कराड
कोरोना कशामुळे फैलावतो हे समजून घेऊन राज्य शासनाने त्याबद्दलच्या आखुन दिलेल्या नियमावलीचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांनी वागलंही पाहिजे असा सल्ला ना शंभूराजे देसाई यांनी खा उदयनराजे भोसले याना कराड येथे येऊन दिला आहे
आज खा उदयनराजे यांनी साताऱ्यात भीक मंगो आंदोलन करीत सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉक डाऊन चा निषेध नोंदवत उद्यापासून साताऱ्यात नो लॉक डाऊन असा इशारा प्रशासनाला दिला आहे त्याबाबत आपलं मत व्यक्त करताना ते बोलत होते. आज कराड शहरास भेट देऊन येथील अधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांशीदेखील त्यांनी संवाद साधला.
ना देसाई पुढे म्हणाले उदयनराजे हे स्वतः खासदार आहेत छत्रपतींचे वारसदार आहेत त्यांना राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी असणे गरजेचे आहे,मात्र ते अस का बोलले ते माहीत नाही...
दरम्यान राज्यातील व्यापाऱ्यांनी कुठेही लॉक डाऊन विरोधात मोर्चे काढले नाहीत असे ते ठामपणे म्हणाले काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन त्यांचं म्हणणं मांडले आहे त्याबाबत योग्य असेल तो विचार शासन स्तरावर होईल असेही त्यांनी सांगितले
दरम्यान उदयनराजेनी नो लॉक डाऊन असा इशारा देत दुकाने उघडून व्यवहार सुरू ठेवण्याबाबत सांगितले आहे तर शंभूराजे यांनी उदयनराजेंना जनतेच्या आरोग्याची काळजी असणे गरजेचे आहे असे म्हणत लॉक डाऊन चे समर्थन केले आहे त्यामुळे या दोघांमध्ये या विषयावरून कलगीतुरा रंगणार हे नक्की आहे, तरी लोकांची बाजू घेत राजेंनी दिलेल्या इशाऱ्याला प्रशासन कसे तोंड देणार...हेच आता पहावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment