आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्दे मांडले. ऑक्सिजन, रेमडेसेवीर, लशी आपल्या न्याय हक्काप्रमाणे मिळावे. रिकामे टँकर एअर फोर्सच्या विमानाने नेले जातील, भरलेले टँकर रेल्वे मार्गाने आणले जातील. आपल्याला दूरच्या राज्यातून ऑक्सिजन मिळतोय पण तो आणलाय उशीर लागतोय. त्यामुळे एअरफोर्सच्या मदतीने त्याची वाहतुक व्हावी अशी मागणी केली ती मान्य झाली. जवळची राज्य असतील तर रस्त्याने येतील. साखर कारखान्यांमध्ये जिथे को जनरेशन आणि इथेनॉल जे प्लॅन्ट आहेत, तिथे ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्याची विनंती वसंतदादा शुगर इस्टिट्यूटने केली आहे. फूड पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये नायट्रोजनचा वापर केला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अशा इंडस्ट्रीमधून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करतोय. इतर राज्यातून येणार्या टँकर अडवू नये अशी सूचना त्यांनी केली आहे.जमेल त्या मार्गाने राज्यात ऑक्सिजन आणणार आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
No comments:
Post a Comment