनेर- गुलाबराव देवकर
अकोला- अमित भांगरे
पारनेर- राणी लंके
खानापूर – सदाशिव पाटील
चंदगड- नंदाताई बाभूळकर
इचलकरंजी- मदन कारंडे
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत तेढ निर्माण झालं असल्याचं चित्र आहे. काही जागांवर अद्यापही रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील जागांवरून वाद सुरु आहे. याचा परिणाम शरद पवार गटाच्या उमेदवार यादीवर झाला आहे. शरद पवार गटाची उमेदवारी यादी आज येणार होती. परंतू शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रसमधील वादामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.

दादा बारामतीतूनच ! अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी तयार ! आणखी कोणाची उमेदवारी कौठून असणार ?

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार? याची चर्चा होत आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार आहे याची माहिती मिळाली आहे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी मिळाली आहे यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं आहे. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार? हे पाहुया...


अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
बारामती – अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवळ
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
अहेरी- धर्मारावबाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
खेड, आळंदी- दिलीप मोहिते
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
मावळ- सुनील शेळके
वाई- मकरंद पाटील
चिपळूण- शेखर निकम
पिंपरी- अण्णा बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
हडपसर- चेतन तुपे
अकोले- किरण लहामटे
करमाळा- संजय शिंदे
मोर्शी- देवेंद्र भुयार
कोपरगाव- आशुतोष काळे
अहमदनगर शहर- संग्राम जगताप
माजलगाव- जयसिंह सोळंके
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक
अमरावती शहर- सुलभा खोडके
इगतपुरी- हिरामण खोसकर

Wednesday, October 16, 2024

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.

कमलालक्ष्मीचे निवास्थान म्हणून पुराणात कराडचा उल्लेख आहे. कराड शहराच्या पश्चिमेस कोयना नदीकाठी श्री दैत्यनिवारणी देवीचे मंदिर आहे. दैत्यांचा नाश करणाऱ्या श्री दैत्यनिवारणी देवीची अष्टभूजा मूर्ती असून, याठिकाणी दरवर्षी नवरात्रीत मोठा उत्सव साजरा केला जातो. नदीकाठी असलेल्या या मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून भाविक व कराडवासीयांमधून होत होती. 

याबाबत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत, भाविकांची ही मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती. या मागणीची दखल घेत, महायुती सरकारने ‘नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे करणे’ या योजनेअंतर्गत श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन आदेश १४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला असून, मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण समजला जात आहे.

कराडच्या ऐतिहासिक श्री दैत्यनिवारणी मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी प्राप्त झाल्याने, मंदिराची सुरक्षितता जपण्यास मदत होणार आहे. या निधीबद्दल महायुती सरकारचे आणि डॉ. अतुल भोसले यांचे कराडवासीयांमधून आभार व्यक्त केले जात आहेत. 


Tuesday, October 15, 2024

4 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी : सर्व विमाने केली इमर्जन्सी लैंड ;


वेध माझा ऑनलाइन।
मंगळवारी चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांचे इमर्जन्सी लँडिंग केले. मात्र, चौकशीअंती या धमक्या खोट्या ठरल्या.

मंगळवारी सोशल मीडियावरुन चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. ज्यात दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा समावेश आहे. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी करून सर्व विमानांचे इमर्जन्सी लँडिंग केले. X वर चार विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांनी लगेचच अनेक विमानतळांवर विशेष दहशतवादविरोधी पाऊल उचलले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानांमध्ये अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचा ही समावेश आहे.
सोमवारी मुंबई येथून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी आणि एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, चौकशीअंती नंतर या धमक्या खोट्या असल्याचं समोर आलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फ्लाइट (QP 1373) आणि एअर इंडियाच्या दिल्ली ते शिकागो (AI 127) फ्लाइटसह चार विमानांना धोका लक्षात घेता. अयोध्या विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट्सनुसार, स्पाइसजेट आणि आकसा एअरची विमाने सुरक्षितपणे उतरली आहेत. त्यामुळे सुरक्षा तपासणीसाठी दिल्लीहून शिकागोला जाणारे एअर इंडियाचे विमान कॅनडाकडे वळवण्यात आले आहे. विमान वाहतूक सुरक्षा सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, सर्व बाबतीत खबरदारी घेतली जात आहे.
एक्सवरुन एअरलाइन्स आणि पोलिसांच्या हँडलला टॅग केले आणि दावा केला की या विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. सोमवारीही चार वेगवेगळ्या एक्स हँडलने मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या. सुरक्षा आणि गुप्तचर संस्था, एअरलाइन्स आणि विमानतळ चालकांनी सोमवारी दहशतवादविरोधी सुरक्षा तपासणी केल्यानंतर संदेश बनावट असल्याचे घोषित केले.


बिअर बार वाढविण्यासाठी जनतेनं मंत्रिमंडळात पाठवलं आहे का?; जयंत पाटील यांची टिका ;

वेध माझा ऑनलाइन।
पाटणला काय वाढले तर बिअरबार वाढले. यासाठी मंत्रिमंडळात पाठवले होते हे वाटत नाही. बार वाढविण्याचा कार्यक्रम त्यापेक्षा महाराष्ट्रही पाटणसारख्या दुर्गम भागात वेगळं काही वाढलं नाही. त्यामुळे हि वेगळी संस्कृती महाराष्ट्रात आणणारी हि लोकं महाराष्ट्र विकायला काढायच्या कामात आता गुंतलेली असल्याची टीका पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शिंदे गटाचे नेते पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली.

पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेअंतर्गत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, दीपक पवार तसेच पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील जवळपास 60 ते 65 पेक्षा जास्त मतदार संघात जाऊन आली आहे. राज्यातील अतिशय दुर्गम अशा गडचिरोली पासून ते सावंतवाडी पर्यंत जवळपास सर्व जिल्ह्यात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. राज्यभर फिरल्यावर खात्री झाली कि महाराष्ट्रातील वातावरण लोकसभेच्या पेक्षा अधिक सुधारलेले आहे. आज सर्व लोक हे भाजप सरकार घालवल पाहिजे असे म्हणत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर वातावरण वेगळं होत. बघता बघता निवडणूक सुरु झाली आणि महाराष्ट्रातील जनतेने आदरणीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याची परिणीती महाराष्ट्रात भाजपचा ३१ ठिकाणी पराभव झाला. १० जागांच्या ऐवजी आपला ८ जागांवर विजय झाला आणि एक जागा सातारा जिल्ह्याची होती.
पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हातील फरक न कळलेल्या आपल्या मतदारांनी ३७ हजार हि मते पापणीला घातली आणि आमची शिट ३५ हजाराच्या मताने पडली. १० पैकी जवळपास ९ ठिकाणी जनतेने शरद पवार यांच्या बाजूने कौल आला. महाराष्ट्रातील जनता पवार साहेबासारख्या ८४ वर्षाच्या योद्धाच्या पाठीशी आजही उभी राहत आहे. कारण स्वाभिमान हा मराठी माणसाच्या कणाकणात आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजला; आचारसंहिता लागू, ‘या’ दिवशी होणार मतदान ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेत झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाकडून आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीपासूनच घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सातारा जिल्ह्यात पहायला मिळणार असली तरी वंचित बहुजन आघाडीकडून देखील जिल्ह्यातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
 
 निवडणुकीचा कार्यक्रम…

विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे