आर्थिक अडचणीत अडकलेली आणि घोटाळ्याच्या आरोपाने घेरलेली Sambandh Finserve Pvt Ltd या मायक्रो फायनान्स कंपनीचा परवाना लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेला परवाना रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनी कंट्रोल या वेबसाईट दोन सूत्रांच्या माहितीने हे वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकेची निव्वळ मालमत्ता ही कमीत कमी मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात या बँकेची आर्थिक स्थिती आणखी वाईट झाली आहे. बँकेतील आर्थिक स्थिती बिघडल्यानंतर आरबीआयने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच बँकेच्या Net worth मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर कंपनीचा परवाना का रद्द केला जाऊ नये? असा प्रश्नही आरबीआयने यात केला आहे.
तसेच दुसरीकडे आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आरबीआयकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच Sambandh Finserve या कंपनीकडूनही याबाबतचे कोणतेही विधान जारी करण्यात आलेले नाही.
No comments:
Post a Comment