Monday, May 4, 2020

खराडे दाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी ; लग्नाच्या वाढदिनी 11 हजार 11 रुपये देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केले सहाय्य


अजिंक्य गोवेकर
कराड
येथील अभियंते तुषार खराडे व त्यांच्या पत्नी  नगरसेविका सौ.सुप्रिया तुषार खराडे यांच्या वतीने आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उभयतांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधिस अकरा हजार अकरा रुपये चा धनादेश कराडचे तहसिलदार श्री अमरदीप वाकडे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी गटनेते राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या माध्यमातून लोक आपली बांधीलकी जपत समाजाप्रती कर्तव्य भावनेने मदतीसाठी पुढे येत आहेत. या संकटकाळा मध्ये अशा प्रकारच्या सहकार्याच्या भूमिकेने इतर लोकांसमोर आदर्श निर्माण होऊ लागला आहे.  खराडे यांचे बंधू राहुल खराडे हे सामाजिक कामातून नेहमीच जनतेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढे असतात. यामुळे समाजात त्यांना मानणारा वैचारिक असा वर्ग आहे,आणि याच वैचारीकतेच्या बळावर समाजासाठी राहुल यांची वाटचाल सुरू आहे.सध्याच्या लॉक डाऊन च्या काळात देखील त्यांची जनतेला मदत करण्याची धडपड दिसते आहे. त्यांनी गरजू ना जीवनावशक वस्तूंचे किट देखील या काळात वाटली आहेत.लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदात्त हेतूने अभियंते तुषार खराडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिलेली ही मदत समाजाप्रती असणारी त्यांची बांधिलकी स्पष्ट करीत आहे.

No comments:

Post a Comment