Tuesday, April 27, 2021

दीपक पाटील मित्रपरिवाराच्या वतीने उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन ; मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याबाबत केले आवाहन...


कराड
श्रीरामनवमी व श्रीहनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून उद्या दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता येथील नगरपालिका शाळा नं 4. सोमवार पाण्याच्या टाकी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते दीपक पाटील मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली यावेळी इछुक रक्तदात्यांनी रक्तदान करणेसाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहनही करण्यात आले आहे. कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डाके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे

 कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीला लक्षात घेता  प्लाझमादान व रक्तदान ह्या दोन्हीं बाबीची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.तसेच १ मे पासून १८ वर्षांवरील जनतेसाठी लस देणे सुरू होणार आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान 28 दिवस तरी प्लाझ्मा व रक्तदान करता येत नाही असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सांगतात त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की, लस घेण्याअगोदर या शिबिरास भेट देऊन रक्तदान करा आणि आपण समाजाचे काही देणं लागतो ह्या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडा असे आवाहन देखील याठिकाणी करण्यात आले आहे


No comments:

Post a Comment