कराड
भगवान महावीर जयंती निमित्त कराड शहरातील श्री संभवनाथ महाराज ट्रस्ट व श्री संभवजीन संगीत मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कराडकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे २८५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचे दर्शन घडवले.
सध्याच्या कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना रक्ताची तातडीची गरज भासू लागली आहे. या जाणिवेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील ,जयंतकाका पाटील ,जयंत बेडेकर, मुकुंद चरेगावकर ,पोपटराव साळुंखे, प्रमोद पाटील, विजयसिंह यादव, राजेंद्र माने ,नंदकुमार बटाणे, अतुल शिंदे ,विजय मुठेकर आदी मान्यवरांनी या शिबिरास भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले. रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री संभवजीन संगीत मंडळाचे आदर्श शहा, ऋषभ शहा, संकल्प शहा ,सागर शहा, नितीन शहा, सौरभ शहा आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment