वेध माझा ऑनलाइन
कराड
वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभूराज देसाई हे बिनकामाचे पालकमंत्री म्हणून त्याठिकाणी अल्पावधीत चर्चेत आले आहेत. सम्पूर्ण कोविड काळात अकार्यक्षम नेता म्हणून त्यांची वाशीम जिल्ह्याने पारख केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने वाशीम जिल्ह्यात सध्या बोंब सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा असे ओपन चॅलेंज करत तसा मचकूर असणारे पोस्टर्स वाशीम जिल्ह्यात लावण्यात आले आहेत, तर सातारा जिल्ह्यातील त्यांच्या चमकोगिरी करत गल्लीबोळात सायरन वाजवत फिरण्याचीदेखील कराड व परिसरात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून किंवा अन्य इतर मार्गाने गरज असताना आणि नसतानाही जिल्ह्यांतील सार्वजनिक कामात लक्ष घालणारे नामदार शंभूराज देसाई हे महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आजतागायत पालकमंत्री म्हणून ते त्याठिकाणी फिरकलेच नाहीत असे तेथील लोक सांगतात. कोरोनाचा सम्पूर्ण राज्यात प्रकोप चालू असताना प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याच्या कारणानें आपली जबाबदारी ओळखून ग्राउंडवर काम करताना दिसत आहेत. आपआपल्या जिल्ह्याच्या मागणीनुसार त्याठिकाणी कोविड सेंटर उभी करत आहेत. जिल्ह्यात लसीकरणाच्या साठ्यासाठी पाठपुरावा करताना दिसत आहेत. इंजेक्शन च्या तुटवडा आपल्या जिल्ह्यात जाणवू नये म्हणून शासनदरबारी लोकांसाठी भांडताना दिसत आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र वाशीम जिल्ह्यातील ना शंभूराज देसाई यांचे अकार्यक्षमतेचे उदाहरण चर्चेत आहे.
ना शंभूराज देसाई राज्यातील वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 26 जानेवारीचा तेथील कार्यक्रम करून त्याठिकाणी ते परत फिरकलेच नाहीत अशा तेथील लोकांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे कोरोना संकटात तेथील जनता पालकमंत्र्याविना सध्या वाऱ्यावरच आहे.याउलट
सातारा जिल्ह्यात उगीचच सायरन वाजवत गल्ली बोळात फिरून नुसतीच चमकोगिरी करणारे नेते म्हणून त्यांची इथेही ओळख तयार झाली आहे. सध्या कोविडच्या महामारीत सातारचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील हे अक्षरशः पायाला भिंगरी बांधून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने यशस्वी काम करत आहेत. त्यांचं काम सक्षमपणे चालू असताना ना देसाई अधूनमधून मी पण जिल्ह्यात काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी स्टंट करत जिल्ह्याच्या एकूणच कामात लक्ष घालताना दिसत आहेत अशी चर्चा आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या किरकोळ कारणावरून वारंवार बैठका घेतानाही ते दिसत आहेत, त्यामुळे अधिकारीवर्ग अक्षरशः त्यांच्या हस्तक्षेपाला वैतागला असल्याचेही समजते.
ना देसाई हे वाशीमचे पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी झटकुन मोकळे झाले आहेत. त्या ठिकाणी वेळोवेळी कोरोनाचा आढावा घेणे, जनतेची विचारपूस करणे, आवश्यकतेनुसार कोविड सेंटर व ऑक्सिजन सेंटरची उभारणी करणे, यासारख्या जबाबदाऱ्या त्यांनी इतर पालकमंत्र्यांप्रमाणे पार पाडणे तेथील जनतेला अपेक्षित होते मात्र, तेथील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आता ना देसाईंना वाशिममध्ये फिरकू न देण्याचे तेथील लोकांनी ठरवले असल्याचे समजते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दाखवा आणि एक रुपया मिळवा असे जाहीरपणे चॅलेंज करण्यात आले आहे. तसा मचकूर असणारे पोस्टर्सही सगळ्या भागात लावले गेले आहेत. या एकूणच प्रकारामुळे नामदार शंभूराज देसाई यांची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आलेली पहायला मिळत आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यात सायरन वाजवत गल्लीबोळातून फिरण्यापेक्षा वाशीममध्ये फिरून त्याठिकाणचे पालकमंत्री या नात्याने आपली जबाबदारी पार पाडावी अशी चर्चा राज्यभर सुरू आहे.
No comments:
Post a Comment