Wednesday, April 14, 2021

पृथ्वीराजबाबा पाच वर्षात पहिल्यांदाच कराड पालिकेची "पायरी' चढले ; शहरात चर्चा सुरू......

कराड
 येथील पालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली असताना ही निवडणूक पक्ष चिन्हावर होणार हेही तितकेच निश्चित आहे प्रत्येक राजकिय पक्ष त्याकरिता आपली तयारीही करत आहेत आ प्रिथविराजबाबा व ना बाळासाहेब पाटील यांची एकत्रित महाविकास आघाडी शहराच्या राजकारणात असणार आहे... तर  येथिल भाजपा या आघाडीला या निवडणुकीत तगडा विरोध करेल... अशी राजकीय परिस्थिती हळुहळू शहरात निर्माण होऊ पहात असतानाच... आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार पृथ्वीराजबाबांची येथील पालिकेत जोरदार एन्ट्री झाली... तीदेखील त्यांच्या फँडातून शहरातील लोकांच्या सेवेसाठी दिलेली अम्ब्युलन्स घेऊनच... पाच वर्षांपूर्वी प्रिथ्वीराजबाबा पालिका निवडणुकीतून एका गटाचे नेतृत्व करत सहभागी झालेले दिसले होते... त्यानंतर,आज पाच वर्षांनी पहिल्यांदाच प्रिथ्वीराजबाबा येथील पालिकेची पायरी चढले... याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे...

आ पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील वर्षी कोविडच्या "पीक अप पिरियड' मध्ये स्वतः पुढाकार घेऊन कोरोना सेंटर शहरात सुरू केले होते त्याच बरोबर ऑक्सिजन आणि व्हेंरिलेटरची व्यवस्थादेखील त्याठिकाणी करून दिली होती त्याचवेळी त्यांनी मलकापूर व कराडसाठी अम्ब्युलन्स देखील आपल्या फँडातून देऊ केल्या होत्या... मात्र कराड पालिकेने त्यांनी दिलेली अम्ब्युलन्स आत्तापर्यंत ताब्यातच घेतली नव्हती... 
सध्या जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा कहर माजू पाहत आहे याचं पार्शवभूमीवर लसीकरण मोहीम जोरदार राबवण्यासाठी स्वतः प्रिथ्वीराजबाबा आग्रही आहेत त्याच बरोबरीने आपण लोकांच्या सेवेसाठी मागील वर्षी दिलेली अम्ब्युलन्स यावर्षी नगरपालिकेलेने ताब्यात घ्यावी.. आणि नको असेल तर तसा ठराव करून द्यावा... मग तो निधी दुसऱ्या महत्वाच्या कामासाठी शहरात वापरता येईल... अशी कडक भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती.. 
याच अनुषंगाने येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पालिकेला तसे पत्रही दिले होते... आणि आज पालिका प्रशासनाने प्रिथ्वीराजबाबा यांनी देऊ केलेली रुग्णवाहिका ताब्यात घेतली स्वतः प्रिथ्वीराजबाबा यांनी आज पालिकेत येऊन या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले... यावेळी नगरसेवकांचा मोठा ताफा त्याठिकाणी हजर होता... तसेच सर्व अधिकारी कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते. झालेल्या मागील पालिका निवडणुकित बाबांचा सहभाग दिसला होता त्यांनतर मात्र आज पहिल्यांदाच म्हणजे पाच वर्षानीच प्रिथ्वीराजबाबा पालिकेची "पायरी' चढले आहेत असेच खऱ्या अर्थाने म्हणावे लागेल  तोपर्यंत शहरातील राजकारणाचे बरेच पाणी डोक्यावरुन वाहून गेल्याचे सर्वानाच माहीत आहे... शहराची निवडणूक आता काही महिन्यावर येऊन ठेपली आहे... ही निवडणूक पक्ष चिन्हावर होणार हेही निश्चित आहे महाविकास आघाडी म्हणून ना बाळासाहेब पाटील व आ प्रिथ्वीराजबाबा या दोघांचेही आपापल्या ताकदीने लोकसेवेच व्रत सुरू आहे... आणि लोकसेवेचा भाग म्हणूनच आमदार प्रिथ्वीराजबाबा यांनी कोविड रुग्णसेवेसाठी पालिकेला दिलेली "अम्ब्युलन्स' बाबांचे चे "गुडविल' आणखीनच वाढवून गेली आहे...अशी शहरात चर्चा आहे...

No comments:

Post a Comment