मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानंतर या प्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांची अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याप्रश्नी सुमारे अर्धातास चर्चा पार पडली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडे ऍड. जयश्री पाटील यांच्या द्वारे दाखल याचिके मध्ये आज दि. 5एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहे. त्या अनुषंगाने मी मंत्री(गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वतःहून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी पत्रात म्हंटल आहे.
No comments:
Post a Comment