Sunday, May 31, 2020

काल रात्रीचा रिपोर्ट ; 5 जण पॉझिटिव्ह

कराड
रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक भयभीत झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच तारांबळ उडालीआहे.कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती घट्ट होत चालला असताना रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाली असल्याचे दिसते आहे.काल दिवसभर काही नसताना रात्री उशिरा 5 जण पॉझिटिव्ह झाल्याची बातमी आल्यावर प्रशासनाची पुन्हा पळापळ झाली. दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने लोक भयभीत झाले आहेत.रुग्ण संख्या आता कोणत्याही परिस्थितीत आटोक्यात येणे महत्वाचे आहे.

शिवरुद्राक्ष वाद्य पथकाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद ; उपक्रमाचे शहरातून होतंय कौतुक

                   
कराड /शहरातील शिवरुद्राक्ष वाद्य पथक व महालक्ष्मी ब्लड बँक कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या अधिकच वाढत आहे. त्यामुळे अनेक भागात रुग्णांना रक्ताची गरज भासू लागल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या शिबिराचे आयोजन करून शिवरुद्राक्ष वाद्यपथकाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शिबिरात सुमारे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. सर्व रक्तदात्यांना मास्क व होमिओपॅथिक " अर्सेनिक अल्बम -30 गोळ्यांचे यावेळी वाटपही करण्यात आले.मंगळवार पेठ येथील नगरपालिका शाळा नं 9 गणपती पारडे येथे सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व वादकांनी विशेष परिश्रम घेतले.

महाबळेश्वर येथील विलीगिकरण कक्षात एकाची आत्महत्या ; घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ

कराड
महाबळेश्वर मधील एम टी डी सी रिसॉर्ट मध्ये स्थापन करण्यात आलेल्या विलगिकरण कक्षामध्ये आज एका इसमाने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असल्याने महाबळेश्वर मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
     सदर इसमाला काल संध्याकाळी  विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आल्याचे  समजते.परंतु आज ही घटना समोर आल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. आत्महत्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.पुढील तपास स्थानिक यंत्रणे मार्फत चालू आहे.

Saturday, May 30, 2020

जिल्ह्यात 31 जण पॉझिटिव्ह ; कोरोनाचा जिल्ह्याला विळखा ; प्रशासनाची पळापळ सुरू

कराड
पुण्यावरून प्राप्त रिपोर्टनुसार 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक भयभीत होउ लागले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. प्रशासनाची याच कारणाने  तारांबळ उडाली असून चांगलीच खळबळ जिल्ह्यात निर्माण झाली आहे.कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती घट्ट होत चालला असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाली असल्याचे दिसते आहे.दरम्यान रुग्ण संख्या 500 च्या पार झाली आहे.

जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह
.गाव / तालुका निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
*जावळी तालुक्यातील* बेलावडे येथील  2 पुरुष व 2 महिला. निपाणी येथील 1 पुरुष व 1 महिला. काटवली येथील 1 पुरुष. गवडी येथील 1 महिला. रांजणी येथील 1 महिला.
*सातारा तालुक्यातील* वावदरे येथील 1 पुरुष. खडगाव येथील 1 महिला. कुसवडे येथील 1 पुरुष.
*खटाव तालुक्यातील* बनपूरी येथील 4 पुरुष व 1 महिला. वांझोली येथील 2 पुरुष व 3 महिला. पाचवड येथील 1 पुरुष.
*कोरेगांव तालुक्यातील*  कटापूर येथील 1 पुरुष. शिरंबे येथील 1 पुरुष.
*कराड तालुक्यातील* खराडे येथील 1 पुरुष 2 महिला.
*पाटण तालुक्यातील* तामिणे येथील  2 पुरुष.
0000

कृष्णा हॉस्पिटल मधून आज 4 जण झाले कोरोना मुक्त ; आज टाळ्या वाजवून दिला डिस्चार्ज

कराड, ता. 30
 कराड तालुक्यातील म्हासोली, नांदगाव आणि शामगाव येथील एकूण 4 कोरोनामुक्त युवकांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 81 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

म्हासोली येथील 32 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 22 वर्षीय व  शामगाव येथील 22 वर्षीय युवक गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, अशोक भापकर यांच्या हस्ते कोरोनामुक्त झालेल्या युवकांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

*सोबत : फोटो व व्हिडीओ*

यशवंत बँकेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद ; उपक्रमाचे शहर व परिसरातून होतंय कौतुक ; इतरांनीदेखील असे उपक्रम राबवण्याची गरज

कराड
कोरोनाचे संकट सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात घोंघावत आहे.अशातच रुग्णांची दिवसेंदिवस वाढती आकडेवारी चिंतेचा विषय बनली आहे. आणि त्यातच लॉकडाऊनमुळे सध्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी यशवंत बँकेने कराडमधील यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेच्या सहकार्याने आज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण 40 ते 50 जणांनी आज याठिकाणी रक्तदान केले. लॉक डाऊन च्या सुरुवातीच्या काळापासून यशवंत बँकेने आपली सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मदतीचा हात देत या संकट काळात शेकडो संसाराला सावरण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.हजारो अन्नधान्य किट चे वाटप या संस्थेने केले आहे.जीवनावश्यक वस्तूंचे वाटपदेखील बँकेच्या माध्यमातून झाले आहे. मास्क,सॅनिटायझर असे विविध सहकार्य करीत यशवंत बँकेने आपल्या कर्तव्यदक्षतेचे दर्शन जनतेला दिले आहे.संस्थेचे अध्यक्ष व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या संकल्पनेतून व यशवंत बँकेच्या माध्यमातून याच कर्तव्याचा एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचे आयोजनदेखील करण्यात आले होते. 40 ते 50 जणांनी आज या शिबिरातून रक्तदान केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, संचालक प्रा.श्रीकृष्ण जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मोकाशी, उद्योजक मुकुंद चरेगांवकर, माजी नगरसेवक घन:श्याम पेंढारकर, नितीन वास्के आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे सेवक, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांसह ४० ते 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरात आपला सहभाग नोंदवला. इतरांनीही यातून आदर्श घ्यावा व असे समाजहिताचे उपक्रम राबवावेत अशी यावेळी लोकांनि अपेक्षा व्यक्त केली.या उपक्रमाबद्दल जनतेतून यशवंत बँकेचे कौतुक होत आहे.

Friday, May 29, 2020

विंग येथील एका बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 30 (जिमाका)
 कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे विंग येथील  कोविड बाधित तसेच किडनीचा आजार असलेला  50 वर्षीय पुरुष रुग्णाचा  रात्री दि. 29 मे रोजी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 कराड  तालुक्यातील पाठरवाडी येथील 33 वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष यांचा काल दि.29 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*167 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह*
एन.सी.सी.एस.पुणे यांनी 132 नागरिकांचे अहवाल व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी  35  नागरिकांचे अहवाल असे एकूण 167  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
*43 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.

कृष्णा हॉस्पिटल मधून 9 जणांना आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. २९
कराड तालुक्यातील  म्हासोली, इंदोली, भरेवाडी आणि मेरमेवाडी येथील एकूण ९ कोरोनामुक्त रुग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये म्हासोली येथील 5 कोरोनामुक्त रुग्णांचा समावेश असल्याने, सलग दुसऱ्या दिवशी म्हासोलीकरांना दिलासा मिळाला आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकूण ७७ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनामुक्त रुग्णांना गुरुवारी (ता. २८) डिस्चार्ज देण्यात आला. पण पुन्हा त्याच दिवशी रात्री आलेल्या अहवालात म्हासोली येथे पुन्हा ८ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा आनंद फार काळ टिकला नाही.

