Saturday, April 10, 2021

उदयनराजेंचा लॉक डाऊनला विरोध : राजे म्हणाले...उद्यापासून साताऱ्यात नो लॉक डाऊन

कराड
खा उदयनराजे भोसले यांनी आज शनिवारी दुपारी पोवई नाका येथे सध्या सुरु असणाऱ्या लॉक डाऊन विरोधात आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी त्यांनी प्रशासनालादेखील उद्यापासून "नो लॉक डाऊन' असे कडक भाषेत सूनावले...
प्रशासनाने आजपासून पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला साताऱ्यात आज सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी लॉकडाउनला जिल्ह्याच्या विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसुम दिसत होती. मात्र, या लॉकडाउनला साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येथील पोवई नाक्यावर त्यांनी हातात थाळी घेऊन प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाउनचा निषेध केला. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.

No comments:

Post a Comment