Saturday, May 2, 2020

खासदार उदयनराजेंकडून पत्रकारांचे कौतुक ; म्हणाले... स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व माहिती आपल्याला घर बसल्या पोहोचवत आहेत

अजिंक्य गोवेकर
सातारा
राज्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे अशातही आपला जीव धोक्यात घालून स्वतःची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच यामध्ये पत्रकारही कुठे मागे नसून ते सर्व अपडेट आपल्याला घर बसल्या पोहोचवत आहेत. यापार्श्वभूवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार मित्रांचे कौतुक करत त्यांना सलाम ठोकला आहे.

संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आपल्या तसेच रुग्णांच्या सेवेस तत्पर असणाऱ्या आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस जवानांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण झाले आहे ही खूप चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे लोकशाही चा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील आपले पत्रकार मित्र सुद्धा कोरोना संक्रमणापासून वाचू शकले नाहीत, दिवस रात्र जनतेसाठी आपल्या वाचकांसाठी उन्ह, वारा, पाऊस तसेच नैसर्गिक आपत्ती असेल पत्रकार कधी मागे हटला नाही असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांचे कौतुक केले आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेयर करून भोसले यांनी पत्रकार मित्रांचे कौतुक केले आहे.


No comments:

Post a Comment