कराड
नगराध्यक्षपदाचे पावित्र्य आत्तापर्यंतच्या सगळ्याच नगराध्याक्षांनी जपले आहे, मात्र तुम्ही त्या खुर्चीवरही बसण्याच्या लायकीच्या नाहीत, त्याचे पहिल्यांदा आत्मपरिक्षण करा. शहराने निवडून दिल्याचा आपल्याला गर्व निर्माण झाला आहे. तोच गर्व शहाराच्या विकासाला मारक ठरला आहे. असा गंभीर आरोप महिला बाल कल्याण सभापती सौ स्मिता हुलवान यांनी नगराध्यक्षा सौ शिंदे यांच्यावर आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
पालिकेच्या झालेल्या विशेष सभेवरून सौ शिंदे आणि जनशक्ती च्या नेत्या सौ हुलवान यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे सौ शिंदे यांनी हुलवान यांच्यावर याच अनुषंगाने जोरदार टीका केली होती त्याचेच उत्तर सौ हुलवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हुलवान पुढे म्हणाल्या, जनशक्ती आघाडीने विशेष सभा रद्द करण्याच्या मागणीला सभागृहात सहमती द्यायची आणि नंतर पत्रक काढून त्यावर टिका करायची म्हणजे निव्वळ जनतेची, पालिकेची व सभागृहातील प्रत्येक नगरसेवकाचीही कराडच्या नगराध्यक्षा फसवणूक करत आहे. खोटारडेपणाचा कळस गाठणार्या नगराध्यक्षांना त्या पदाचे पावित्र्यही जपण्याचे भान राहिलेले नाही. त्यामुळे नगराध्यक्षांनी उधळलेली मुक्ताफळे म्हणजे स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्याचाच केविलवाणा प्रयोग आहे. जनशक्तीची मागणी चुकीची होती. तर त्या चुकीच्या मागणीचे तुम्ही सभेत समर्थन का केलेत. तेथे त्याचवेळी विरोध का केला नाहीत. काहीतरी थातूर मातूर उत्तरे देवून लोकांची, पालिकेची व नगरसेवकांचाही दिशाभूल थांबवावी. बहुमताने कोविडच्या उपोयजनांची बैठक घेण्यास आपल्याला भाग पाडले. त्याची तुमच्यावर नामुष्की आली. आपण घेतलली सभा रद्द करावी लागली व आम्ही मागणी केलेली सभा घ्यावी लागली. तेच तुम्हाला खटकले. मात्र आम्हाला आमच्या कर्तव्याची पुरेपुर जाणीव आहे. तुम्ही फक्त लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून मिरवण्यातच समाधानी राहा. आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला समजून घेतले. शहराच्या हितासाठी बर्याच वेळा तुमच्या चुकांना पाठीशी घातले. तुम्ही जनतेतून नगराध्यक्ष झाला आहात. त्याचा मान ठेवला. आपल्या अधिकारातून विकास मागे पडू नये शहराचे नुकसान होवू नये म्हणून सर्व सदस्यही सोबत राहिले. मात्र त्याचे भान न ठेवता आपण मन मानेल तसे वागत आहात. त्यामुळे आपल्याला आता येथून पुढे तुम्हाला जशास तसे उत्तर मिळेल, हेही तुम्ही लक्षात ठेवावे., स्वतःचा नाकर्तेपणा लापावण्यासाठीच नगराध्यक्षांनी विशेष सभा घेतली. सभेची कार्यवाही सात दिवासात पूर्ण करणे, त्याचे ठराव करणे हे नगराध्यक्षांचेच अधिकार आहेत त्यात प्राशनासाचा काहीही संबंध नाही. सभेची प्रसोडींग अपूर्ण आहे. त्यामुळे विशेष सभा घेतली आहे, असे आपण स्वतःच कबूल केले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्तव्याची किंवा जबाबदारीची जाणीव नाही. तुम्हाला जे वाटते की, आम्ही ठरवून भांडण केले तर पाच वर्ष सभगृहामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरून तुमचा झालेला दंगा सगळ्या शहराने अनुभवला आहे. आपण काय आहात आणि काय नाही, ते सार्यांनाच माहिती झाले आहे. नगराध्यक्षपदाचे पावित्र्य आत्तापर्यंतच्या सगळ्याच नगराध्याक्षांनी जपले मात्र तुम्ही त्या खुर्चीवरही बसण्याच्या लायकीच्या नाहीत, त्याचे पहिल्यांदा आत्मपरिक्षण करा. शहराने निवडूण दिल्याचा आपल्याला गर्व निर्माण झाला आहे. तोच गर्व शहाराच्या विकासाला मारक ठरला आहे. त्यामुळे प्रथम नागरीक असतानाही कसे बोलावे, काय बोलावे याचे भान आपणास नाही.असेही सौ हुलवान म्हणाल्या आहेत.
No comments:
Post a Comment