दरम्यान, गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेली म्हासोली येथील ६० वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष आणि १२ वर्षीय मुलगी अशा ५ कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. तसेच इंदोली येथील ३९ वर्षीय पुरुष, भरेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय महिला, मेरमेवाडी येथील २३ वर्षीय पुरुष अशा अन्य ४ कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांनाही आज डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशीकिरण एन. डी., डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विश्वास पाटील, वैशाली यादव, नीता शेवाळे, नीता इनामदार, मंजुषा कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

...तर राज्य शासन 50 लाखाचे सानुग्रह अनुदान देणार ; ना.अजितदादांनी केली घोषणा

कराड
कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधीत कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय,खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचं विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्यं बजावणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यासंदर्भात म्हणाले की, कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचं सर्व्हेंक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबादाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करुन कर्तव्यं बजावत आहे. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत राज्य शासन गंभीर असून त्यादृष्टीनं आज हा महत्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आला आहे. आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे. आजच्या शासन निर्णयानुसार, कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी व तदर्थ असे सर्वं कर्मचारी) अशा सर्वं घटकांना ५० लाख रुपयांच्या विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही योजना विमा कंपनीच्या सहकार्यानं राबविण्यात येणार असली तरी यासंदर्भातील पॅकेज अंतिम होईपर्यंत, अंतरिम  निर्णय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून हे ५० लाखांचे सानुग्रह अनुदान संबंधीतांना देण्यात येणार आहे.

हे संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी, संबंधीत कर्मचारी कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा दुर्दैवाने मृत्यू होण्यापूर्वीच्या चौदा दिवसांच्या कालावधीत कर्तव्यावर हजर असणे व जिल्हाधिकारी किंवा पदनिर्देशित विभागप्रमुखांनी ते प्रमाणित करणे अनिवार्य आहे. यापूर्वी लागू केलेल्या किंवा भविष्यात लागू होणाऱ्या योजनेंतर्गत अशा लाभास पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू असणार नाही. अशाच प्रकारची योजना स्थानिक स्वराज संस्था आणि राज्य शासकीय सार्वजनिक उपक्रमांकडून देखील राबविण्यात येणार आहे. ही योजना तूर्तास ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू असेल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

आज जिल्ह्यात 32 जण पोझीटीव्ह सापडले ; जिल्ह्यात पुन्हा खळबळ ; प्रशासन हडबडले

सातारा दि. 29  (जिमाका)
 सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 24 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर सायंकाळी 8 जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता म्हणजे आज एकूण 32 जण पॉझिटव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने कोरोनाचा विळखा जिल्ह्याला पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जनतेत घबराट निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. फलटण तालुक्यातील होळ येथील 85 वर्षीय वृध्द महिला  ‘सारी’ ने  आजारी होती.  काल दिनांक 28 मे रोजी तिचा मृत्यु  झाला होता. मृत्यू पुर्वी तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते ते तपासणीमध्ये तो रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या 24 बाधित रुग्णांची  तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे..
 *फलटण तालुक्यातील* वडले येथील 1, जोरगाव येथील 1, होळ येथील 1 (मृत वृध्द महिला), साखरवाडी येथील 1.
*माण तालुक्यातील* म्हसवड येथील 1, दहीवडी येथील 1, राणंद येथील 1.
*पाटण तालुक्यातील* नवारस्ता येथील 1, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील 2, आडदेव येथील  1.
*खटाव तालुक्यातील* अंभेरी येथील 5, निमसोड येथील 1, कलेढोण येथील 2.
*सातारा तालुक्यातील* निगुडमळा (ग्रामपंचायत परळी) येथील 1,
*वाई तालुक्यातील* मुंगसेवाडी येथील 2.
*जावळी तालुक्यातील* आंबेघर येथील 2
आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 484 इतकी झाली आहे.
00

सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला निश्चित हरवू - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

कराड, दि. 28
 पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य 'करोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
          पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचेआयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर, नगरसेवक राजू मिसाळ, पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पालिका व वायसीएम अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.
           या लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू असेही पवार म्हणाले.
*इंडस्ट्रीच्या अडचणी सोडविणार...*
             पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमधून पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल असे अजित पवार म्हणाले.
*हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक...*
              पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
****

Thursday, May 28, 2020

117 जण निगेटिव्ह

सातारा दि. 29 (जिमाका)
फलटण तालुक्यातील होळ येथील 84 वर्षीय महिला व तांबवे येथील 94 वर्षीय पुरुष यांचा काल दि.28 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
काल रात्र उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23 जणांचे घशातील स्त्रावांचा नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 177 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
0000

आज दिवसभरात जिल्ह्यात 30 जण बाधीत सापडले ; जिल्यातील रुग्णसंख्या 452 झाली

कराड
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात ३० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडिकर यांनी दिली आहे.
आज संध्याकाळी ४ आणि रात्री उशीराने पुन्हा २६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने नागरिकांत कोरोनाची दहशत पसरली आहे. तसेच आज कराड तालुक्यातील म्हासोली येथील ८ कोरोना रुग्णांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता ४५२ वर पोहोचली आहे. पुण्या मुंबईहून सध्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आलेले असून नवे कोरोनाग्रस्त हे अशांपैकीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाहेरुन प्रवास करुन आलेल्यांना क्वारंटाईनमध्ये राहून नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


शेतकऱ्यांसाठी आता ऑनलाइन तारण कर्ज उपलब्ध ; ना. बाळासाहेब पाटील यांची माहिती

कराड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी राबवण्यात येत आहे व यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती पणन व सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध  ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सादर वखार पावती वखार अधिनियम, 1960 नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतकऱ्यास प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पध्दतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करु शकतात. तसेच मोबाईल ॲप डाऊनलोड करुन त्याच्या आधारे मराठी मध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्मार्टफोनद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन पाठविता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल, असेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

तारण कर्जाची व्याजदर ९ टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा रुपये ५ लाख प्रति शेतकरी एवढी असून वखार महामंडळाकडून शेतकऱ्यांना साठवणूक भाडयात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेचयोजनेअंतर्गत तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचा बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा,  या सर्व गोष्टी ऑनलाईन होणार असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांच्या वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होईल, असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

कराड तालुका 1 पाटण तालुका 1 व सातारा तालुक्यात 2 असे 4 नवीन बाधीत रुग्ण सापडले

सातारा दि. 28 (जिमाका) कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी  कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे आज एकूण 4 बाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. 26 मे रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 54 वर्षीय पुरुषाचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे.
*214 जणांच्या घातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 64, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 61, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 24, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 6 व शिरवळ येथे कोविड केअर सेंटरमधील 30 असे एकूण 214 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
*आजपासुन क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे Truenat Machine द्वारे  कोविड-19 ची* *चाचणी करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी* *दिली.*
आत्तापर्यंत जिल्ह्यात 426 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 134 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 277 रुग्णांवर उपचार सुरु असून 15  जणांचा मृत्यु झालेला आहे.

0000

म्हसोली येथील आठ जण झाले कोरोनामुक्त ; आज दिला डिस्चार्ज

सातारा दि. 28 ( जि. मा. का )
  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  म्हासोली ता. कराड येथील 16, 17 व 18 वर्षीय युवक, 45, 50 व 62 वर्षीय पुरुष तसेच 35 व 48 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या आठ रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या आठ  जणांना आज घरी  सोडण्यात आले.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 422 कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी 134  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे
0000

Wednesday, May 27, 2020

मलकापुरातील एका बाधितांचा मृत्यू ; 230 जण निगेटिव्ह

सातारा दि. 28 (जिमाका)
 पनवेल येथून प्रवास करुन आलेला मलकापूर ता. कराड येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणारा (मुळ गाव बाचोली ता. पाटण) येथील 47 वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने 21 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती हा कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यु झाला आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 *230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
एन.सी.सी.एस. पुणे यांनी 191 तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 39 असे एकूण 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, असेही  शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
*27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 422 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 281 रुग्णांवर उपचार सुरु असून 15  जणांचा मृत्यु झालेला आहे.
00000

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच विधानसभेच्या अध्यक्षपदी होणार विराजमान?

कराड/ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या स्थितीबाबत काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी हे फारसे समाधानी नाहीत. मुळातच शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील होण्यास राहुल गांधी यांचा सुरुवातीपासूनच ठाम विरोध होता. मात्र तरीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहामुळे आणि महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राहुल गांधी यांनी शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास नाराजीनेच संमती दिली होती.आता राज्यातील काँग्रेसच्या पुढील राजकारणाचा एक भाग म्हणून आ.पृथ्वीराजबाबा चव्हाण याना विधानसभा अध्यक्ष पदी विराजमान करण्याचा विचार सध्या काँग्रेस अंतर्गत सुरू आहे असे खात्रीलायक वृत्त आहे

काँग्रेस जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी असली तरी राज्य सरकारच्या महत्त्वाच्या मोठ्या निर्णयांमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही, अशी उघड नाराजी काल राहुल गांधी यांनी दिल्लीत व्यक्त केली होती. पक्षीय बलानुसार महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला तिसर्‍या क्रमांकाचे स्थान आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री अधिक सक्रिय असतात. मोठे आणि महत्त्वाचे निर्णय हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच चर्चा होऊन घेतले जातात, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यातही काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघाही माजी मुख्यमंत्र्यांमधून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे तर प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची वाटचाल आणखी तिसर्‍या दिशेने चालू असते अशी नाराजीही ही राज्यातील थोरात विरोधी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचवली आहे.त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे असेही वृत्त आहे.
 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार नसल्याने काहीसे विजनवासात गेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या अभ्यासू आणि अनुभवी नेत्याचा  काँग्रेसच्या पडत्या काळात  राज्यातील पुढच्या एकूणच सर्व राजकारणाच्या ड्रीष्टीने वापर करून घेण्यासाठी त्यांच्याकडे अधिक सक्षम जबाबदारी दिली गेली पाहिजे, असे मत काँग्रेस हायकमांडचे आहे. त्यातूनच पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये विचार सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा संसदीय कार्यप्रणालीतील अनुभव, अभ्यास लक्षात घेऊन त्यांची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदाकरता होऊ शकेल अशा दृष्टीने हालचाल सुरू आहे.


28 जण बाधित ; सविस्तर तालुका निहाय,गावनिहाय आकडेवारी

कराड
सातारा जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी*
*वाई तालुका* -  जांभळी-1, आसले 2, वेरुळी 1, कोंढावळे  -1, किरोंडे -1, वडवली-1, वाई ग्रामीण रुग्णालय-1.
*महाबळेश्वर तालुका* -देवळी-2, पारुट-3, गोरोशी-1 .
*जावळी तालुका*- तोरणेवाडी-1, बेलवडी-1 (मृत).
*खटाव तालुका* - बनपूरी -1, वांझोळी-1, डांभेवाडी-2,
*सातारा तालुका*- वावदरे-1
*कराड तालुका* - शेणोली स्टेशन -7

खळबळजनक ; जिल्ह्यात 28 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ; जिल्ह्यातील चिंता वाढू लागली

कराड
आताच आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यात नवे 28 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत सकाळी 52 व आत्ता 28 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील चिंता वाढू लागल्याने चित्र आहे तर प्रशासन खडबडले आहे .प्रशासनाची पळापळ वाढली आहे तर जिल्ह्यातील जनता वाढत्या रुग्ण संख्येने भयभीत अवस्थेत आहे. बाहेरून आलेल्यांची संख्यादेखील वाढत असल्याने त्यामुळे बाधित रुग्ण संख्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात रुग्णांची संख्या 422 एवढी झाली आहे.

एका बाधिताचा झाला मृत्यू

 सातारा दि. 27  (जिमाका)
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा मुंबई येथून प्रवास करुन  अंभेरी  ता. खटाव येथील  53 वर्षीय  कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या   पुरुषाला तीव्र श्वसनदाह आजार होता.  तसेच मुंबई येथून प्रवास करुन आलेला भाटकी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला आहे.  या 54 वर्षीय पुरुषाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
172 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 27, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 68, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 असे एकूण 172 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 255 रुग्णांवर उपचार सुरु असून 13 जणांचा मृत्यु झालेला आहे.

0000

यशवंत बँकेच्या वतीने येत्या शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन :;

अजिंक्य गोवेकर
कराड
 कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी आता प्रत्येकजण तयार होऊ लागलाय. या संकटात विविध प्रकारे लोकांना मदतीसाठी अनेक हात धावून आले.येथील यशवंत बँकेने देखील लॉक डाऊन काळात अनेक प्रकारे मदत करत आपली बांधीलकी जपली.त्यामध्ये प्रामुख्याने एक हजार कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हा विषय महत्वाचा ठरला,आणि आता याहीपेक्षा पुढे जाऊन त्याचाच आणखी एक भाग म्हणून येत्या शनिवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर यशवंत बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
 सर्वच रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे. कोरोना संक्रमण काळात आणखी एक सामाजिक उपक्रम म्हणून यशवंत बँकेने यशवंतराव चव्हाण ब्लड बँक,  यांच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन केले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी संपर्क साधण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

*रक्तदान शिबीर*
*दिनांक : शनिवार, ३० मे २०२०*
*वेळ : सकाळी १o ते दुपारी १ वाजेपर्यंत.*
*स्थळ : यशवंत भवन, यशवंत बँकेसमोर, चावडी चौक, कराड.*

नाव नोंदणी *संपर्क :*
रुपेश कुंभार - *9850697069*
सदानंद कुलकर्णी -
*9561811444*
शंकर वीर - *8975431991*

फडणवीसांनी खर्च किती आणि कर्ज किती... याचे आकडे सादर करावेत ; आ.पृथ्वीराज चव्हाण

कराड
 महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाले असा दावा विरोधी पक्षनेते, श्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच त्यांनी विविध योजनेतून महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रकमेचे विवरण दिले. यामध्ये त्यांनी एक गोष्ट भासविण्याचा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळेच पैसे थेट राज्य सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. काल मी सांगितल्याप्रमाणे, अनेक जागतिक वित्तीय संस्थांच्या विश्लेषणानुसार केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रक्कम (फिस्कल स्टीम्युलस) आहे आणि बाकीचे पॅकेज हे कर्ज रूपाने दिले जाणार आहेत. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला त्या २ लाख कोटी पैकी जास्तीत जास्त २० हजार कोटी रुपये रोख मिळू शकतात.



    दूसरा मुद्दा रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या म्हणजेच राज्याच्या (जीएसडीपीच्या) ५% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि ही रक्कम जवळपास १ लाख ६० हजार कोटी आहे असे सांगितले. पण ही दिशाभूल आहे. राज्यांना आधीपासून जीएसडीपीच्या ३% कर्ज घेण्याची परवानगी होतीच, ती आता २% वाढवून ५% पर्यंत वाढवली हे खरे आहे, परंतु त्या वाढीव २% पैकी फक्त ०.५% रक्कम म्हणजेच जास्तीत जास्त १५-१६ हजार कोटी रुपये तातडीने मिळू शकतील. उर्वरित १.५% रक्कम म्हणजे उचल (सुमारे ४५ हजार कोटी रुपये) करण्याआधी अनेक अटी आणि निकष लावण्यात आलेले आहेत.



         केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या पॅकेजमध्ये हे विविध घटकांना कर्ज देऊ केले आहे, पण त्यामध्ये  अनेक शर्ती आहेत. जो त्या अटीशर्ती पूर्ण करेल व ज्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता असेल, त्यालाच ते कर्ज मिळू शकेल. उदा: किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ हजार कोटी किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटी रुपये. परंतु हे घटक ते कर्ज घेऊ शकतील का ? व ते उत्सुक नसतील तर सरकार त्यांना सक्ती करू शकत नाही. त्यामुळे पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या कर्जाची रक्कम महाराष्ट्राला मदत म्हणून दाखवणे हे योग्य नाही.



     त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज व रोख खर्च किती याची स्वतंत्र, योजनानिहाय आकडेवारी दिली तर राज्याला केंद्राकडून ताबडतोब किती रोख  दिलासा मिळेल हे स्पष्ट होईल व त्यावर अधिक सकारात्मक चर्चा होईल.

नगरसेवक सुहास जगताप यांनी सम्पूर्ण परिसरातून स्वतः केली औषध फवारणी ; जनतेकडून मिळवली वाहवाह...

कराड
येथील सोमवार पेठेतील नगरसेवक सुहास जगताप यांनी आज स्वतः ट्रेकटर चालवत त्याद्वारे सम्पूर्ण परिसरातून पालिकेच्या सहकार्याने औषध फवारणी करून घेतली.आपली लोकांप्रति असलेली बांधीलकी दाखवून देत त्यांनी या निमित्ताने जनतेची वाहवाह मिळवली आहे.
सुहास जगताप हे स्वतः ग्राऊंड वरचे कार्यकर्ते आहेत.त्यांना लोकांच्या समस्या माहिती आहेत.त्यांनी लोकडाऊन काळात दूध वाटप,मास्क वाटप,असे उपक्रम राबवून, सोशल डिस्टन्स ठेवण्याबाबत घराराबाहेर न येता घरातच राहण्याबाबत त्यांनी लोकांना  घरोघरी जाऊन आवाहन केले आहे. लॉक डाऊन काळात त्यांनी किराणा माल,भाजीपाला,दूध स्वतः घरपोच केल आहे.
सध्या लॉक डाऊन शिथिल केले आहे.त्यामुळे सगळे व्यवहार सुरळीत सुरू करण्याच्या ड्रीष्टीने बाजारपेठ  सुरू करण्यात आली आहे. लोकांना प्रवास करण्याकरिता काही अटींवर परवानगी देखील प्रशासनाने दिली आहे.त्यामुळे मुंबई,पुणे,नागपूर,नाशिक आशा शहरातून अनेज जण मोठ्या संख्येने इकडे येऊ लागल्याचे चित्र आहे. कोरोना पेशंट चे प्रमाण याच कारणामुळे पुन्हा वाढू लागल्याने दिसते आहे.याचाच धोका शहरातील जनतेला होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत असतानाच नगरसेवक सुहास जगताप यांनी आपले कर्तव्य,आणि बांधिलकी सिद्ध करत स्वतः सम्पूर्ण परिसरातून पालिकेच्या सहकार्याने औषध फवारणी केली.सध्या सगळ्याच प्रभागातून असे सनेटायझिंग होणे पुन्हा गरजेचे आहे. सुहास जगताप यांचे शहरातून अभिनंदन होत आहे.

Tuesday, May 26, 2020

धक्कादायक ; 52 जण सापडले पॉझिटिव्ह

कराड
सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली
मंगळवारी (ता.२६) रात्री उशिरा नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज  (ता. कराड) येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले हाेते.
सातारा जिल्ह्यात मुंबईहून तसेच परराज्यातून आलेल्यांची बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसापासून झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारचा (ता.२६)  अपवाद वगळता बाधीतांच्या आकडा सातत्याने दोन अंकीच येत आहे. मंगळवारी केवळ कऱ्हाड व पाटण तालुक्यातील प्रत्येकी तीन रुग्ण आढळले. आज (बुधवार) सकाळी मात्र पुण्याच्या एन सी सी एस कडून आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने ५२ बाधित रुग्ण वाढले आहेत. यात कऱ्हाड तालुक्यातील तीन बाधितांचा समावेश आहे. त्यामध्ये म्हासोली येथील एक व खराडे येथील दोन बाधित सापडले.  म्हासो ली येथील साखळी यापूर्वीची असून खराडे येथे नव्याने रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. याबराेबरच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय  बाधिताचा  तसेच जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे.

पाच जण पॉझिटिव्ह सापडले

सातारा दि.26 ( जि.मा.का)
 नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज  ता. कराड येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

कराड तालुक्यातील 4 जण झाले कोरोनामुक्त

सातारा दि. 26 ( जि. मा. का )
  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या  म्हासोली ता. कराड येथील 60   वर्षीय पुरुष,  मलकापूर येथील 9 वर्षांची मुलगी,  उंब्रज येथील 22 वर्षीय युवक आणि  53 वर्षीय पुरुष असे एकूण चार कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
या चार रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या चार जणांना आज  सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 336 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे
0000

91 जण निगेटिव्ह

सातारा दि. 26 (जिमाका)
 एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार  91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला*
काल रात्री 25 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 33 असे एकूण 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली  आहे.
0000

Monday, May 25, 2020

27 जण बाधित ; जिल्ह्यात पुन्हा खळबळ

कराड
आता आलेल्या रिपोर्ट मध्ये जिल्ह्यात  27 बाधित आहेत त्यात काल वाई तालुक्यातील जांभळी गावच्या व्यक्तीचा मृत्यू पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील प्रशासन खडबडले आहे.बाहेरून येणाऱ्यावर बंधने घालणे गरजेचे झाले असल्याने त्या दिशेने आता प्रशासनाची पाऊले पडणे गरजेचे बनले आहे
दरम्यान काल एकदम 77 आणि 31 व आज पुन्हा 27 असा आकडा वाढल्याने जिल्ह्यात आज पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

मुंबई हुन आलेला एकजण सापडला पॉझिटिव्ह ; एकाचा झाला मृत्यू

सातारा दि. 25 (जिमाका)
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच  कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांबळी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या  पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
   मृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48  व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.
000

"कृष्णा' मधून आणखी दोघे झाले कोरोनामुक्त

कराड, ता. 25
येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या वनवासमाची येथील 24 वर्षीय युवक आणि 75 वर्षीय वृद्ध महिला या दोन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 56 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या कोरोनामुक्त रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

*सोबत* : फोटो

Sunday, May 24, 2020

171 जण निगेटिव्ह

सातारा दि. 25 (जिमाका)
 एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्या प्राप्त अहवालानुसार एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*बाधित महिलेस अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती*
काल दि. 24 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित 24 वर्षीय महिलेचे सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत.  तसेच आज पहाटे 3.30 वाजता कंटेन्मेंट झोन  भिमनगर, कोरेगाव येथील 22 वर्षीय महिलेची सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
*54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला*
काल दि. 24 मे रोजी रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 46 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे 8 असे एकूण 54 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुना एन.सी.सी.एस, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
00000

कराडच्या "ब्लु डायमंड ग्रुपचे' गरजूंना ईद साजरी करण्यासाठी सहकार्य

कराड
कोरोना महामारीचे संकट सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. त्या पार्श्वभूमीवर मधल्या काळातील लॉकडाऊन मुळे सर्व  व्यवहार  बंद होते. त्यामुळे  गोरगरीब जनतेचे  हाल  झाले.अनेकांनी मदतीचा हात पुढे करत आपली बांधीलकी जपल्याचेही पहायला मिळाले.  येथील ब्लु डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देखील आपल्या परीने गरजूंना मदत देण्याचे कार्य अद्याप सुरुच आहे. ईद सणाच्या निमित्ताने गरजू मुस्लिम बांधवांसाठी मदतीचा हात या डायमंड ग्रृप ने पुढे केला आहे त्यासाठी रमजान ईद सध्या सर्वत्र  साजरा होत असताना भागातील गरीब व गरजू मुस्लिम बांधवानादेखील ईद साजरी करता यावी यासाठी या ट्रस्ट च्या वतीने गरजू मुस्लिम बांधवाना ईद चे साहित्य नुकतेच देण्यात आले आहे .
 अनेक सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,अनेक नेते या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी लोकांसमोर येत आहेत .निरनिराळ्या माध्यमातून मदत करत आहेत.या प्रसंगी ही बांधिलकी जपण्याची गरज आहे. डायमंड ग्रुपच्या वतीनेदेखील गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व धान्य वाटप काही दिवसांपूर्वी करण्यात आले. 500 ते 600 मास्कचे वाटपदेखील सम्पूर्ण शहरातून या ग्रुपच्या वतीने केले गेले. आणि आता ईदच्या पार्श्वभूमीवर गरजू मुस्लिम बांधवांना केलेल्या मदतीतून डायमंड ग्रुपने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. शहरातून या ग्रुपचे अभिनंदन होत आहे.

कोरोना बाधित महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म ; कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे होतंय चौफेर कौतुक

कराड, ता. २४
 कोरोनाबाधित रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आज आणखी एक थक्क करणारी यशस्वी कामगिरी करून दाखविली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेची सीझर प्रसुती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आज दुपारी दीडच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, त्याचे वजन पावणे तीन किलो इतके आहे. कोरोनाच्या महाभंयकर साथीतही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून या बाळाचा जन्म झाला असून, बाळ आणि बाळाची आई अशी दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. अशाप्रकारे कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी प्रसुती होण्याची ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना असून, कृष्णा हॉस्पिटलच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मुंबईहून १५ दिवसांपूर्वी २४ वर्षीय गर्भवती गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथे आली होती. तिच्यामध्ये ‘कोविड-१९’ची काही प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने तिला २२ मे रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तत्काळ तिचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला.  २३ मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ती कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने तिच्यावर तातडीने कोरोनाच्या उपचारास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, या गर्भवती महिलेवर स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. मनिषा लद्दड व डॉ. आशुतोष बहुलेकर यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र उपचार सुरू करण्यात आले.

