कराड
युवा नेते व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने सोमवार पेठ येथील शाळा क्रमांक 4 येथे कोबीड 19 चे मोफत लसीकरण केंद्र नुकतेच सुरू केले आहे याठिकाणी अनेकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे विशेष म्हणजे पावसकर यांनी लस घेण्यासाठी येणाऱ्यां जाणार्याना रिक्षा वाहतुकीची सोय केली आहे त्यामुळे घराघरातूंन मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे त्यांच्या याही कार्याचे सर्वत्र कौतुक होतंय
मागील लॉक डाऊन काळातही त्यांनी मोठं काम केलं आहे. गरजुना अत्यावश्यक मदत करण्यासह मजुरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. टेम्परेचर व ऑक्सिजन टेस्टिंगसहित कोरोना पेशंटच्या गरजेनुसार ऑक्सिजन मशीनची उपलब्धताही त्यांच्या मित्रपरिवाराच्यावतीने कोरोना काळात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटाने सम्पूर्ण जिल्हा होरपळलेल्या अवस्थेत असताना व सगळी हॉस्पिटल्स पेशंट्सनी फुल्ल असताना घरातच अनेकजण उपचार घेत होते,अशा पेशंटसची संख्यादेखील काही हजारात होती,तेव्हा व्हेंटिलेटरविना पेशंट दगावत होते.रुग्ण दगावण्याचा रेशीओ वाढला होता. अशावेळी विक्रम पावसकर मित्र परिवार लोकांसाठी धावून आला होता.त्यांच्या वतीने येथील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोविड सेंटर उभे राहले व त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपचार मोफत मिळाले. अडचणीवेळी समाजासाठी धावून येण्याच्या त्यांच्या याच बांधिलकीचे नेहमीप्रमाणे सम्पूर्ण जिल्ह्यातून नेहमीप्रमाणे कौतुक झाले
आणि सध्या त्यांनी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा शेकडो जणांनी लाभ घेतला आहे ही देखील कौतुकाचीच बाब आहे
No comments:
Post a Comment