आज कऱ्हाड येथील कै. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात जाऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे. दररोज ७५८ बाधित रूग्ण सापडत आहेत. कोरोनाची चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाची प्रक्रियाही आजपासून उपकेंद्रांवर सुरू करण्यात आली आहे. दररोज साधारण एका उपकेंद्रावर शंभर जणांना कोविड लसीकरण केले जाणार आहे. सध्या विविध रूग्णालयात पाच हजार सात रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या लसीकरण मोहिमेतंर्गत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथील कै. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कोरोना लसीकरण मोहिम सुरू असून पात्र असणाऱ्या नागरीकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे. कोरोना विरोधातील लढाईत सहभाग नोंदवून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
No comments:
Post a Comment