या महिलेचा गर्भवती काळ पूर्ण झाला असल्याने आणि तिला उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी तत्काळ तिची सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिची सिझेरियनद्वारे यशस्वीपणे प्रसुती करण्यात आली.

कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती यशस्वीपणे करण्यामध्ये स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष बहुलेकर, डॉ. रश्मीन साहू, डॉ. चिराग शर्मा, भूलतज्ज्ञ डॉ. माया कमलाकर, डॉ. निकिता लोले, डॉ. शालू शर्मा, बालरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. वाय. क्षीरसागर, डॉ. सोहम क्षीरसागर, डॉ. साबू इब्राहीम, डॉ. सुकेश, डॉ. दुर्गाप्रसाद, नर्स जयश्री विटकर यांच्यासह अन्य निवासी डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफचा समावेश होता.

या यशाबद्दल कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी हॉस्पिटलमधील स्त्री व प्रसुतीरोग विभाग आणि बालरोग विभागातील सर्व डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे कौतुक केले आहे.

दरम्यान, नवजात बालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
***

6 जण झाले पूर्ण बरे

सातारा दि. 24 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील  रुग्णालय, सातारा येथे जिल्हा कारागृहातील सहा  कैदी कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*67 जण विलगिकरण कक्षात दाखल*

तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे 29, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 38 असे एकूण  67 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही  डॉ. आमोद  गडीकर यांनी कळविले आहे.
  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 278 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 151  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यु झालेले 7 रुग्ण आहेत.
00000

Saturday, May 23, 2020

आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात 77 कोरोना बाधित सापडले ; जिल्हा हादरला

कराड
पुण्याहून आलेल्या रिपोर्टनुसार 31 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात परवा पाचगणी येथे मृत्यू पावलेल्या महिलेलाचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यात 40 कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा 6 रुग्ण सापडले. आता रात्री पुन्हा 31 नवीन कोरोना बाधित सापडल्याने आज दिवसभरत जिल्ह्यात एकूण 77 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर जिल्ह्यात सापडलेली हि सर्वाधिक आकडेवारी आहे.

आज सापडलेले रुग्ण कोणत्या तालुक्यातील आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र नव्याने सापडलेले बहुतांश रुग्ण हे पुण्या मुंबईहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कातून बाधित झालेले असल्याचे समजत आहे. तेव्हा बाहेरून प्रवास करून आलेल्या क्वारंटाईन मधील नागरिकांना नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 278 वर पोहोचली आहे. या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 158 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.


आज आणखी 6 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 23 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला (वय 44), गलमेवाडी कुंभारगाव ता. पाटण येथील 1 युवती (वय 24) असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

*139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54,  उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8 असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 247 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 127 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.
0000

Friday, May 22, 2020

धक्कादायक बातमी ; जिल्ह्यात 40 जण पॉझिटिव्ह ; चिंता वाढली

सातारा दि. 23 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील 34 व 60वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे  ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष  पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
     जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 241 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.
0000

मुलांसाठी यू ट्यूब वर बालशिबिराचे आयोजन

कराड
आयुष मंत्रालयाकडून सामान्यजनांना ध्यान करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला जात आहे.अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी घरातच राहून ध्यान शिकावे आणि सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या प्रेरणेने ह्या लाॅकडाऊनच्या काळात सगळ्यांना एक सकारात्मक सामूहिकता आणि वातावरण प्राप्त व्हावे या उद्देशाने  दि.२५/०५/२०२० रोजी सकाळी ७:३० वाजता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनसाठी प. पु. सद्गुरू श्री. शिवकृपानंद स्वामीजींचे ऑनलाइन मराठी बालशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या लॉक डाऊन च्या काळात समर्पण ध्यानाद्वारे संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने आली आहे...

तर चला जाऊया ...
 वर्तमान परिस्थितीत भरलेल्या नकारात्मकतेच्या वातावरणातून एका सकारात्मक दिशेकडे...

तसेच युट्यूब वर खालील चॅनल सबस्क्राईब करा
या सुवर्ण संधीचा फायदा घ्या...
http://www.shivkrupanandfoundation.org

आज 8 जण झाले कोरोनामुक्त ; त्यामध्ये कराडच्या सह्याद्री हॉस्पिटल मधील 7 जणांचा समावेश

सातारा दि. 22 (जिमाका) :  सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  दाखल असणारा  1 असे एकूण 8  कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर   येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 पुरुष  व 45  वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत.
  आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.
0000

एका बधितासह 3 जणांचा मृत्यू

सातारा दि. 21 (जिमाका) जावली तालुक्यातील एक पुरुष 58 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज सकाळी मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील 64 वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यु झाला असून संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी दिली आहे.
घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या 2 महिन्याचे बाळ  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे श्वास घेण्याचा त्रास होत होता   म्हणून  दाखल करण्यात आले होते. या 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला असून संशयित म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच नांदलापूर ता. कराड येथील 60 वर्षीय महिला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यु झाला असून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.

*146 जणांना अहवाल आले निगेटिव्ह*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 9, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 15 असे एकूण 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 जणांचे असे एकूण  146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
*109 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल*
दि. 21 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 87 असे एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 201 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 90 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 106 आहे तर मृत्यु झालेले 5 रुग्ण आहेत.
0000

Thursday, May 21, 2020

पुन्हा 4 जण पॉझिटिव्ह

सातारा दि. 19 (जिमाका)
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील  70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
00000

कराड जिमखान्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखाची मदत


कराड
येथील कराड जिमखान्याच्या वतिने मुख्यमंत्री सहाय्यता निघीसाठी म्हणून १ लाख रुपयाची मदत  देण्यात आली. या रकमेचा धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचेकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. यावेळी कराड जिमखान्याचे अध्यक्ष कुमार शाह,जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळी अनेक संस्था, सामाजिक संघटना, निरनिराळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी , नेते आपापल्या पद्धतीने समाजाची अनेकप्रकारे मदत करत आहेत.यातुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे योग्य काम हे सर्वजण पार पाडत आहेत.
कराड जिमखाना ही शहर व परिसरातील विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यासंबंधी अनेक वर्षांपासून अग्रेसर असणारी "वेलनोन' संस्था आहे. विशेषतः क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कराड जिमखान्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. कराड जिमखान्यांने काही वर्षांपूर्वी येथील शिवाजी स्टेडियम येथे रणजी ट्रॉफी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. तालुक्याच्या ठिकाणी हे सामने भरवून वाहवादेखील  मिळवली होती.शहरात पार पडलेले साहित्य सम्मेलन असो किंवा नाट्य संमेलन असो, पशु-पक्षी मित्र संमेलन असो,तसेच संगीताची पर्वणी ठरणारा दरवर्षी होणारा प्रीतिसंगम संगीत महोत्सव असो... असे अनेकविध उपक्रम राबवत या संस्थेने आपले काम समाजापुढे वेळोवेळी ठेवले आहे आणि  आपले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे. ही संस्था जेव्हा,जेव्हा लोकांसमोर येत असते त्यावेळी आपली बांधीलकी जपते व त्याचे नेहमीच कौतुक होते. याच बांधिलकीचा एक भाग म्हणून या वर्षीचे सर्व उपक्रम रद्द करून कराड जिमखान्यांने त्यातील रकमेचा काही भाग  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरवले. त्यानुसार एक लाखाचा धनादेश नुकताच ना.बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.अडचणीच्या काळात आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न कराड जिमखान्यांने यातून केला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

सातारा रुग्णालयातील 8 जण झाले पूर्णपणे बरे ; आज दिला डिस्चार्ज

सातारा दि. 21 (जिमाका)
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये तरडगाव ता. फलटण येथील 67 वर्षीय महिला व 6 वर्षाचा मुलगा, फलटण येथील 33 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 13 वर्षांची मुलगी, कोडोली ता. सातारा येथील 18 वर्षाचा युवक, महाबळेश्वर येथील 23 वर्षीय पुरुष, त्रिपूटी ता. कोरेगाव येथील 36 वर्षीय पुरुष व खटाव तालुक्यातील खरसिंगे या गावचा 18 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत. यांना आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 106 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.
0000

Wednesday, May 20, 2020

129 जणांचे अहवाल निगेटिव्ह

सातारा दि. 21 (जिमाका)
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 11, ग्रामीण रुग्णालय, वाई 7 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 12 असे एकूण 119 जणांचा अहवाल निगेटिव्ह तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचा असे एकूण 129 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
*70 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल*
दि.20 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57 असे एकूण 70 जणांना केले विलीकक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 19 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 181 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 79 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 4 रुग्ण आहेत.
00000

कृष्णा हॉस्पिटल मधील 4 जण पॉझिटिव्ह आढळले

सातारा दि. 20 (जिमाका) :  कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेले म्हासोली ता. कराड येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, मुंबई येथून प्रवास करुन आलेला  इंदोली ता. कराड येथील एक 39 वर्षीय पुरुष व ठाणे येथून प्रवास करुन आलेले भारेवाडी ता. कराड येथील पती - पत्नी वय वर्षे 52 व 43 अशा एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
      जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 170 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.

