कराड
येथील पालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने वाखान रस्त्यावरील असलेल्या मुख्याधिकारी निवास या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू केली आहे याठिकाणी आत्ता पर्यंत शेकडो जणांनी लस घेतली आहे येथे लस घेणाऱ्या प्रत्येकाची आदराने चौकशी होते त्यांना ने-आण करण्यासाठी सौरभ पाटील यांनी स्वतःची वाहने ठेवली आहेत महिला व पुरुष याना स्वतंत्र विश्रांती कक्ष याठिकाणी केले आहेत तेथे येणाऱ्यांचा रक्तदाब तपासला जातो सोशल डिस्टन्सचा अवलंब तंतोतंत त्याठिकाणी पाळला जातोय चक्क चहा- पाण्याची सोयदेखील येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी गटनेत्यांनी करून ठेवली आहे एक आदर्श लसीकरण केंद्र म्हणून याकडे पाहिलं जात आहे. सौरभ तात्यांच्या सुविद्य पत्नी स्वतः डॉक्टर आहेत. आणि त्याठिकाणी लोकांना लस देण्याबाबतची जबाबदारी त्या स्वतः पार पाडत आहेत
नगरसेवक सौरभ पाटील हे पहिल्यांदाच निवडून येऊन देखील शहरातील लोकप्रिय नगरसेवक म्हणून सर्वपरिचित झाले आहेत.वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याची, विषयाला पारखून त्याचे विश्लेषण करण्याची त्यांची खासियत आहे.कार्यकर्त्यांना बळ देण्याचा त्यांच्या हातखंडा आहे. निष्ठवंत कार्यकर्त्यांची त्यांच्याकडे मोठी फौज आहे त्यांनी कोरोना काळात कोणतीही जाहिरातबाजी न करता मोठं काम केलं आहे शहराचे सॅनिटायझिंग,मास्क वाटप,करत त्यांनी कोरोनाबाबत जन-जागृतीदेखील केली आहे अनेकांना मदतीचा हात देत त्यांनी आपली बांधीलकी जपल्याचेही सर्वांना माहीती आहे सध्या त्यांनी पालिकच्या सहकार्याने काही सुविधांसह सुरू केलेल्या लसीकरण केंद्राद्वारे शेकडो जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे अधिकाधिक लोकांनी लसीकरण करून घ्या असे आवाहन गटनेते सौरभ पाटील यांनी केलं आहे
आमचा नेता लय पॉवरफुल....
ReplyDeleteGreat
ReplyDelete