कराड
येथील समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने आज भगवान परशुराम जयंतीनिमित्त येथील सोमवार पेठेत रक्तदान शिबीर पार पडले यावेळी 54 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती देण्यात आली त्यामध्ये 21 महिलांनी रक्तदाता म्हणून आपला सहभाग नोंदवला
संस्थेचे अध्यक्ष जयंत बेडेकर,सचिव ओंकार आपटे,माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर ,प्रबोध पुरोहित,हेमंत बेडेकर,मोहन आरे,संजय घळसासी संदीप शेंडे,पत्रकार सतीश मोरे ,माजी नगरसेविका सौ,ज्योती बेडेकर, सौ विनिता पेंढारकर महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सौ,वीणा ढापरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरास नगरपालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी,माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी, अजय उंडाळकर यांनी शिबिराला भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव सद्यस्थितीला लक्षात घेता प्लाझमादान व रक्तदान ह्या दोन्हीं बाबींची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील जनतेसाठी लस देणे सुरू होणार आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान 28 दिवस प्लाझ्मा व रक्तदान करता येत नाही असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ सांगतात त्यामुळे ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेने लस घेण्याअगोदर या शिबिरास भेट देऊन रक्तदान करा असे आवाहन केले होते महिलांसह अनेक रक्तदात्यानी या आवाहनाला प्रतिसाद देत आज रक्तदान केले
No comments:
Post a Comment