00000

भाजपा नेते विक्रम पावसकर यांच्यावतीने रोगप्रतिकारक होमिओपॅथिक गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप ; शहर व परिसरातून होतय कौतुक

अजिंक्य गोवेकर
कराड
भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या वतीने कराड येथील जवळ जवळ 5 ते 6 हजार कुटुंबाना आर्सेनिक 30 या आयुष मंत्रालयाने सुचीत केलेल्या रोग प्रतिकारक होमिओपॅथिक गोळ्यांचे नुकतेच मोफत वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे शहर व परिसरातून मोठं कौतुक होत आहे.

भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे शहर व परिसरातून सध्याच्या लॉक डाऊन च्या काळात मोठं योगदान दिसून आले आहे.त्यांनी काहि दिवसापूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे गोरगरिबांसाठी वाटप  केले आहे .भाजीपाला किट,तसेच पी पी ई किट चे वाटप देखील त्यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे. शहरातून औषध फवारणी करून देखील त्यांनी शहराच्या आरोग्याचा विचार करत बांधिलकी जपली आहे.नुकतेच त्यांनी आर्सेनिक 30 या होमिओपॅथिक रोगप्रतिकारक गोळ्यांचे शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी काय असावी...व आपले कर्तव्य कसे पार पाडावे... याचे उत्तम उदाहरण म्हणून विक्रम पावसकर यांच्याकडे पाहिले जात आहे. ते स्वतः ग्राउंड वरचे कार्यकर्ते आहेत.त्यामुळे त्यांना लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे चांगल्या प्रकारे महित आहे. ते नगरसेवक असताना त्यांनी स्वतःच्या पैशाने रस्त्यातील खड्डे मुजवून घेतले होते,व लोकांसाठी रस्त्याची झालेली दुरवस्था दूर केली होती हे अद्याप लोकांच्या लक्षात आहे. भाजपा व हिंदू एकता च्या माध्यमातून त्यांच्या यशस्वी कार्यपद्धतीमुळे ते शेकडो युवकांचे आशास्थान बनले आहेत.सध्याच्या लॉक डाऊन मध्ये त्यांनी केलेल्या सर्वच उपक्रमाचे व कामाचे जनतेतून कौतुक होत आहे.


आज "कृष्णा ' मधून तब्बल 20 जणांना मिळणार डिस्चार्ज ; कृष्णा हॉस्पिटल ने केले रेकॉर्ड...

अजिंक्य गोवेकर
कराड
कृष्णा हॉस्पिटलच्या यशस्वी उपचारामुळे कोरोनामुक्त झालेल्या तब्बल 20 रुग्णांना आज दुपारी ठीक 3.30 वाजता डिस्चार्ज  दिला जाणार आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत ही  सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे.एका दिवशी एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत कृष्णेच्या नावाने आज रेकॉर्ड नोंदवले गेले आहे.
सम्पूर्ण राज्यभरातून कृष्णाच्या या यशस्वीतेचे कौतुक होत आहे.

Tuesday, May 19, 2020

सातारा कारागृहातील 2 रुग्ण पूर्ण बरे झाले ; 90 जण झाले दाखल

सातारा दि. 19 (जिमाका)
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 31 व 58 वर्षीय जिल्हा कारागृहातील 2 कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने या 2 रुग्णांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचित्किस डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

*90 जणांना केले दाखल*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 24, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 32, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 14, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 12 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 8 असे एकूण 90 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
सध्या  सातारा येथे 25, सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 33 असे एकूण 68 कोविड-19 बाधित रुग्ण दाखल आहेत. *त्यापैकी 66 जणांचे लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित 2 रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.*
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 75 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
0000

कराडच्या ब्लु डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंसह मास्कचे वाटप ; उपक्रमाचे शहरातून होतय कौतुक

कराड-  कोरोनाच्या सध्याच्या उदभवलेल्या  संकटांमुळे गोरगरीब जनतेची परवड सुरू आहे.अनेक मदतीचे हात त्यांना मदत करण्याकरिता पुढे येत असतानाच, येथील ब्लु डायमंड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेदेखील या गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू तसेच मास्कचे वाटप नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाचे शहरातून कौतुक होतय.
ब्ल्यू डायमंड चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. कोरोनाच्या या  महामारीमध्ये सध्या देशात गेली 50 दिवस झाले लॉकडाऊन चालू आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. अशा बिकट परिस्थिती मध्ये मदतीचा हात पुढे करत येथील
 ब्ल्यू डायमंड चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी स्वखर्चाने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज ओळखून तेल, चटणी, मीठ, साबण, साखर, व इतर वस्तूचे मिळून सुमारे शंभर किटचे वाटप केले. प्रशासनाने  मास्कचा वापर सक्तीचा केला असूनदेखील काही नागरिक मास्कचा वापर टाळतात हे ओळखून या भागात सुमारे 500 ते 600 मास्क वाटप करण्यात आले. तसेच कोरोना पासून  वाचण्यासाठी घरात रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा असा संदेश देत लोकांना याबाबत मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
सदर उपक्रमास या ट्रस्ट चे अध्यक्ष अमोल सोनावले तसेच माजी नगरसेवक गंगाधर जाधव, डॉ अनिल वाघमारे, सचिन आढाव, जावेद भाई रंगरेज, मिलिंद कांबळे, विनोद सोनवले, रत्नाकर कांबळे, राहुल सोनवले, प्रीतम थोरवडे, अमोल कराडकर,  विश्वनाथ शिंदे महेंद्र रणबागले, विशाल दुपटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Monday, May 18, 2020

सातारा जिल्ह्यात आणखी 8 जण पॉझिटिव्ह सापडले

सातारा दि. 19 (जिमाका)
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेला  लोणंद येथे मुंबई येथून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी ता. खटाव येथील अकोला येथून प्रवास करुन ओलेले  55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे म्हासोली गावातील कोविड बाधित रुग्णाचे निकट सहवासित दोन पुरुष अनुक्रमे 45 व 62 वर्षे आणि तीन महिला अनुक्रमे 48, 35 व 60 वर्षे असे एकूण 8 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
तसेच मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेली 58 वर्षीय खंडाळा येथील एका महिलेचा अहवाल कोविड बाधित आल्याने या महिलेला  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तीची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणाना केली जाणार नाही.
*10 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह*
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
*32 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल*
दि.18 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील विलगीकरण कक्षात  32 जणांना   दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत,   अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 71 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
0000

आज जिल्ह्यातून 7 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले ; त्यामध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश

सातारा दि. 18 (जिमाका)
  जिल्ह्यात सातारा येथून 3 व कराड येथून 4 अशा एकूण 7 कोरोनाबाधितांचे चौदा दिवसानंतरचे घशातील स्त्रावाचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
डिस्चार्ज देण्यात आलेल्यामध्ये सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेतलेल्या कारागृहातील 2 कैदी (एक महिला वय-45 व युवक वय 18वर्ष) आणि कोरेगाव तालुक्यातील सोनके येथील 1 पुरुष (वय 40)यांचा समावेश आहे  तर कराड कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये उपचार घेतलेली मलकापुर येथील दोन वर्षाची 1 बालीका व 1 पुरुष (वय 37) व आगाशिवनगर आणि खोडशी येथील 2 पुरुष ( दोघांचेही वय 68)  यांचा समावेश आहे.
0000

सातारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट आता देणार पार्सल सेवा ; नियम व अटींसह मिळाली परवानगी

सातारा दि. 18 (जिमाका)
  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने दि. 31 मे 2020 पर्यत चौथा लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य, पोलिस, सरकारी अधिकारी, आरोग्यसेवा कर्मचारी, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले नागरिक, पर्यटक आणि अलगीकरण कक्षातील व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच बस डेपो, रेल्वेस्थानक  वगळून जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट धारकांनी त्यांचे रेस्टॉरंट मधील किचनमध्ये मागणीनुसार ताजे खाद्यपदार्थ तयार करुन ते सकाळी 8 ते सांय 6 या निर्धारीत वेळेत ग्राहकांच्या मागणीनुसार फक्त होम डिलीव्हरी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढील अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी देण्यात दिली आहे.
कोणत्याही परिस्थितीत रेस्टॉरंटच्या किचन मधील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त रेस्टॉरंट मध्ये इतर कोणत्याही त्रयस्थ नागरिकांस प्रवेश देवू नये. रेस्टॉरंट किचनमधील कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टंन्सिंग पाळणे व मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंटमधून मागणीप्रमाणे पार्सल सेवा पुरविण्याची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत राहील. रेस्टॉरंट मधील किचन व्यतिरिक्त इतर कोणताही विभाग व खोली उघडण्यास अथवा वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. रेस्टॉरंट मधील किचनमध्ये रोजच्यारोज स्वच्छता राखवी आणि वेळोवेळी किचन मधील जागा व इतर साहित्य् यांचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. पार्सलसेवा देताना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस स्विकारता येणार नाहीत. डिलीव्हरी देणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित रेस्टॉरंटचा ड्रेसकोड व ओळखपत्र असणे बंधनकारक राहील. रेस्टॉरंट मालकाने शक्यतो होम डिलीव्हरीच्या ऑडर्स ह्या ऑनलाईन पध्दतीने स्विकारुन संबंधित ग्राहकास ऑनलाईन पध्दतीने माहिती पुरवावी. पार्सलसेवा पुरविणाऱ्या व्यक्तीने मास्क् किंवा फेस शिल्ड वापरणे बंधनकारक असून संबंधीत व्यक्तीने ग्राहकामध्ये कमीतकमी सहा फूट अंतर ठेवून सेवा  पुरवायची आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात येत आहे आणि कोणतेही व्यक्ती थुंकल्यास त्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांच्याकडे जमा करावा किंवा त्या स्थानिक संस्थेने सक्तीने वसूल करावा.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट व्यावसायिकाविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
0 0 0 0

अतीत परिसरातील 2 जण पॉझिटिह सापडले

कराड
आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या सातारा तालुक्यातील नागठाणे,आतित,अपशिंगे,वेनेगाव विभागात पाहिले 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने या विभागासह पूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ह्या ठाणे येथून नुकत्याच आपल्या गावी आले होते.कोरोना चाचणी तपासणी पॉझिटीव्ह झाल्यानंतर प्रशासन आता आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 15 मे रोजी आतित गावापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणानगर ( लांडेवाडी)  या गावात खाजगी गाडीने 1 कुटुंब (2 पुरुष आणि 3 महिला) ठाणे येथून आले होते, गावातल्या सुज्ञ लोकाकडून आणि आरोग्य विभागाकडून त्यांना गावात असलेल्या प्राथमिक शाळेत थांबविण्यात आले, यांची वैद्यकीय तपासणी दरम्यान एक 65 वर्षीय वृध्दाला आणि 27 वर्षीय तरुणाला ताप व घश्याचा त्रास जानवू लागल्याने नांदगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी या दोघांच्या घश्यातील नमुने तपासनीसाठि पाठविले होते, रविवारी उशिरा या दोघांचे अहवाल पाँझेटिव्ह आले.

 त्यांना तात्काळ जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. वारणानगर (लांडेवाडी) सह परिसरातील नागरिकांची झोप या घटनेने उडालेली आहे. जिल्हाप्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले असून परिसरातील 3 किलोमीटर परिघात असलेली 5 गावे बफर झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.याबाबत अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे.संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सूरु असून कुटुंबाला होमकोरोनटाईन करणे तसेच आवश्यक असलेल्या तपासणी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे.
                   
 सोमवारी सकाळपासून आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रशासनाने तात्काळ वारणानगर (लांडेवाडी) हे गाव मायक्रो कंटेन्मेंट झोन केले तर परिसरातील वेनेगाव, जावळवाडी, निसराळे, खोडद. खोजेवाडी ही 3 किलोमीटर परिघातील गावे बफर झोन म्हणून जाहीर केले. कुटुंबातील इतर सदस्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने सोमवारी उशिरा तपासणीसाठी पाठविण्यात आले जिल्ह्यधिकारी शेखर सिंह, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दा. गुं. पवार, नागठाणे आणि नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जे. कांबळे, डॉ. सि. पी. सातपुते, डॉ. एम. पी. रायबोळे यांनी भेट देऊन माहिती घेतली.ग्रामसेवक पवार, गाव कामगार तलाठी कुंभार, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, परिसरातील आशा सेविका, गावचे सरपंच आणि सर्व सदस्य यावेळी उपस्थित राहून गावातील 451 लोकांची आरोग्यतपासणी व माहिती घेत आहेत. बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. डॉ. सागर वाघ, स. उप.पो. नि. वर्षा डाळिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी या गावात कडक बंदोबस्त करत आहेत तसेच बफर झोन सह परिसरातील गावामध्ये बंदोबस्त केला जात आहे.

Sunday, May 17, 2020

पुन्हा 5 जण पॉझिटिव्ह सापडले

सातारा दि. 18 (जिमाका)
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा ठाणे येथून प्रवास करुन आलेला 26 वर्षीय व 67 वर्षीय पुरुष व मुळची सोलापूर जिल्ह्यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेली एक 32 वर्षीय महिला व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे कोविड बाधित रुग्णाचा निकट सहवासित म्हणून दाखल असणारे 53 व 22 वर्षीय नागरिक असे एकूण 5 नागरिकांचे अहवाल   कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*93 जणांना अहवाल आले निगेटिव्ह*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 64 व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 3 असे एकूण 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 138 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 70 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.
0000

जेष्ठ साहित्यिक,नाटककार,रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे कोरोनामुळे निधन

कराड
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन आहे. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
मुंबईत 17 नोव्हेंबर 1938 साली त्यांचा जन्म झाला होता. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रातून 1958 साली त्यांनी पदवी संपादन केली होती. बँक ऑफ इंडियामध्ये 20 वर्ष त्यांनी नोकरी केली होती.
1955 मध्ये त्यांनी 'वेडी माणसं' या एकांकीकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी ते अवघे 16 वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती.
दरम्यान, रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

उंब्रज येथील 2जण पॉझिटिव्ह

कराड

उंब्रज येथील चोरे रोड परिसरातील कराड कॉटेज येथील कर्मचारी युवतीच्या निकट सहवासातील दोन जण कोरोना बाधित असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोना पॉझिटीव्ह असणारे दोन्ही व्यक्ती सध्या कराड येथे इन्स्टिट्यूट क्वारनटाईन असल्याने फारशी चिंतेची बाब नसल्याचे मत डॉ संजय कुंभार यांनी व्यक्त केले असून आता या दोन नवीन बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करणार असल्याचे सांगितले

मुस्लिम बांधवांनी,गरिबांना मदत करून ईद साजरी करावी ; काँग्रेस अल्पसंख्यांक नेते झाकीर पठाण यांचे आवाहन

कराड
कोरोनाचा कहर सुरु असून रोजगार बंद पडल्याने गोरगरिब लोकांवर उपासमाराची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत रमजान ईद ची खरेदी न करता गोरगरीब व गरजू लोकांना मदत करावी.असे आवाहन सातारा जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण यानी केली.
राज्य व देशा सह जगभरावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी जवळपास 50 दिवसापासून देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने लोकांवर उपासमाराची वेळ आली आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु आहे.तर रमजान ईद हि जवळ आली आहे.मुस्लिम समाजाच्या माध्यमातून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.रमजान ईदला मुस्लिम समाजात घरो घरी खरेदी केली जाते.सध्या कोरोनाचा संसर्गाचा धोखा असल्याने मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी बाहेर जाने टाळावे.उलट खरेदीचा खर्च टाळून समाजातील गोरगरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचे आवाहन झाकीर पठाण यांनी केले.

