अगदी खालच्या पातळीवर उतरून टिका टिप्पणी करणारी येथील पालिकेच्या बजेट ची सभा पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदामधील फालतू आरोप प्रत्यारोपाची टाइम पास चर्चा शहरात अजूनही ताजी आहे तोच, नुकत्याच झालेल्या ऑनलाइन विशेष सभेतुंन झालेल्या आपसात वादाची चर्चाही गावात चघळून चघळून सुरू आहे...निवडणूक काही महिन्यावर असताना अशा प्रकारच्या खालच्या दर्जाचे राजकारण कोणालाही अपेक्षित नाही... तोच तोच दंगा.., वाद.., थर्ड क्लास दर्जाचे आरोप अजूनही सुरूच आहेत... स्वच्छ सर्वेक्षण नावाखाली अनेक शहराचे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत हे माहीत असूनही त्यावर काहीही अद्याप होत नाहीये फक्त बक्षीस मिळणार म्हणून स्वच्छ सर्वेक्षण हाच धंदा सुरू आहे लोकांना हेदेखील आता कळू लागलंय... त्यातच झालेल्या या सभेतील गोंधळ आणि फालतू आरोपाने शहराची प्रतिमा आता आणखीनच मलीन करण्याचा प्रताप सुरू आहे... कोण करतय असले प्रकार...कोणाला नुसतच राजकारण हवे आहे...कोणाला विकास नको आहे... हे शहरासमोर आता आलंच पाहिजे भरकटलेल्या विचारधारेच्या चाललेल्या या राजकारणाला लगाम बसने आता गरजेचे आहे या घाणेरड्या राजकारणाचा अक्षरशः आता ऊब आलाय...त्यासाठी वैचारिकतेवर आधारित पक्षचिन्हावर होणारे राजकारण लोकांना आता हवे आहे...
No comments:
Post a Comment