Tuesday, May 5, 2020

24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांचा राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवस साजरा

कराड दि.6 (प्रतिनिधी)
 विश्वाला हादरुन टाकणारा कोरोना अवतरला.जो तो आपआपल्या परीने याविरुद्ध लढतोय.त्यात सर्वात जास्त ताण पोलिसांवर पडला आहे.घरापासून स्वतःला दुर ठेऊन जीव  धोक्यात घालून जनतेला या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेत आहेत.अशा या पोलिस बांधवांबाबत जनतेत अभूतपूर्व प्रेमाची ,आदराची ,आपलेपणाची भावना पहायला मिळत आहे.याच सामाजिक बांधीलकीला आपले कर्तव्य मानत राजमाता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसदादाचा  वाढदिवस साजरा करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला.देवानंद खाडे सातारा पोलिस दलात गेली 12 वर्षे कार्यरत आहेत.महाबळेश्वर, सातारा, कराड या ठिकाणी सेवा बजावली आहे.गुन्हे प्रकटीकरण शाखेचा अनुभव असलेले खाडे सध्या कराड शहरातील मंडई पोलिस चौकी येथे कार्यरत आहेत.100 टक्के लाँकडाऊन साठी ते सध्या अविरत कार्यमग्न आहेत.अशा वेळी स्वतःचा वाढदिवस सुध्दा विसरुन गेलेले खाडे यांचा वाढदिवस राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केक कापून साजरा करण्यात आला.खटाव तालुक्यातील एनकुळ गावचे देवानंद खाडे हे या अनपेक्षित प्रसंगाने भाराऊन गेले.कोरानाशी लढणाऱ्या कराडकरांसमवेत ते कराडकर होऊन लढत आहेत.म्हणून राजमाता प्रतिष्ठानने देवानंद खाडे यांचा वाढदिवस एक कौटुंबिक सोहळा समजून साजरा केला.यावेळी अध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान),दिलीप घोडके,काँन्टेबल प्रविण काटवटे,काँ.गणेश वेदफाटक,काँ.रोहित पाटील, काँ.अमोल जगताप अदि.उपस्थित होते.

No comments:

Post a Comment