Friday, April 23, 2021

कोरोना विरोधात भाजपाची टास्क फोर्स राहणार उभी ; विक्रम पावसकर पुन्हा कोरोनाशी लढण्यासाठी सरसावले...

कराड
सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमीच झटत असलेल्या भाजपातर्फे कोरोना विरोधातील लढाईसाठी साहाय्यक समिती गठीत करण्यात आली आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भाजपाची टास्क फोर्स ठामपणे उभी असून नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे.

याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी झटत आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात बरोबरीने उभी आहे, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी नेते हे तन-मन-धन अर्पण करून लोकांची सेवा करत असतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही सेवा ही संघटन या पक्षाच्या कार्यपद्धती प्रमाणे सर्वजण लोकांना मदत करत होते. त्यावेळी धान्य वाटप, अन्न पोहोच करणे, रुग्णांना औषधे पोहोच करणे, रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी मदत करणे, दुसर्‍या जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठी पास काढण्यासाठी मदत करणे, परप्रांतीयांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करणे आणि सर्वात महत्वाचे समुपदेशन करणे यांसारख्या अनेक कामात कार्यकर्ते सहभागी होते.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकांच्या सेवेसाठी अविरत झटत आहेत. कोरोनाग्रस्तांना कशाप्रकारे मदत करता येईल, हे ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, सातारा जिल्हा प्रभारी सदाशिवभाऊ खाडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘माझा बूथ कोरोना मुक्त बूथ, माझा बूथ लसीकरण युक्त बूथ’ या तत्वानुसार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी काम करावे असे ठरले. 
या बैठकीला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदनदादा भोसले, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाग्रस्तांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड किंवा हॉस्पिटलची माहिती वेळेवर मिळावी. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे आणि लोकांचे प्राण वाचावेत यासाठी भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी 15 कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे. तसेच प्रत्येक शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी 10 असे एकूण 175 जणांची टीम तयार केली आहे. या टीमकडे बेड उपलब्धता आणि हॉस्पिटल माहिती, इंजेक्शन बाबत माहिती, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती, रुग्णालयाकडून ज्यादा बिल आकारणी बाबतचे तक्रार निवारण, लसीकरणाबाबत माहिती आणि कोरोना कोविड सेंटर बाबत माहिती हे विभाग वाटून दिले आहेत. त्यांचे काम चालू झाले आहे. 
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेल्या सुचनेनुसार सातारा जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वढणे यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांचे फोन नंबर आणि नावे हेल्पलाइन म्हणून दिले आहेत. त्यानुसार सातारा-जावळी : विठ्ठल प्रल्हाद बलशेटवार 9822215269, विकास विजय गोसावी 9011031794, डॉ.उत्कर्ष सखाराम रेपाळ 8421791983, डॉ.वीरेंद्र घड्याळे 9422400024. कोरेगाव: राजेंद्र दगडू इंगळे 9822599139, गणेश पालखे 9822425782, अप्पा कदम 9172500555, वाई. महाबळेश्वर, खंडाळा : सचिन घाटगे 9822241548, अलंकार सुतार 8805775164. माणं, खटाव, फलटण : सुहास मुळे 8275060182, जयकुमार शिंदे 9595365551, कराड-पाटण: महेंद्र डुबल 855199153, अजय पावसकर- 8275387994 व औषधांसाठी शैलेंद्र कांबळे 839010112 यांना संपर्क करून आपल्या अडचणी सांगाव्यात, त्याचे निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment