Thursday, April 8, 2021

भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार संघ या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस पदी श्री अशोक बाळासो आडके

माथाडी कामगार व कर्मचाऱ्यांच्या  हक्कासाठी लढणारी भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघ या संघटनेमार्फत आज महाराष्ट्र राज्य संयुक्त सरचिटणीस पदी शेरे संजय नगर येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे व गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारे श्री अशोक बाळासो आडके उर्फ महाराज यांची संघटनेच्या संस्थापक-अध्यक्षा सौ.  उषाताई हुलवान , सरचिटणीस जयप्रकाश हुलवान , कार्याध्यक्ष एडवोकेट विकास पवार , उपाध्यक्ष सतीश दनाने , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश यादव, सातारा जिल्हाध्यक्ष बाबा सूर्यवंशी,  उपाध्यक्ष सातारा जिल्हा नितीन महाडिक,  शिवराज यादव यांच्या उपस्थितीत व सर्वानुमते निवड करण्यात आली.  

यावेळी माथाडी कामगार,  साखर कारखान्यातील  कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून आज नावारूपाला आली आहे, याचाच एक भाग म्हणून आज श्री अशोक आडके यांना पदभार देण्यात आला,  कराडमधील सर्किट हाऊस मध्ये पत्रकार परिषद घेऊन हा कार्यक्रम पार पडला.
मी वेळोवेळी कामगारांच्या हक्कासाठी सर्वस्व पणाला लावून या संघटनेसाठी काम करेन व गोरगरिबांना न्याय मिळवून देईन असे उदगार कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री अशोक आडके यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

No comments:

Post a Comment