कराड
येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने येथील दिवटे गल्ली पाण्याची टाकी याठिकाणी मोफत कोविड 19 लसीकरण केंद्र शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे शहर व परिसरातील अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हणमंतराव पवार यांनी केले आहे
नगरसेवक हणमंतराव पवार यांनी शहरात कोरोनाचा कहर चालू असताना रस्त्यावर उतरून लोकांना कोरोना बद्दल प्रबोधन करत मास्क आणि सॅनिटायझर चे शहर व परिसरातून वाटप केले होते स्वतः घरोघरी जाऊन लोकांचे टेम्प्रेचर चेक करत रुग्णांना ऍडमिट करून बेड मिळवून देण्याचे कामही केल्याचे शहराला माहीत आहे कोरोना पेशंटच्या मृत्यूनंतर त्यांनी स्मशानभूमीत जाऊन कोविड योध्याचे मनोधैर्य वाढण्याचे काम देखील वारंवार केले आहे
हणमंतराव पवार यांनी नुकतेच येथील दिवटे गल्ली पाण्याची टाकी येथे मोफत कोविड 19 लसीकरण सेंटर सुरू केले आहे त्याठिकाणी रोज अनेकांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे शहरातील अधिकाधिक लोकांनी याठिकाणी येऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगरसेवक हणमंतराव पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment