Friday, April 9, 2021

कराडात व्यापाऱ्यांच्या एक हजार कोविड चाचण्या ; फक्त 15 जण सापडले पॉझिटिव्ह...

कराड
शहरात कोरोनाच्या चाचणीसह लस देण्याची क्षमता पालिकेने वाढवली आहे. दररोज किमान दोन हजार लोकांना लस देता येईल, अशी सोय पालिकेने केली आहे. शासनाकडून लशीचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने पालिकेच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. दरम्यान कोरोनाच्या चाचणीच्या मर्यादा वाढवल्या आहेत. पालिकेने एक हजार व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणी केल्या आहेत. त्यात 15 व्यापारी, विक्रेते पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या 84 झाली आहे.
 
बुधवारी रात्री तालुक्‍यात 49 बाधित झाले आहेत. त्यात शहरातील 10 बाधितांचा समावेश आहे. शहरात 12, शनिवार पेठेत पाच, बुधवारात दोन, तर शुक्रवार, रविवार, सोमवार पेठेत प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे पालिकेने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. शहरात आजअखेर एक हजार व्यापाऱ्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात 15 व्यापारी कोरोनाबाधित आहेत.

No comments:

Post a Comment