Wednesday, April 21, 2021

शहरातील हॉस्पिटल्समधला ऑक्सिजनचा साठा संपत आलाय... "या' समाजसेवकानी अक्षरशः धावपळ करून शहरातील हॉस्पिटल्सना मिळवून दिल्या ऑक्सिजन मशिन्स...

कराड -
 येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे.दरम्यान येथील काही समाजसेवकांनी शहरातून पोर्टेबल ऑक्सिजन मशिन्स अक्षरशः गोळा करून त्या मशिन्स येथील हॉस्पिटल्सला रुग्णसेवेसाठी देऊ केल्या आहेत त्या सर्व समाजसेवकांचे शहरातून खूप कौतुक होतंय

दरम्यान,याबाबतीत प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड तालुक्यात देखील रुग्ण वाढताना दिसत आहेत. अगोदरच रेमडीसीव्हीर इंजिक्शनचा तुटवडा सूरु असतानाच, आता कराडमध्ये एक नवीनच संकट उभे ठाकले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी होते. अशा स्थितीत रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मधील ऑक्सिजन लावून ऑक्सिजन लेव्हल स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरु असतात. तेव्हा कराडमधील बऱ्याच कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला आहे.
सध्य स्थितीतील साठा केवळ एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाच आहे. काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून मोठ्या मशीन उपलब्ध होत आहेत का याची विचारणाही केली आहे, असे समजते. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनींच्या गाड्या कोल्हापुरात वेटिंग वर आहेत असे समजते. परिस्थिती अजून बिकट होण्याअगोदर आपण माहिती घेऊन प्रशासकीय पातळीवर हालचाली करून ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये. यासाठी लवकरात लवकर हालचाली करणे गरजेचे आहे.  असा ईमेल प्रमोद पाटील यांनी पाठवला आहे कराड मधील एरम हाॅस्पीटल, राजश्री हाॅस्पीटलमध्ये ऑक्सिजन संपत आलेला आहे दरम्यान आज सकाळ पासून मनसे अध्यक्ष सागर बर्गे,दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकते गणेश पवार,रयत संघटनेचे विजय मुठेकर, तसेच साबीर मुल्ला , रोहित बागल,शाहू चौक मित्रपरिवारचे समाधान चव्हाण सिद्धार्थ पाटणकर गबबर ग्रुपचे रणजित पाटील राहुल चव्हाण अमित पाटणकर यांनी शहरातून पोर्टेबल ऑक्सिजन मशीन अक्षरशः गोळा करून गरज असणाऱ्या हॉस्पिटल्सना त्या मशिन्स रुग्ण उपचारासाठी देऊ केल्या या सर्वांचे शहरातून मोठे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment