सातारा : लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात परवानगी काढून सर्व उद्योग सुरू करण्यास आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. ग्रामीण भागातील सर्व दुकाने व खासगी कार्यालये सुरू करण्यासही मुभा देण्यात आली आहे.
सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत ही दुकाने सुरू राहतील. शहरी भागामध्ये कंटेनमेंट क्षेत्र वगळून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरी भागात निर्बंध असले, तरी आता ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment