वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील नगरसेवक व काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ अप्पा माने यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने लवकरच आणखी एक कोरोना लसीकरण केंद्र शहरात सुरू होणार आहे माने यांनी याबाबत प्रशासनाकडे मागणीदेखील केली आहे
अप्पा माने हे ग्राऊंडवर काम करणारे नगरसेवक म्हणून शहरात परिचित आहेत.कोणाला कसलीही अडचण असली तरी तो कोणत्या पार्टीचा आहे ,आपला आहे का परका आहे...याचा विचार न करता ते लोकांच्या मदतीला धावतात. पालिकेतील कोणतेही सत्तेतील पद नसताना केवळ आपल्या व्यक्तिगत इमेजवर ते लोकांना आपलेसे वाटतात...काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे.वेळप्रसंगी पदरमोड करून ते जनतेसाठी मदतीला धावून जातात अशीही त्यांची ओळख आहे.... जनतेतून निवडून येण्याची त्यांची स्वतंत्र ताकद त्यांच्या प्रभागात नक्कीच आहे.... ते आ पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत, जिकडे सत्ता तिकडे चांगभलं म्हणणारे संधीसाधू राजकारण सगळीकडेच होत असताना दुसरीकडे मात्र,अप्पा माने यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक त्यांचे विरोधकदेखील करताना दिसतात..
त्यांनी कोरोना काळात मोठं काम केलं आहे त्याची कसलीही जाहिरात बाजी त्यांनी केली नाही गरजूंना मदत करत त्यांनी बांधिलकीदेखील जपल्याचे सर्वानाच माहीत आहे कोरोनाबद्दलचे प्रबोधन,मास्क सॅनिटायझर चे वाटप अशा अनेक बाबीतून त्यांचे काम आजही चालूच आहे
त्यांनी कोरोना लसीकरण केंद्रासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे लवकरच ते सुरूही होणार आहे
असे अप्पा माने म्हणाले
No comments:
Post a Comment