कराड
येथील पालिकेतील जनशक्तीचे गटनेते नगरसेवक राजेंद्र यादव यांच्या पुढाकाराने आणि पालिकेच्या सहकार्याने येत्या 19 तारखेपासून येथील हेड पोस्टनजीक असलेल्या शाळा क्रमांक 3 मध्ये सकाळी 10 30 ते 4 या वेळेत शहरातील नागरिकांसाठी मोफत कोविड 19 लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे त्याचा सर्वांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
गटनेते राजेंद्र यादव यांनी मागील कोरोना काळात मोठं काम केलं होतं त्यांनी 5 हजार कुटुंबांना मोफत भाजीपाला वाटप केले होते त्यांनी विविध स्तरात मास्क आणि सॅनिटायझर चे वाटपही मोठ्या प्रमाणात शहरातून केलं होतं शहरातील अनेक वॉर्ड त्यांनी स्वखर्चाने सॅनिटायझिंग करून घेऊन शहराच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्नही केला होता
राजेंद्र यादव यांनी आज येथील मुख्यपोस्ट शेजारी असलेल्या शाळा क्रमांक 3 मध्ये मोफत लसीकरण केंद्र कराडच्या नागरिकांसाठी सुरू केले आहे दिनांक 19 पासून सकाळी 10 30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे जास्तीतजास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन गटनेत्यांनी केले आहे
No comments:
Post a Comment