कराड तालुक्यात 3 जण कोरोना पॉझिटिव्ह

कराड
रविवार दि.१७ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे सांगितले आहे. यामध्ये म्हसोली येथील  2 जण आणि आगाशिवनगर  येथील 1 जण असल्याची माहिती मिळत असून,दोन जण कोरोना मुक्त झाले आहेत 
शासनाकडून टाळेबंदी 31 मे पर्यंत वाढण्याचे आदेश आले आहेत,सातारा जिल्हा रेड झोन मध्ये आहे चालू असणाऱ्या त्या सेवा चालू राहतील नव्याने कोणतीही सूट दिलेली नाही असे कराड नगरपरिषदेने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील साखर उद्योगांना केंद्राने भरीव पॅकेज द्यावे ; ना. शंभूराज देसाई यांनी केली मागणी

अजिंक्य गोवेकर
कराड
राज्यातील अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेकरीता केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला मदत करावी,सहकार्य करावे अशा पध्दतीचे मागणी करणारे लेखी पत्र देशाचे माजी कृषी मंत्री,सहकारातील गाढे अभ्यासक आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांना दिले आहे.शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या या मागणीनुसार केंद्र शासनाने व विशेषत: देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांनी यावर धोरणात्मक निर्णय घेवून अडचणीत सापडलेला सहकारी साखर उद्योग सावरण्याकरीता साखर उद्योगांना केंद्र शासनाकडून भरीव पॅकेज दयावे अशी मागणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष,राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी राज्यातील सहकारी साखर कारखानदारांच्या वतीने केली आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांना अडचणीत सापडलेल्या सहकारी साखर कारखानदारीला वाचविण्याकरीता दिलेल्या लेखी पत्राच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.त्यावेळी पवारसाहेबांच्या मागणीला दुजोरा देत याची खऱ्या अर्थाने गरज होती कारण गत तीन वर्षापासून महाराष्ट्रातील संपुर्ण साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक अडचणीमधून जात आहे.जागतिक आणि देशातंर्गत बाजारापेठांमध्ये मोठया प्रमाणात साखरेचे भाव कोसळले आहेत त्यामुळे सर्वच सहकारी साखर कारखाने प्रचंड आर्थिक तफावतीमध्ये आले आहेत. ज्यावेळी केंद्रसरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दयावयाचा ऊसाच्या दराचा (एफआरपीचा) भाव निश्चित केला त्यावेळी बाजारामध्ये असणारा साखर विक्रीचा दर आणि प्रत्यक्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देत असताना साखरेला बाजारात मिळालेल्या दरातील फरक पाहिला तर किमान एका साखरेच्या पोत्याला ७०० ते ८०० रुपये ही घट याठिकाणी आली आहे. केवळ साखरेचे अनिश्चित भाव, साखरेचे कोसळलेले भाव हेच सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडण्यामागचे प्रमुख कारण असल्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांकडे जी लेखी पत्रानुसार विनंती केली आहे ती अतिशय योग्य आणि गरजेची असून आदरणीय पवारसाहेबांच्या विनंतीनुसार केंद्राने यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा व ही मदत सहकारी साखर उद्योगाला या घडीला देणे अत्यंत गरजेचे आहे.
 दरम्यान कोरोनाचे लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे सांगली जिल्हयामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्यावेळी त्या कार्यक्रमास मी देखील उपस्थित होतो. कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी मी पवारसाहेबांची भेट घेतली व पवारसाहेबांना याच विषयासंदर्भात मी लेखी पत्र देवून अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाची ही सर्व परिस्थिती त्यांचे निदर्शनास आणून देत आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढणेसंदर्भात केंद्र शासनानेच एखादे भरीव पॅकेज दयावे  या अनुषगांने त्यांचेबरोबर माझी चर्चा देखील झाली होती. त्यावेळी कोरोनामुळे एवढे दिवस लॉकडाऊन होईल असे कुणालाही वाटले नव्हते.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर केंद्र सरकार एवढया मोठया घोषणा करीत आहे त्यातलाच एक छोटासा हिस्सा म्हणून केंद्रशासनाने सहकारी साखर उद्योगाला भरीव पॅकेज जाहीर करावे याची भरीव मदत सहकारी साखर उद्योगाला,ऊस उत्पादक शेतकरी,कारखान्यात काम करणारे कामगार,तोडणी मजुर या सगळयांनाचा होईल.त्यामुळे पवारसाहेबांनी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीसाहेबांकडे केलेल्या मागणीनुसार केंद्र शासनाने सहकारी साखर उद्योगाला भरीव पॅकेज दयावे अशी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही सर्व साखर कारखानदार केंद्र शासनाकडे मागणी करीत आहोत.असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले

Saturday, May 16, 2020

संवेदनशील मनाचे नेते ; उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील

अजिंक्य गोवेकर
कराड
येथील पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत(दादा)पाटील यांनी  आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन नुकतेच शहराला दाखवून देत इतरांसमोर आपला आदर्श निर्माण केला आहे असे आता म्हणावे लागेल.कोरोना मुक्त रुग्णाचा खास त्या ठिकाणी जाऊन सत्कार करून त्या रुग्णाला मानसिक आधार देण्याचे  काम त्यांनी नुकतेच केले आहे. आपल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने त्यांनी कळत न कळत दिल्याने राजकारन्यातील संवेदनशील माणूस त्यांच्यारूपाने कराडकरांना दिसला आहे.
सर्वत्र सध्या कोरोनाच्या थैमानाने सगळेच जण अक्षरशः भयभीत अवस्थेत आपले जीवन व्यथित करीत आहेत. अशा वेळी या लोकांना धीर देण्याची  गरज आहे.येथील रुक्मिणीनगर मधील एका महिलेला कोरोना झाल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले.त्या महिलेची येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर ती महिला पॉझिटिव्ह आहे असा अहवाल आला होता.त्यानंतर या महिलेला येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या महिलेला कोरोनामुक्त म्हणून डिस्चार्ज देण्यात आला.
 सदर महिला मूळची मंगळवार पेठेतील आहे. त्यांच्या कुटुंबाचा जयवंतराव पाटील यांच्या कुटुंबाशी स्नेह आहे. सदर महिलेला डिस्चार्ज मिळाल्याचे समजताच दादां कृष्णा हॉस्पिटल येथे गेले. दादांना  पाहून प्रचंड दडपणाखाली असलेली ही रुग्ण महिला रडू लागली. त्यावेळी त्या महिलेचे सांत्वन करत दादांनी व कृष्णाच्या डॉक्टर्सनी त्याठिकानि तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तिला मानसिक आधारही दिला.संवेदनशील जयवंतदादांची सामाजिक बांधिलकी व जनतेप्रती त्यांचा असणारा कर्तव्यदक्षपणा यानिमित्ताने कराडकरांसमोर आला.
राजकारण म्हटलं की... लोकांचा राजकारण्यांकडे बघण्याचा वेगवेगळा ड्रीष्टिकोन असतो मात्र येथे जयवन्तदादा सारखे लोकही आहेत की ज्यांना माणुसकी व इतरांच्या भावनांची कदर आहे हे या  घटनेमुळे लोकांना समजले. लॉक डाऊन काळात दादांनी दोन हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप कोणतीही जाहिरातबाजी न करता केलं.लोकांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी दादा नेहमीच सतर्क व सज्ज असतात.शहराचे जबाबदार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अतिक्रमण मोहिमेत व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानास मुख्याधिकारी डांगे हेच जबाबदार आहेत,डांगेनि शहराच वाटोळं केलं अशी रोखठोक व लोकांच्या मनातील प्रतिक्रिया देणारे शहरातील व्यापाऱ्यांचे ते नेते आहेत.याच कारणाने दादांना आपल म्हणणारा माणूस त्यांच्यापासून कधीच लांब गेलेला पाहायला मिळत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.


Friday, May 15, 2020

कराड येथील 1जण पॉझिटिव्ह

सातारा दि. 16 (जिमाका) : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पुणे येथून प्रवास करुन आलेला एका प्रवाशाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*74 जणांचा अहवाल निगेटिव्ह*
तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय वाई येथील 9 असे एकूण 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे  बी. जे. वैद्य'कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
*104 जण विलगीकरण कक्षात दाखल*
काल दि. 15 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 40, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 64 असे एकूण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 129 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 66 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.
0000