Tuesday, April 13, 2021

राजा उदार झाला हाती भोपळा दिला….उद्धव ठाकरेंच्या लॉक डाऊन घोषणेनंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्येची टीका...

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(मंगळवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउची घोषणा केली आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना संचारबंदीच्या काळात काय बंद असणार? कोणत्या सेवा सुरू राहणार? याबाबत देखील माहिती दिली. तर, मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या भाषणावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीक केली आहे.
“राजा उदार झाला हाती भोपळा दिला…आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा हा अर्थ आहे. महाराष्ट्रातील मोठा वर्ग महाराष्ट्रात उद्यापासून सुरू होणाऱ्या लॅाकडाउनमुळे बाधित होणारं आहे. मात्र मदतीचा देखावा केला तरी तुटपुंज्या मदतीत हा वर्ग वंचित रहाणार आहे.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.
याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाउनच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत, ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

No comments:

Post a Comment